सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जीवनावर आधारित छायाचित्रांचे प्रदर्शन; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ: राष्ट्रीय एकता दिवसही साजरा

215 0

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती राष्ट्रीय एकता दिन म्हणून साजरी करण्यात आली. यानिमित्ताने सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जीवनावर आधारित छायाचित्रांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र- कुलगुरू डॉ.संजीव सोनवणे यांच्या हस्ते मुख्य इमारती मधील सरस्वती सभागृहात भरवलेल्या या छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी कुलसचिव डॉ.प्रफुल्ल पवार, वित्त व लेखा अधिकारी चारुशीला गायके, जयकर ज्ञानस्रोत केंद्राच्या संचालिका डॉ.अपर्णा राजेंद्र, विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ.संतोष परचुरे, जनसंपर्क विभागाचे सहायक कुलसचिव डॉ.अजय ठुबे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी राष्ट्रीय एकता दिवसाची शपथही घेण्यात आली.

यावेळी उपस्थितांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. याच दिवशी भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्याही प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत अभिवादन करण्यात आले.

या छायाचित्र प्रदर्शनात सरदार वल्लभभाई पटेल यांचा जीवनपट ४० पोस्टर्सच्या माध्यमातून उलगडण्यात आला. दिवसभरात अनेक विभागातील अधिकारी, कर्मचारी यांनी या प्रदर्शनाला भेट दिली.

Share This News

Related Post

Pune News

गणेशजयंती निमित्त ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टकडून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

Posted by - February 11, 2024 0
पुणे : हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’कडून गणेश जयंतीनिमित्त येत्या मंगळवारी (दि. १३) विविध धार्मिक कार्यक्रमांचे…

#INFORMATIVE : वारसा प्रमाणपत्र म्हणजे काय ? नॉमिनी आणि वारसदारातील फरक,जाणून घ्या हि माहिती

Posted by - February 17, 2023 0
आपण एखाद्या बँकेत खाते सुरू करतो किंवा एखाद्या योजनेत गुंतवणूक करतो तेव्हा त्या अर्जात नॉमिनीचा उल्लेख करण्याचे सांगितले जाते. कारण…

Decision of Cabinet meeting : हिंगोलीत होणार बाळासाहेब ठाकरे हरिद्रा (हळद) संशोधन व प्रशिक्षण केंद्र स्थापना

Posted by - July 27, 2022 0
मुंबई : राज्यासाठी हळद संशोधन व प्रक्रिया धोरण लागू करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. तसेच हिंगोली जिल्ह्यात…

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा

Posted by - April 14, 2022 0
पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर वाहनांची मोठी गर्दी झाली आहे. वाहतूक अत्यंत धिम्या गतीने सुरू आहे. मुंबईवरून पुण्याकडे जाणाऱ्या लेनवर वाहनांच्या लांबच…

कांदा दरावरुन रान पेटले; राष्ट्रवादी काँग्रेसचा मुंबई-आग्रा महामार्गावर कांदा रस्त्यावर फेकून रास्ता रोको

Posted by - March 10, 2023 0
नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसने आज मुंबई-आग्रा महामार्गावरील चांदवडमध्ये रास्ता रोको आंदोलन केले. महामार्गावर अक्षरशः कांदा रस्त्यावर फेकून सरकारचा निषेध व्यक्त…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *