#Budget : अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प सादर करायला सुरुवात, वाचा सर्व अपडेट्स

555 0

मुंबई : आज राज्याचा अर्थसंकल्प सादर होत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प सादर करायला सुरुवात केली आहे. “आज जगतगुरू तुकोबारायांच्या वैकुंठ गमनाचा दिवस अर्थात तुकाराम बीज आहे. भागवत धर्मात आदराचं स्थान असलेल्या आणि आपल्या विचाराने महाराष्ट्राला समृद्ध करणाऱ्या जगतगुरू तुकाराम महाराजांच्या चरणी साष्टांग दंडवत घालतो. तुकोबारायांनी जो संदेश दिला आहे, ‘टिकवावे धन, ज्याची आस करी जन’, या तत्वाला अनुसरून राज्याचा अर्थसंकल्प सादर करतो”, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर करायला सुरुवात केली आहे.

शेततळे विस्तार योजनेचा विस्तार होणार

कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार उभं राहणार

शेतकऱ्यांना प्रतिवर्षी 12 हजार रुपये मदत करणार

केंद्र सरकार 6 हजार राज्य सरकार 6 हजार रुपये देणार

शेतकऱ्यांच्या पिक विमा चा हप्ता राज्य सरकार भरणार

मच्छीमारांसाठी 279 कोटींची तरतूद

गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी सरकार 300 कोटी देणार

शिव उत्सवासाठी अडीचशे कोटींची तरतूद

86 हजार कृषी उत्पन्न तात्काळ जोडणी

कोकणातील सिंचनासाठी विशेष योजना आखणार

मेंढी शेळीपालनासाठी दहा हजार कोटी बिनव्याजी कर्ज

धान उत्पादकांना प्रतिहेक्टरी 15000 ची मदत

सेंद्रिय शेतीसाठी एक लाख कोटींची तरतूद

मराठवाड्यासाठी घर घर जल योजना राबवणार

घरघर जल योजनेसाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव

17 लाख कुटुंबीयांना नव्यानं नळ जोडणी मिळणार

नाशिक आणि नागपूर उद्यानांसाठी Mविविध विकास प्रकल्पांसाठी 36 हजार कोटी

गोपीनाथ मुंडे अपघात योजना लागू करणार

जलयुक्त शिवार 2 योजना राबविणार

राज्याच्या विकासासाठी मित्र संस्थेची स्थापना

कोकणातील पाणी नदीजोड प्रकल्पाने मराठवाड्याकडे नेणार

गोवर्धन गोवंश सेवा केंद्र योजनेची स्थापना करणार

चौथे सर्वसमावेशक महिला धोरण राबविणार

आशा सेविकांच्या मानधनात दीड हजारांची वाढ

अंगणवाडी सेविकांना 5 हजार 500 रुपये

700 नवीन आपला दवाखाना सुरू करणार

आरोग्य विभागासाठी 3 हजार 520 कोटींची तरतूद

लिंगायत समाजासाठी महात्मा बसवेश्वर महामंडळ

राज्यातील आर्थिक विकास महामंडळासाठी भरीव निधी

मोदी आवास 4 लाख नवीन घरं बांधणार

समृद्धी महामार्गाचं 88 % काम पूर्ण

Share This News

Related Post

मोठी बातमी! केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधातील गुन्हा रद्द

Posted by - April 1, 2023 0
केंद्रीय लघु सूक्ष्म व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या विरोधातील गुन्हा रद्द करण्यात आला असून अलिबाग मुख्य न्याय दंडाधिकारी…

राज्यात ऑक्टोबरमध्ये २१ हजार बेरोजगार उमेदवारांना रोजगार – कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा

Posted by - November 18, 2022 0
मुंबई : कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांद्वारे राज्यात विविध कंपन्या, कॉर्पोरेट संस्था, उद्योग यांमध्ये…

#PUNE : पानशेत पुरग्रस्त पुनर्वसित सहकारी सोसायटींच्या भाडेपट्टा जमिनीसंदर्भात राज्यशासन सकारात्मक – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

Posted by - March 20, 2023 0
मुंबई : पुणे जिल्ह्यातील सन १९६१ च्या पानशेत पुरानंतर विस्थापीत झालेल्या लोकांच्या पुनर्वसित सहकारी सोसायट्यांना भाडेपट्याने देण्यात आलेल्या जमिनी संदर्भात…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *