विद्युत रोषणाई ,फुलांची आरास शिवदर्शनचे श्री लक्ष्मीमाता मंदिर नवरात्रौसाठी सज्ज

243 0

पुणे : पुण्यातील शिवदर्शन परिसरातील श्री लक्ष्मीमाता मंदिर नवरात्रौनिमित्त सज्ज होत असून संपूर्ण मंदिराला नव्या रंगाने झळाळी आली आहे. मंदिराभवती आकर्षक भव्य कमानी उभारण्यात आल्या असून प्रशस्त मंडपही उभारण्यात आला आहे. मंदिरावर एल.ई .डी. लाईट्ससह आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असून नैसर्गिक विविध सुवासिक लाखो फुलांची आरास मंदिरावर करण्यात येत आहे.

मंदिराचे प्रांगण आकर्षक रांगोळीने सजवले जात असून मंदिर परिसरात सुगंधित फवारे मारण्यात येत आहेत. या व्यतिरिक्त मंदिराच्या भोवतालच्या परिसराची स्वच्छताही करण्यात आली आहे.

मंदिरातील श्री लक्ष्मीमातेची संगमरवरी मूर्ती अधिक तेजोमय दिसत आहे. येथे पूजा व आरतीचे साहित्य तयार असून धूप व उदबत्त्यांच्या मधुर वासांमुळे साऱ्या मंदिर परिसरात मांगल्याचे वातावरण निर्माण झाले आहे. सोमवार दि. २६ सप्टेंबर रोजी पुणे नवरात्रौ महोत्सवाचे आयोजक अध्यक्ष आबा बागुल व पुणे नवरात्रौ महिला महोत्सवाच्या अध्यक्ष सौ. जयश्री बागुल यांच्या हस्ते सकाळी ६.३० वाजता विधिवत घटस्थापना संपन्न होईल. श्री लक्ष्मीमातेला सोन्याच्या मुगुट, विविध सोन्याचे दागिने व सोन्याची आभूषणे यांसह चांदीची साडी यांनी सजवण्यात आले आहे.

येथे रोज सकाळी व संध्याकाळी श्री लक्ष्मीमातेची आरती तसेच प्रसाद वाटप होत असून नवरात्रौच्या कालावधीत रोज अनेक महिला मंडळांची भजने संपन्न होणार आहेत. अष्टमीला होमही करण्यात येणार आहे. हे मंदिर भाविकांसाठी रोज सकाळी ६.०० ते रात्री १०.०० पर्यंत खुले असणार आहे.

सुरक्षेच्या दृष्टीने येथे कॅमेरे बसवण्यात आले असून पोलीस बंदोबस्तही चोख असणार आहे. याच मंदिराच्या प्रांगणात पुणे नवरात्रौ महिला महोत्सवाचे दि. २८ सप्टेंबर रोजी उद्घाटन होणार असून भाग्यलक्ष्मी स्पर्धांमधील विविध स्पर्धा, सामुहिक आरती आणि सामुहिक श्रीसूक्त पठण होणार आहे अशी माहिती पुणे नवरात्रौ महोत्सवाचे आयोजक अध्यक्ष आबा बागुल यांनी दिली.

Share This News

Related Post

‘MITWPU’ चौथ्या राष्ट्रीय माध्यम व पत्रकारिता परिषदेचा समारोप

Posted by - November 12, 2022 0
पुणे : “समाजाच्या, देशाच्या हितासाठी सत्ताधाऱ्यांना सत्याचा आरसा दाखवण्याचे दायित्व माध्यमांवर आहे. ट्वेन्टी-ट्वेन्टी, व्हायरल न्यूजमध्ये न अडकता पत्रकारांनी सत्यनिष्ठतेवर, दुसऱ्यांच्या…

2G स्पेक्ट्रम घोटाळा खटल्यात विशेष सरकारी वकील ते भारताचे सरन्यायाधीश; कोण आहेत उदय लळीत

Posted by - August 4, 2022 0
नवी दिल्ली: न्‍यायमूर्ती लळीत हे देशाचे ४९ वे सरन्‍यायाधीश ठरतील. २६ ऑगस्‍ट रोजी एन. व्‍ही. रमणा सेवानिवृत्त होत आहे. सरन्‍यायाधीश…

…. म्हणून मुख्यमंत्री शिवजयंतीला शिवनेरीवर येणार नाहीत

Posted by - February 12, 2022 0
मुंबई- महाराष्ट्राचे आराध्यदैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. यंदा मात्र शिवजयंतीला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव…

अपुऱ्या पगारामुळे पुणे महानगरपालिकेच्या शाळांकडे शिक्षकांनी फिरवली पाठ

Posted by - September 15, 2022 0
पुणे : राष्ट्रवादी अर्बन सेलच्या वतीने सातत्याने यासंदर्भात पाठपुरावा केला जात आहे. यापूर्वीही शाळा सोडल्याचा दाखल्याविना मनपा शाळेत प्रवेश द्यावा…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *