पुणे : अखेर…! अफजल खान वधाचा जिवंत देखावा सादर करण्यासाठी परवानगी मिळाली , वाचा सविस्तर

636 0

पुणे : अफजल खान वधाच्या जिवंत देखाव्यावरून पुण्यामध्ये मोठा वाद निर्माण झाला होता . कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये या दृष्टीने पोलीस प्रशासनाने अफजलखान वधाच्या जिवंत देखाव्यासाठी परवानगी नाकारली होती . दरम्यान संगम गणेश मंडळाच्या वतीने या जिवंत देखाव्याची परवानगी मिळावी यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करण्यात येत होते .

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील ई-मेलच्या माध्यमातून या देखाव्याची परवानगी मिळण्याबाबत विनंती करण्यात आली होती . त्याचबरोबर २६ ऑगस्ट पासून संगम गणेश मंडळाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपोषणाला देखील बसणार होते.

दरम्यान या प्रकरणावर आता पूर्णविराम लागला आहे . पुणे पोलिसांनी परवानगी नाकारल्याचे पत्र मागे घेऊन संगम गणेश मंडळाला अफजल खान वधाचा जिवंत देखावा सादर करण्याची परवानगी दिली आहे.

Share This News

Related Post

Sharad Mohol

Sharad Mohol Murder : शरद मोहोळ हत्येप्रकरणाला मोठं वळण ! पोलिसांना मिळाला ‘हा’ महत्त्वाचा पुरावा

Posted by - February 12, 2024 0
पुणे : कुख्यात गॅगस्टर शरद मोहोळ (Sharad Mohol Murder) याची भरदिवसा गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. मोहोळ याच्यावर त्याच्यासोबत…
Eknath Shinde Farm

Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या मूळगावी पत्नीसह शेतीकामात व्यस्त

Posted by - June 23, 2023 0
सातारा : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) सध्या सातारा येथील दरे या त्यांच्या मूळ गावी विश्रांतीसाठी आलेले आहेत. दोन…

चला अनिल परबांचे रिसॉर्ट तोडुया – किरीट सोमय्या

Posted by - March 19, 2022 0
शिवसेना नेते, परिवहन मंत्री अनिल परब यांच्याविरोधात पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री आणि नेत्यांवर भ्रष्टाचाराच्या आरोपांची राळ उडवून देणारे…
Buldhana Crime

Buldhana Crime : एसटीचा स्टेरिंग रॉड अचानक लॉक अन्… महामंडळाचा भोंगळ कारभार उघड

Posted by - August 16, 2023 0
बुलढाणा : बुलढाणामध्ये (Buldhana Crime) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे (Buldhana Crime) महामंडळाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *