#NILAM GORHE : प्रत्येक जिल्ह्यात महिलांसाठी ‘महिला विकास व्यासपीठ’ असावे

571 0

मुंबई : राज्याचे चौथे महिला धोरण २०२३ ची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात महिला ‘महिला विकास व्यासपीठ’ असावे, महिला व बालविकास विभागाला वाढीव निधी मिळावा, मनोधैर्य योजना महिला व बालविकास विभागामार्फत राबविण्याच्याबाबत आम्ही सर्व महिला आमदार मागणी करत आहोत, असे प्रतिपादन उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी महिला बालविकास विभागातर्फे आयोजित महिला धोरणाच्या चर्चेच्या बैठकीत केले.

राज्याचे चौथे महिला धोरण प्रभावी होण्यासाठी विधानभवन येथे मा.मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी, विधानपरिषद सदस्य, सर्व श्रीमती. प्रज्ञा सातव, डॉ. मनीषा कायंदे, उमा खापरे विधानसभा सदस्य सर्व श्रीमती. यामिनी जाधव, ऋतुजा लटके, लताबाई सोनवणे, मनीषा चौधरी, विद्या ठाकूर, देवयानी फरांदे, मेघना सकोरे – बोर्डीकर, श्वेता महाले, माधुरी मिसळ, नमिता मुंदडा, मंदा म्हात्रे, मोनिका राजळे, भरती लव्हेकर, सीमा हिरे, सरोज अहिरे, आदिती तटकरे, सुमनताई पाटील, सुलभा खोडके, जयश्री जाधव, वर्षाताई गायकवाड, यशोमती ठाकूर, प्रतिभा धानोरकर, प्रणिती शिंदे, मंजुळा गावित आणि गीता जैन यांसह महिला व बालविकास विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती. आय. ए. कुंदन उपस्थित होते.

उपसभापती डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, चौथे महिला धोरण अस्तित्वात आल्या नंतर त्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रत्येक जिल्ह्यात ‘महिला विकास मंच’ असावे. यामध्ये त्या जिल्ह्यातील महिला खासदार, आमदार, महापौर, जिल्हा परिषद अध्यक्षा, पंचायत समिती अध्यक्षा, सरपंच, नगराध्यक्षा अशा जवळपास शंभर महिला सदस्य आणि त्या भागातील महिला संस्थांचे प्रमुख पन्नास महिला प्रतिनिधींचा समावेश असावा. त्यांची आणि पालकमंत्री यांची प्रत्येक महिन्याला बैठक व्हावी. यामधील सदस्यांनी महिला सक्षमीकरणासाठी सुरू असलेल्या योजनांची अंमलबजावणी होण्यासाठी तसेच वाढीव निधी मिळण्यासाठी प्रयत्न करावा.

महिला व बालविकास विभागाबरोबर विभागीय आयुक्त, विभागीय स्तरावरील वरिष्ठ पोलीस अधिकारी यांची संयुक्त बैठक व्हावी. यामध्ये महिला विकास मंचच्या बैठकीतील मागणीबाबत काय अंमलबाजवणी होत आहे याचा दर तीन महिन्यांनी अहवाल सादर केला जावा. जेणेकरून महिला सक्षमीकरणासाठी सुरू असलेल्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी मदत होईल असे डॉ. गोऱ्हे म्हणाल्या.

तसेच महिला व बालविकास विभागाला तीनशे कोटी रुपयांची तरतूद वाढवून दिली जावी. जेणेकरून कोविडमुळे, शेतकरी आत्महत्येमुळे ज्या महिला विधवा झाल्या आहेत, शहरी भागात ज्या महिला एकट्या आहेत त्यांना निर्वाह भत्ता म्हणून दर महिन्याला ठराविक रक्कम देता येईल अशी अपेक्षा उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केली.

उपसभापती मा.नीलमताई गोऱ्हे यांनी लक्ष घातल्याने महिला धोरण पूर्ण करण्यात यश आले असल्याचे महिला व बालविकास मंत्री मा. मंगलप्रभात लोढा यांनी बैठकीत आवर्जून सांगितले.

Share This News

Related Post

Pune News: ज्येष्ठांचा सन्मान हीच आमची संस्कृती : मुरलीधर मोहोळ

Posted by - April 22, 2024 0
पुणे : आपल्या वडिलांनी दिलेल्या वचनाची पूर्तता करण्यासाठी श्रीरामांनी आपल्या राज्याचा चौदा वर्ष त्याग केला. माता शबरीची उष्टी बोरं खावून…
loksabha

Loksabha Election : पश्चिम महाराष्ट्रातील ‘या’ लोकसभा मतदारसंघांवर असणार साऱ्यांचं लक्ष

Posted by - May 31, 2024 0
पुणे : सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) सातव्या टप्प्यातील मतदान 1 जून रोजी पार पडणार असून मतमोजणी ही 4 जून…
Murlidhar mohol

Murlidhar Mohol : ‘जलने वालो को खबर कर दो, अब हम ट्रेंडिंग मे आ रहै है’; मुरलीधर मोहोळ यांचा नेमका रोष कोणावर?

Posted by - March 12, 2024 0
पुणे : राज्यात सध्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी महायुतीकडून जागावाटपाची चर्चा सुरु आहे. अनेक बैठका घेतल्या जात आहेत. त्यातच पुणे आणि बारामतीकडे…

धर्माबाबत असलेल्या भावनांचं प्रदर्शन नको – शरद पवार

Posted by - April 25, 2022 0
राष्ट्रपती राजवट लावण्याच्या टोकापर्यंत कुणीही जाणार नाही, असा विश्वास व्यक्त करतानाच प्रत्येकानं आपल्या धार्मिक भावना स्वतःपर्यंत मर्यादित ठेवाव्यात. धर्माबद्दल असलेल्या…
Lok Sabha Elections

Lok Sabha Election : तरुणाने चक्क 8 वेळा केले भाजपला मतदान; Video व्हायरल होताच विरोधकांनी व्यक्त केला संताप

Posted by - May 20, 2024 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल (Lok Sabha Election) होताना दिसत आहे. या…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *