पुणे : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या दबावापुढे MIT-WPU युनिव्हर्सिटी प्रशासन झुकले; मागण्या मान्य

273 0

पुणे : MIT-WPU युनिव्हर्सिटी येथे ज्या विद्यार्थ्यांनी लेट फिस भरली होती. अशा विद्यार्थ्यांवर युनिव्हर्सिटी प्रशासनाने 10 टक्के पेनल्टी व दिवसाला 500 ते 1000 रुपये दंड आकारला होता. यामुळे विद्यार्थ्यांचा मानसिक व आर्थिक छळ होत होता. या अन्यायकारी धोरणाविरुद्ध अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने ” भिक मांगो आंदोलन” अशा प्रतीकात्मक स्वरूपाचे आंदोलन केले.

त्यानंतर युनिव्हर्सिटी प्रशासनाचे रजिस्टार प्रशांत दवे सर यांनी ज्या विद्यार्थ्यांवर पेनल्टी लागली आहे. त्या विद्यार्थ्यांची पेनल्टी मागे घेण्याचे ठरवले आहे. विद्यार्थ्यांची आर्थिक पिळवणूक होऊन देणार नाही आणि जिथे असे प्रकार घडतील त्या ठिकाणी अभाविप विद्यार्थ्यांसोबत उभा राहील अशी ग्वाही अभाविप पुणे महानगर मंत्री शुभंकर बाचल यांनी विद्यार्थ्यांना दिली.

पुढीलप्रमाणे मागण्या मान्य झाल्या.
१. सर्व प्रकारची पेनल्टी रद्द केली
२.ज्यांनी पेनल्टी भरली त्यांचे पैसे परत देणार
३.उर्वरित फी भरण्यासाठी विद्यार्थ्यांना 15 दिवसाचा कालावधी (ज्यांना शक्य नसेल त्यांनी अर्ज करून मुदत वाढवून घेऊ शकतात)

Share This News

Related Post

Talathi Bharti

Talathi Bharti : तलाठी भरती संदर्भात मोठा घोटाळा समोर ! उमेदवाराला 200 मार्काच्या पेपरमध्ये 214 गुण मिळाले

Posted by - January 8, 2024 0
पुणे : 5 जानेवारी रोजी तलाठी भरती (Talathi Bharti) परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर यामध्ये मोठा घोटाळा झाल्याचे आता समोर आले…

RUPALI THOMBARE : “आम्हाला उगाच चिडायला लावू नका; नारायण राणे आणि त्यांच्या पोरांनी आता आवरत घ्यावं…!”

Posted by - October 19, 2022 0
पुणे : काल भास्कर जाधव यांच्या घरावर मध्यरात्री हल्ला करण्यात आला. या घटनेवर राजकीय वर्तुळातून पडसाद उमटत असतानाच पुण्याच्या राष्ट्रवादी…

20 वर्ष तुमची मुंबई पालिकेत सत्ता होती तुम्ही काय केलं? चंद्रकांत पाटील यांचा शिवसेनेला सवाल

Posted by - October 22, 2022 0
पुणे:पुण्यात गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे पुणेकरांची दाणादाण उडाली आहे. अचानक झालेल्या अवकाळी पावसामुळे शहरातील व्यवस्थेचाही बोजवारा उडाला.…

#punefire: पुण्यातील सातारा रस्त्यावर भीषण आग; 2 जण जखमी

Posted by - May 1, 2023 0
पुणे: शहरातील सातारा रस्त्यावर डी-मार्टनजीक मध्यराञी 02 वाजण्याच्या सुमारास  आग लागल्याची वर्दि अग्निशमन दल नियंत्रण कक्षात मिळाली. दलाकडून 06 फायरगाड्या…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *