EWS आरक्षण हा बौद्धिकदृष्ट्या भ्रष्ट निर्णय, मागच्या दाराने मनुस्मृती आणण्याचा प्रयत्न : ॲड. प्रकाश आंबेडकर

227 0

EWS आरक्षणावरती सुप्रीम कोर्टाने निकाल दिला. हा निकाल पाहता हा वैचारिक भ्रष्टाचार आहे असेच याबद्दल म्हणता येईल. मागच्या दाराने पुन्हा मनुस्मृती आली आहे. संविधानामध्ये नवीन तत्व घालण्याचे कुठेही प्रावधान नाही. संविधान दुरुस्त करण्याचा अधिकार आहे. हे करत असताना आर्टिकल ३६८ असं म्हणतं की तुम्हाला addition, variation आणि deletion करता येतं. ते सुद्धा जी कलमं आधीपासून आहेत त्यामधेच. आर्टिकल १६ मध्ये सामाजिक आरक्षण देता येतं. हे सामाजिक आरक्षण आर्टिकल ३४१ आणि ३४२ नुसार यादी करून दिलं जातं. ही यादी कायमस्वरूपी आहे असं नाही.

या याद्यांमध्ये include किंवा exclude करण्याचा अधिकार संसदेला आहे. संविधान सामाजिक तत्व मानत असताना हे नवीन आर्थिक तत्व कोणत्या आर्टिकलनुसार अंतर्भूत केलं ते सांगा. असं कोणतंही प्रावधान नाही. त्याचं काहीच स्पष्टीकरण या निर्णयात आलेलं नाही. सुप्रीम कोर्ट स्वतः म्हणतंय की, सामाजिक आरक्षण आणि आर्थिक आरक्षण दोन वेगळ्या बाबी आहेत. या दोन्ही वेगळ्या बाबी असतील तर मग हे नवीन तत्व अंतर्भूत करण्याचं कोणतं प्रावधान आहे हे सांगा. हा निर्णय स्वतःलाच contradict करणारा आहे. विरोधाभासी आहे.

सामाजिक आरक्षण आणि आर्थिक आरक्षण असे दोन वेगळे कप्पे करताना ज्यांना सामाजिक आरक्षण मिळतंय त्यांना आर्थिक आरक्षण मिळणार नाही असं म्हटलंय. जरी ते निकषात बसत असले तरी. मनूने जातीच्या भिंती उभ्या करून समाज बंदिस्त केला. त्याप्रमाणेच ह्या निर्णयाने सामाजिक आणि आर्थिक अशा कप्प्यात बंदिस्त करून नव्याने मनूस्मृतीची सुरुवात केली आहे. हे या देशाला धोकादायक आहे असे मी मानतो. आरक्षणावर ५०% ची मर्यादा घालून ओबीसींना केवळ २७ टक्के आरक्षण देण्यात आलं. मराठा, पाटीदार, गुज्जर, जाट आदींना यासाठीच नाकारण्यात आलं.

आता स्वतः सुप्रीम कोर्टानेच ही मर्यादा ओलांडल्याने हे सगळे समूह आता आम्हाला आरक्षण द्या अशी मागणी करतील. यामुळे देशात एक नवीनच गोंधळ माजेल. हा निर्णय देशाला अशांततेच्या दिशेने घेऊन जाणारा आहे. त्यामुळे ह्या निर्णयाचे पुनरावलोकन करावे अशी आमची विनंती आहे.

Share This News

Related Post

jitendra-awhad

Loksabha : भाजपमध्ये जाण्यासाठी ‘ते’ दोन नेते रोज शरद पवारांना फोन करायचे; जितेंद्र आव्हाड यांचा मोठा गौप्यस्पोट

Posted by - May 2, 2024 0
मुंबई : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पुन्हा एकदा अजित पवार यांच्या गटातील राष्ट्रवादीच्या नेंत्यावर जोरदार…

शिवसेनेचे रघुनाथ कुचिक यांची ‘ती’ टेस्ट खोटी, पीडित तरुणीचा आरोप

Posted by - March 31, 2022 0
पुणे- शिवसेनेचे नेते रघुनाथ कुचिक यांनी बलात्कार केल्याचा आरोप एका तरुणीने केला होता. या प्रकरणी कुचिक यांच्या विरोधात गुन्हा देखील…

मशिदीवरील भोंग्याच्या आवाजाची मर्यादा पाळली जाईल, पुण्यात मुस्लिम संघटनेचा निर्णय

Posted by - April 21, 2022 0
पुणे- मशिदीवरील भोंग्यांना परवानगी असेल तर ते काढण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मात्र आवाजाची मर्यादा पाळली जाईल अशी भूमिका पुण्यातील मुस्लिम…
Water Supply

Pune Water Supply : पुणेकरांना दिलासा ! पुणे शहरातील पाणी कपात रद्द

Posted by - July 29, 2023 0
पुणे : पुणेकरांसाठी एक दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. आज पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये आज आढावा…
Supriya-Sule

Supriya Sule : अजित पवारांचे राष्ट्रवादीतील स्थान काय? सुप्रिया सुळेंनी केले स्पष्ट

Posted by - August 24, 2023 0
पुणे : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातील फूट, कार्यकर्त्यांमधील संभ्रम, अजित पवारांचे पक्षातील स्थान, चोरडीयांच्या घरची बैठक अशा विविध मुद्द्यावर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *