ठाकरे सरकारने अहंकारात शहाणपण गमावलं; आशिष शेलार यांचे टीकास्त्र (व्हिडिओ)

244 0

मुंबई – विधीमंडळाने केलेले 12 भाजप आमदारांचे निलंबन सुप्रीम कोर्टाने आज रद्द केले. या निर्णयामुळे ठाकरे सरकारला जोरदार धक्का बसला आहे. राज्यातील ठाकरे सरकार अहंकारात असून त्यांनी अहंकारात शहाणपण गमावलं असल्याची टीका भाजप नेते आशिष शेलार यांनी न्यायालयाच्या निकालानंतर केली आहे.

राज्य सरकारने भाजप आमदारांविरोधात केलेल्या निलंबनाच्या ठरावावर सुप्रीम कोर्टाने ताशेरे ओढले असून हा निकाल देशातील लोकशाहीच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरणार असल्याचे शेलार यांनी म्हटले. सुप्रीम कोर्टाने भाजपच्या 12 आमदारांचे निलंबन रद्द केल्यानंतर मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. सुप्रीम कोर्टाचा निकाल ऐतिहासिक आहे. सरकारला आपली चूक सुधरवण्याची संधी सुप्रीम कोर्टाने दिली होती. मात्र, ठाकरे सरकारने अहंकारात शहाणपण गमावलं.

ठाकरे सरकारच्या अवैध ठरावामुळे विधीमंडळाच्या पारदर्शी कामकाजाला इजा पोहचली आहे. महाराष्ट्राबद्दल देशात होणारी अवास्तव चर्चा सरकारला थांबवता आली असती. ठाकरे सरकार अहंकाराच्या परमोच्च पातळीवर असल्याचे शेलार यांनी म्हटले आहे.

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने महाविकास आघाडील सणसणीत चपराक बसली आहे. राज्य सरकारचा निर्णय बेकायदेशीर होता. संविधानाला धरून नव्हता, असं देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून म्हटलं आहे. न्याय मिळाल्याबद्दल भाजपच्या सर्व आमदारांचं फडणवीस यांनी अभिनंदनही केलं आहे. राज्य सरकारचा हा निर्णय चुकीचा असल्याचं मी आधीपासून सांगत होतो. हा निर्णय बेकायदेशीर असल्याचं मी नमूद केलं होतं. कृत्रिम संख्याबळाच्या जोरावर सरकारने हा निर्णय घेतला. या निर्णयामागे कोणतंही महत्त्वाचं कारण नव्हतं. म्हणूनच कोर्टाने आमचं म्हणणं ऐकलं आणि आमच्या बाजूने निकाल दिला, असंही त्यांनी म्हटलं आहे. हा केवळ 12 आमदारांचा प्रश्न नव्हता तर 12 मतदारसंघातील 50 लाखाहून अधिक नागरिकांचा प्रश्न होता, असं सांगतानाच सेव्ह डेमोक्रसी असंही त्यांनी म्हटलं आहे.

Share This News

Related Post

‘आज पुन्हा शाईची मुक्त उधळण होणार? मु. पोस्ट सांगवी’ ; चंद्रकांत पाटलांना शाई फेकीची धमकी !

Posted by - December 17, 2022 0
पिंपरी-चिंचवड : पुण्याचे पालकमंत्री तसेच उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर पुन्हा एकदा शाईफेक करण्याची धमकी देण्यात आल्यानं एकच…

#CRIME : शेळ्या चरायला जाणाऱ्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार; कुटुंबीयांना कळले तेव्हा होती सात महिन्यांची गर्भवती; औरंगाबाद येथील धक्कादायक घटना

Posted by - January 23, 2023 0
औरंगाबाद हर्सूल : शेळ्या चरायला नेणाऱ्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिला कोणालाही सांगितले तर जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या आरोपीस वीस…

कुस्ती संघाच्या अध्यक्षच्या अटक करावी या महिला कुस्तीगिरांच्या मागणीला पाठिंबा देत आपची निदर्शने !

Posted by - May 2, 2023 0
भारतीय कुस्ती संघाचा अध्यक्ष व भाजपची खासदार ब्रिजभूषण सिंग यांच्यावर आंतरराष्ट्रीय पदक विजेत्या महिला कुस्तीगीरांनी लैंगिक शोषणाचे आरोप केलेले असून…
Election

Loksabha Elections : पिंपरी- चिंचवड विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदान साहित्य वाटपाची प्रक्रिया संपन्न

Posted by - May 12, 2024 0
पिंपरी- चिंचवड : चिंचवड विधानसभा मतदारसंघातील मतदान पथकांना मतदान केंद्रांवर घेऊन जाण्यासाठी १०२ पीएमपीएमएल बसेस, २० मिनी बसेस, १६ जीप,…
accident

Solapur Accident : सोलापूरमध्ये भाविकांच्या खासगी ट्रॅव्हल्सला अपघात; 20 जण जखमी

Posted by - May 10, 2023 0
करमाळा : सोलापूर (Solapur) जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. करमाळा तालुक्यातील आवटी येथील वली चांद पाशा दर्गाहच्या दर्शनासाठी…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *