‘NAAC’ कडून परीक्षक मंडळाचा विस्तार ; मूल्यांकन प्रक्रिया वेगाने राबवणे शक्य

121 0

पुणे : उच्च शिक्षण संस्थांचे मूल्यांकन आणि अधिस्वीकृतीसाठीच्या परीक्षकांची संख्या राष्ट्रीय मूल्यांकन आणि अधिस्वीकृती परिषदेकडून (NAAC) वाढवण्यात येत आहे. बऱ्याच वर्षांनी नव्या परीक्षकांची निवड प्रक्रिया राबवण्यात येत असून, परीक्षक मंडळाचा विस्तार करण्यात येणार आहे. याद्वारे आता मूल्यांकनाची प्रक्रिया वेगाने राबवणे शक्य होणार आहे.

उच्च शिक्षणात गुणवत्ता आणण्यासाठी राष्ट्रीय मूल्यांकन आणि अधिस्वीकृती परिषदेकडून महाविद्यालये, विद्यापीठे आदी उच्च शिक्षण संस्थांचे मूल्यांकन करण्यात येते. त्यात उच्च शिक्षण संस्थांच्या मूल्यांकनासाठी नॅककडून परीक्षकांची समिती प्रत्यक्ष संस्थेत पाठवली जाते. समितीकडून विविध निकषांवर तपासणी करून श्रेणी दिली जाते. गेल्या दोन वर्षांत करोनामुळे नॅक मूल्यांकनाची प्रक्रिया मंदावली होती. या पार्श्वभूमीवर आता नॅककडून नवीन परीक्षकांच्या निवडीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

नवीन परीक्षकांच्या निवड प्रक्रियेबाबत नॅकच्या कार्यकारी समितीचे अध्यक्ष डॉ. भूषण पटवर्धन म्हणाले, की नॅकने काही वर्षांपूर्वी परीक्षक घेणे थांबवले होते. नॅककडे जवळपास चार ते साडेचार हजार परीक्षक होते. मात्र मूल्यांकनाच्या प्रक्रियेत परीक्षक हा फार महत्त्वाचा घटक आहे. गेल्या काही वर्षांत काही उच्च शिक्षण संस्थेत नोकरी करत असलेले आणि परीक्षक म्हणून काम करणाऱ्या व्यक्ती निवृत्त झाल्या, काहींनी परीक्षणाचे काम थांबवले. मात्र परीक्षक जितके चांगले असतील तितकी चांगली मूल्यांकन प्रक्रिया होते. त्यामुळे नॅकची गरज लक्षात घेऊन नवीन परीक्षकांची नियुक्ती करण्यासाठी नोंदणी प्रक्रिया खुली करण्याचा निर्णय घेण्यात आला. या प्रक्रियेत आलेल्या अर्जाची आणि संबंधित अर्जदारांची छाननी करून अंतिम निवड केली जाईल.

कारवाईचा बडगा

मूल्यांकनाच्या प्रक्रियेत महाविद्यालय किंवा परीक्षकांबाबत कोणत्याही गैरप्रकाराची नॅककडे तक्रार दाखल झाल्यास चौकशी करून कारवाई केली जाते. त्यानुसार गेल्या काही महिन्यांत काही महाविद्यालये आणि परीक्षकांवरही कारवाईचा बडगा उगारण्यात आल्याची माहितीही डॉ. पटवर्धन यांनी दिली.

परीक्षक समितीच्या रचनेतही बदल

आता नॅककडून पाठवल्या जाणाऱ्या परीक्षक समितीची रचनाही बदलण्यात येणार आहे. एकच परीक्षक पुन्हा पुन्हा असणार नाही अशी व्यवस्था केली जाईल. निवड प्रक्रियेतून परीक्षकांची संख्या वाढल्याने मूल्यांकनाच्या प्रक्रियेला वेग येईल. तसेच अधिकाधिक उच्च शिक्षण संस्थांना नॅक मूल्यांकनाच्या कक्षेत आणण्याचे उद्दिष्ट असल्याचेही डॉ. पटवर्धन यांनी सांगितले.

Share This News

Related Post

मोठी बातमी! अविनाश भोसले यांचे ‘हेलिकॉप्टर’ सीबीआयकडून जप्त

Posted by - July 30, 2022 0
बहुचर्चित येस बँक आणि डीएचएफएल घोटाळ्या प्रकरणी सीबीआयच्या कोठडीत असलेले पुण्यातील प्रसिद्ध बिल्डर अविनाश भोसले यांना आणखी एक मोठा धक्का…
Breaking News

मोठी बातमी : “महाराष्ट्रातील गाड्या पुढे जाऊ देणार नाही…!”, बेळगावमध्ये महाराष्ट्राच्या वाहनांवर हल्ला; महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद पेटण्याची शक्यता

Posted by - December 6, 2022 0
बेळगाव : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद सुरू आहे. कर्नाटक सरकारकडून सातत्याने आक्रमक भूमिका घेतली जाते आहे. काही दिवसांपूर्वीच…

आज संकष्टी चतुर्थी; विघ्नहर्त्याला असे घाला साकडे, चंद्रोदय वेळ, उपाय , पूजा विधी, महत्व

Posted by - November 12, 2022 0
हिंदू पंचांगानुसार कृष्ण पक्षात येणाऱ्या चतुर्थीस संकष्ट चतुर्थी किंवा संकष्टी चतुर्थी म्हणतात. एका वर्षात १२ आणि त्यावर्षी अधिकमास आल्यास १३…

पुण्यातील धक्कादायक घटना ! सेवानिवृत्त पोलीस महानिरीक्षकाच्या मुलाचा बेदम मारहाण करून खून

Posted by - June 29, 2022 0
पुणे- सेवानिवृत्त पोलीस महानिरीक्षकाच्या मुलाला बेदम मारहाण करून खून केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात घडला आहे. आंबेगाव बुद्रुक येथील प्यासा बारच्या…

मिस युनिव्हर्स आणि बॉलीवूड अभिनेत्री सुश्मिता सेनला हृदयविकाराचा झटका; इन्स्टा पोस्ट करून म्हणाली, ‘माझं हृदय…!’

Posted by - March 2, 2023 0
मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री सुष्मिता सेन हिला दोन दिवसांपूर्वी हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल केल्यानंतर तिच्यावर एन्जिओप्लास्टी…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *