FASTag

FASTag : 31 जानेवारीच्या अगोदर करून घ्या ‘हे’ काम अन्यथा तुमच्या कारचा FASTag होणार बंद

1741 0

मुंबई : टोल भरण्यासाठी फास्टटॅगचा वापर करणाऱ्या वाहन चालकांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. जर तुमच्या फास्टटॅगची KYC अपूर्ण असेल तर 31 जानेवारीनंतर FASTag बंद करण्यात येणार आहे. नॅशनल हायवे अ‍ॅथोरिटी ऑफ इंडियाने याबाबतची माहिती दिली आहे. One Vehicle One FASTag या मोहिमेअंतर्गत फास्टटॅगच्या वापरण्याच्या चांगल्या अनुभवाला चालना देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे 31 जानेवरीपर्यंत फास्टटॅगची केवायसी पूर्ण करणं अनिवार्य असणार आहे. असं न केल्यास त्या फास्टटॅग धारकांना ब्लॅकलिस्ट केलं जाणार आहे किंवा तो फास्टटॅग बंद केला जाईल.

तसंच कारवर एकापेक्षा जास्त फास्टटॅग असणाऱ्या वाहनचालकांचं अकाऊंट ब्लॅकलिस्ट केलं जाणार असल्यांचही नॅशनल हायवे अथॉरिची ऑफ इंडियाने सांगितलं आहे. केवायसी पूर्ण न केल्यास फास्टटॅग बंद होईलच पण वाहनचालकांच्या खिशावरही ताण वाढणार आहे. वाहनचालकांना दुप्पट टॅक्स भरावा लागणार आहे. त्यामुळे NHAI ने सर्व फास्टटॅग धारकांना KYC पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत.

फास्टटॅग म्हणजे काय?
टोल नाक्यावर वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि महामार्गावर विनाअडथळा वाहतुकीसाठी ‘फास्ट टॅग’ प्रणालीला सुरु करण्यात आली. फास्टटॅग स्टिकरसारखा असून तो कारच्या पुढच्या काचेवर चिटकवला जातो. फास्टटॅग हा डिजिटल स्टिकर असून ते रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन टेक्नॉलॉजी तंत्रज्ञानावर काम करतं. फास्टटॅग काढल्यानंतर टोलची रक्कम त्या वाहनचालकाच्या प्रीपेज अकाऊंट किंवा बँक अकाऊंटमध्ये थेट कापली जाते.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Suicide : प्रेम प्रकरणातून तरुणीने फ्लायओव्हरवरून थेट पाण्यात मारली उडी; Video व्हायरल

Sharad Mohol Murder : शरद मोहोळच्या हत्या प्रकरणी विठ्ठल शेलारला अटक ! हा विठ्ठल शेलार नेमका आहे तरी कोण?

Munnawar Rana : लोकप्रिय शायर मुन्नावर राणा यांचं निधन

Uddhav Thackeray : ‘उद्धव ठाकरेंच्या घराबाहेर मोठं कांड होणार आहे’; अज्ञात व्यक्तीने केला नियंत्रण कक्षाला फोन

Sharad Mohol : शरद मोहोळ हत्या प्रकरणात मोठी अपडेट ! आणखी 11 जणांना घेतलं ताब्यात

Share This News

Related Post

23rd KARGIL VIJAY DIWAS CEREMONY : सदर्न कमांड वॉर मेमोरियल आयोजित ‘कारगिल विजय दिवस’ अभिमानाने साजरा

Posted by - July 26, 2022 0
पुणे : 26 जुलै 2022 रोजी पुण्यातील सदर्न कमांड वॉर मेमोरियल येथे आयोजित समारंभात कारगिल विजय दिवस मोठ्या अभिमानाने साजरा…

लहान मुलीचा विनयभंग करणाऱ्या शिक्षकाला गावकऱ्यांनी अक्षरशः तुडवले

Posted by - March 30, 2022 0
कोल्हापूर – गावातीलच लहान मुलीचा विनयभंग केल्या प्रकरणी एका शिक्षकाला गावकऱ्यांनी बेदम चोप देऊन त्याला अक्षरशः तुडवून काढले. यावेळी एका…

महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर राज्याच्या गृह खात्यावर नाराज, कारण….

Posted by - March 31, 2023 0
महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी राज्याच्या गृह खात्यावर आपली नाराजी व्यक्त केली आहे. महिला प्रतिनिधीला स्वतःवरती झालेल्या अन्यायाला वाचा…

BIG BREAKING : गोबरगॅसच्या टाकीत पडल्याने बापलेकासह काकांचा अंत, एकाच कुटुंबातील चौघांवर काळाचा घाला; बारामतीतील धक्कादायक घटना

Posted by - March 15, 2023 0
बारामती : माळेगाव पोलीस ठाणे तालुका बारामती हद्दीत बारामती सांगवी रोड, आटोळे वस्ती खांडज गावचे हद्दीत भानुदास आटोळे यांच्या शेतामध्ये…
Pune News

Pune Crime News : पुणे दहशतवादी अटक प्रकरणात मोठी अपडेट; आता 2 तरुणी ATS च्या रडारवर

Posted by - July 27, 2023 0
पुणे : पुण्यात (Pune Crime News) काही दिवसांपूर्वी 2 दहशतवाद्यांना अटक करण्यात आली होती. या प्रकरणातील तिसरा आरोपी कातिल दस्तगीर…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *