ब्रँडेड कंपनीचे लेबल लावून बनावट जिन्स पँटची विक्री करणाऱ्या दुकानांमधून २५ लाखांचा मुद्देमाल जप्त

422 0

पुणे – ब्रँडेड कंपनीचे लेबल लावून बनावट जिन्स पँटची विक्री करणाऱ्या पिंपरी चिंचवडमधील व्यावसायिकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत तब्बल 25 लाख 60 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई रविवारी दुपारी पिंपरी कॅम्प मधील साई चौकातील जीन्स पॉईंट बाय लेजेंड्स व लेजेंड्स चॉईस मेन्स वेअर या दोन दुकानांवर करण्यात आली.

या प्रकरणी पोलिसांनी इस्माईल इस्तेखार खान ( वय -26 रा . एसएनबीपी शाळेसमोर मोरवाडी , पिंपरी ) याच्याविरुद्ध कॉपीराईट कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. महेंद्र सोहन सिंग ( वय 36 रा कसबा पेठ , मुळ रा . बिरोलीया , राजस्थान ) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे एलजीएफ डिफेन्स कंपनीत तपासणी अधिकारी म्हणून काम करतात . कॉपी राईट हक्काचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदा व ट्रेडमार्क कायद्याप्रमाणे ते कारवाई करतात. फिर्यादी यांना पिंपरी येथील साई चौकातील दोन दुकानामध्ये सुपरड्राय या विदेशी ट्रेडमार्क कंपनीचे लेबल लावून बनावट जिन्स पॅट विक्री केली जात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार फिर्यादी यांनी पोलीस उपायुक्त परिमंडळ 1 यांच्याकडे तक्रार अर्ज करुन कारवाईची परवानगी मागितली होती.

पोलीस उपायुक्तांनी मान्यता दिल्यानंतर पिंपरी पोलिसांनी फिर्यादी समक्ष या दोन दुकानांवर धाड टाकली. यावेळी जीन्स पॉईंट बाय लेजेंड्स या दुकानातून ३१२ बनावट जीन्स तर लेजेंड्स चॉईस मेन्स वेअर या २०० बनावट जीन्स जप्त करण्यात आल्या. पुढील तपास पिंपरी पोलीस करीत आहेत.

Share This News

Related Post

Pune News

पिंपरी चिंचवड मध्ये खंडणी विरोधी पथकाची मोठी कारवाई! पिस्टलसह जिवंत काडतुसं जप्त 

Posted by - October 3, 2023 0
पिंपरी चिंचवड पोलिसांनी चार सराईत गुन्हेगाराकडून पाच देसी पिस्टल आणि दहा जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. जगताप डेरी परिसरामध्ये असलंम…

” जर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अपमान करणार असाल तर…!” ; सभागृहात मुख्यमंत्री झाले आक्रमक

Posted by - March 24, 2023 0
मुंबई : काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या वक्तव्यावरून निर्माण झालेल्या वादावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधिमंडळातील सभागृहात आज निवेदन सादर…

महत्वाची बातमी ! अनिल देशमुख, नवाब मलिकांना विधानपरिषदेसाठी मतदान करता येणार नाही, उच्च न्यायालयाचा निर्णय

Posted by - June 17, 2022 0
पुणे- माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि मंत्री नवाब मलिक यांना विधान परिषदेच्या निवडणुकीत मतदान करता येणार नाही असा महत्वपूर्ण निकाल…

प्रतीक्षा संपली ! इयत्ता बारावीचा निकाल उद्या

Posted by - June 7, 2022 0
मुंबई- महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल कधी लागणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं…
Bus Accident

Bus Accident : चालकाचं बसवरील नियंत्रण सुटल्याने घाटामध्ये बसचा भीषण अपघात; 3 जण जखमी

Posted by - August 13, 2023 0
सिंधुदुर्ग : मुंबई ते गोवा अशी प्रवाशी वाहतूक करणाऱ्या बसचा अपघात (Bus Accident) झाला आहे. बसचालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने करूळ…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *