राज्यात ऑक्टोबरमध्ये २१ हजार बेरोजगार उमेदवारांना रोजगार – कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा

143 0

मुंबई : कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांद्वारे राज्यात विविध कंपन्या, कॉर्पोरेट संस्था, उद्योग यांमध्ये ऑक्टोबर २०२२ मध्ये २१ हजार ५२५ बेरोजगार उमेदवारांना रोजगार मिळवून देण्यात आला असल्याची माहिती कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली. महास्वयंम वेबपोर्टल, ऑनलाईन रोजगार मेळावे आदी विविध उपक्रमांद्वारे राज्यात नोकरीइच्छूक उमेदवार आणि विविध कंपन्या, कॉर्पोरेट संस्था, उद्योग यांची सांगड घालून रोजगार उपलब्ध करुन देण्यात येतो, असे त्यांनी सांगितले.

मंत्री श्री. लोढा म्हणाले की, बेरोजगार उमेदवार आणि उद्योजक यांच्यामध्ये सांगड घालण्यासाठी विभागाने https://rojgar.mahaswayam.gov.in हे वेबपोर्टल सुरु केले आहे. या वेबपोर्टलवर बेरोजगार उमेदवार आपले शिक्षण, कौशल्ये, अनुभव आदी माहीतीसह नोंदणी करतात. त्याचबरोबर कुशल उमेदवारांच्या शोधात असलेल्या कंपन्या, उद्योजक, कॉर्पोरेट्स हे सुद्धा या वेबपोर्टलवर नोंदणी करुन त्यांना हवे असलेले कुशल उमेदवार शोधू शकतात. नोकरीइच्छूक उमेदवारांनी या वेबपोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे. विभागामार्फत जिल्ह्यांमध्ये वेळोवेळी ऑनलाईन रोजगार मेळाव्यांचेही आयोजन करण्यात येते.

नोंदणीकृत उद्योगांमध्ये नोकरीची संधी

विभागाकडे तसेच महास्वयंम वेबपोर्टलवर आतापर्यंत ९९ हजार १५१ इतक्या सार्वजनिक व खाजगी उद्योजकांनी नोंदणी केली आहे. यापैकी अनेक उद्योजक आवश्यकतेनुसार त्यांच्याकडील रिक्त पदांची भरती महास्वयंम वेबपोर्टल तसेच कौशल्य विकास विभागाचे ऑनलाईन मेळावे आदी उपक्रमांमधून वेळोवेळी करतात. त्यामुळे नोकरीइच्छूक उमेदवारांना कौशल्य विकास विभागाच्या उपक्रमांमधून नोकरी मिळविण्यासाठी चांगले व्यासपीठ उपलब्ध झाले आहे, असे मंत्री श्री. लोढा यांनी सांगितले.

मंत्री श्री. लोढा म्हणाले की, माहे ऑक्टोबर २०२२ मध्ये विभागाकडे ४५ हजार ६०६ इतक्या नोकरीइच्छूक उमेदवारांनी नवीन नोंदणी किंवा पुनर्नोंदणी केली आहे. यात मुंबई विभागात ७ हजार ४९५, नाशिक विभागात ४ हजार १७५, पुणे विभागात २३ हजार ९२६, औरंगाबाद विभागात ५ हजार ८७८, अमरावती विभागात १ हजार ७२२ तर नागपूर विभागात २ हजार ४१० बेरोजगार उमेदवारांनी नोंदणी केली.

माहे ऑक्टोबरमध्ये कौशल्य विकास विभागाच्या विविध उपक्रमांद्वारे २१ हजार ५२५ उमेदवार नोकरीस लागले. यामध्ये मुंबई विभागात ४ हजार ४५५, नाशिक विभागात १ हजार ३६२, पुणे विभागात १२ हजार ६२२, औरंगाबाद विभागात २ हजार ७३९, अमरावती विभागात ३१६ तर नागपूर विभागात ३१ बेरोजगार उमेदवार नोकरीस लागले.

नोकरीइच्छूक उमेदवारांनी कौशल्य विकास विभागाच्या https://rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर नोंदणी करावी, असे आवाहन मंत्री श्री. लोढा यांनी केले आहे.

Share This News

Related Post

Pune-PMC

Property Tax : पुणेकरांना दिलासा! महापालिकेकडून मिळकत कर भरण्यासाठी देण्यात आली मुदतवाढ

Posted by - July 31, 2023 0
पुणे : पुणे महापालिकेच्या मिळकत कर (Property Tax) विभागाचा सर्व्हर डाऊन झाल्याने नागरिकांची मोठ्या प्रमाणत गोची झाली. सर्वसाधरण करामधील 5…

15 वर्षे भाजपच्या नगरसेवकांना पाडूनच नगरसेवक होतोय – वसंत मोरे

Posted by - April 12, 2022 0
कोरोना काळातील मनसेच्या खळ्ळखट्याकनंतर सरकारचा कारभार सुधारला. पुण्यातील माझं काम पाहून गेल्या चार पाच दिवसात अनेक पक्षांकडून ऑफर आल्या. मग…

संभाजीराजे यांनी आज घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; ‘या’ महत्त्वाच्या विषयावर झाली चर्चा, वाचा सविस्तर

Posted by - January 10, 2023 0
मुंबई : आज छत्रपती संभाजी राजे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी ही भेट झाली.…
Invitation card

Ajit Pawar : अजित पवारांची नवी खेळी ! बीडच्या सभेपूर्वीची ‘ती’ निमंत्रण पत्रिका व्हायरल

Posted by - August 27, 2023 0
बीड : अजित पवार (Ajit Pawar) गटाची आज पहिली जाहीर सभा बीडमध्ये होणार आहे. या (Ajit Pawar) सभेचे कृषीमंत्री धनंजय…

#MPSC च्या विद्यार्थ्यांना आणखी एक दिलासा; EWS प्रमाणपत्राची अट शिथिल, वाचा सविस्तर बातमी

Posted by - March 24, 2023 0
MPSC च्या विद्यार्थ्यांना राज्य शासनाने मोठा दिलासा दिला आहे. विद्यार्थ्यांना आणखी एक मोठा दिलासा मिळाला आहे. EWS प्रमाणपत्राची अट आता…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *