मोठी बातमी! राष्ट्रपतीपदासाठी या तारखेला होणार मतदान

296 0

नवी दिल्ली- निवडणूक आयोगाने भारताच्या 15 व्या राष्ट्रपतींच्या निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार राष्ट्रपतीपदाची निवडणूक 18 जुलै रोजी होणार असून मतमोजणी 21 जुलै रोजी होणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी आज राष्ट्रपती निवडणुकीचे तपशीलवार वेळापत्रक जाहीर केले.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ 24 जुलै 2022 रोजी संपत आहे. याआधी देशाच्या पुढील आणि 15व्या राष्ट्रपतींची निवड होणार आहे. गेल्या 45 वर्षांपासून याच निवडणुक पद्धतीने राष्ट्रपतींची देशाच्या सर्वोच्चपदी निवड होत आहे. 17 जुलै 2017 रोजी अखेरच्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुका झाल्या. राष्ट्रपती निवडण्यासाठी सामान्य लोक मतदान करत नाहीत. तर त्यासाठी जनतेने निवडून दिलेले प्रतिनिधी आणि वरच्या सभागृहातील लोकप्रतिनिधी मतदान करतात. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत दोन्ही सभागृहांचे सदस्य लोकसभा आणि राज्यसभेतील सदस्य मतदान करतील.

असा असेल निवडणूक कार्यक्रम

15 जून अधिसूचना जारी होणार

29 जून उमेदवारी अर्ज भरण्याची अखेरची तारीख

2 जुलैपर्यंत अर्ज मागे घेता येणार

18 जुलै, मतदान

21 जुलै मतमोजणी

दरम्यान या निवडणुकीसाठी राजकीय पक्षांना मतदारांना व्हीप लागू करता येणार नाही असे स्पष्ट निर्देश निवडणूक आयोगाकडून देण्यात आले आहेत

Share This News

Related Post

चिंचवड विधानसभा पोटनिवडणूकीसाठी निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती

Posted by - February 7, 2023 0
पुणे : जिल्ह्यातील २०५- चिंचवड विधानसभा पोटनिवडणूकीसाठी निवडणूक निरीक्षक, निवडणूक पोलीस निरीक्षक आणि निवडणूक खर्च निरीक्षकाची नियुक्ती करण्यात आली असल्याची…

शिवसेनेला मोठा धक्का! राष्ट्रवादीवर आरोप करत ठाणे जिल्हाप्रमुखाचा राजीनामा

Posted by - June 26, 2022 0
शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे राज्याचं राजकारण ढवळून निघालं असून शिंदे यांच्यासोबत ४० हून अधिक आमदार असल्याने शिवसेनेला मोठा…
Raigad News

Raigad News : 2 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या तरुणाचा नदीत आढळला मृतदेह; प्रचंड खळबळ

Posted by - August 29, 2023 0
रायगड : रायगड (Raigad News) जिल्ह्यात पनवेल तालुक्यातील दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या 14 वर्षीय चिमुकल्याचा मृतदेह सापडल्याने (Raigad News) मोठी…

#INF0RMATIVE : अटकपूर्व आणि नियमित जामीन म्हणजे काय; वाचा हि माहिती

Posted by - February 23, 2023 0
अनेकदा आपण ऐकतो की राजकारणी आणि अनेकांना न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केला आहे किंवा कोणीतरी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे.…
Suspension of MP

Suspension of MP : सभापतींनी विरोधी पक्षाच्या 15 खासदारांचं केलं निलंबन

Posted by - December 14, 2023 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लोकसभेतील 15 खासदारांचं निलंबन (Suspension of MP) करण्यात आलं आहे. सभागृहाच्या कामकाजात व्यत्यय आणल्यामुळे त्यांच्यावर…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *