CM Eknath Shinde : लव्ह जिहाद विरोधी कायदा करणार; धर्मांतर समस्येविषयी सरकार गंभीर

384 0

नागपूर : लव्ह जिहादच्या विरोधात महाराष्ट्र शासन निश्चिपणे कायदा करणार आहे, तसेच धर्मांतर समस्येविषयी शासन गंभीर आहे, असे स्पष्ट आश्वासन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘हिंदु जनसंघर्ष मोर्च्या’च्या शिष्टमंडळाला विधानभवनात दिले.

या शिष्टमंडळात बाळासाहेबांची शिवसेनेचे मुख्य प्रतोद आणि आमदार श्री. भरतशेठ गोगावले, आमदार श्री. महेंद्र दळवी, भाजपचे माजी मंत्री डॉ. परिणय फुके, शिवसेनेचे माजी खासदार श्री. आनंदराव अडसूळ, अखिल भारतवर्षीय माहेश्वरी महासभाचे श्री. श्यामसुंदर सोनी, ब्राह्मण संघटनेचे श्री. आनंद घारे, हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड संघटक श्री. सुनील घनवट तथा समितीचे विदर्भ समन्वयक श्री. श्रीकांत पिसोळकर उपस्थित होते. या आंदोलनाची माहिती मिळताच मुख्यमंत्र्यांनी आंदोलकांना बोलावून घेऊन त्यांचे म्हणणे विस्तृतपणे समजून घेतले. या वेळी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने प्रकाशित ‘लव्ह जिहाद’ हा ग्रंथ मुख्यमंत्र्यांना भेट देण्यात आला, तसेच ‘लव्ह जिहाद’ची भीषणता सांगण्यात आली.

आंदोलनाच्या ठिकाणी भाजपचे चाळीसगाव येथील आमदार श्री. मंगेश चव्हाण, बाळासाहेबांची शिवसेनेचे आमदार सर्वश्री महेंद्र थोरवे, भरतशेठ गोगावले, महेंद्र दळवी, भाजपचे माजी मंत्री डॉ. परिणय फुके, विश्व महावीर ट्रस्टचे संस्थापक जैनमुनी नीलेशचंद्र महाराज, सनातन संस्थेचे संत पूजनीय अशोक पात्रीकर, सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस, तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते. या वेळी अनेक मान्यवरांनी मार्गदर्शन केले.

हिंदू युवती श्रद्धा वालकरचे आफताबने 35 तुकडे केल्याचे प्रकरण शांत होत नाही, तोच झारखंड राज्यातील एका हिंदू तरुणीचे दिलदार अन्सारीने 50 तुकडे केल्याची अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे; तसेच छळ, बळ, कपट करून चालेल्या धर्मांतरामुळे देशातील 28 पैकी 9 राज्यांत हिंदू अल्पसंख्यांक झाले आहेत. भारतात आणखी तुकडे होऊ नयेत, यासाठी हिंदु जनजागृती समिती आणि समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना यांनी नागपूर विधान भवनावर काढलेल्या ‘हिंदु जनसंघर्ष मोर्च्या’द्वारे महाराष्ट्र सरकारकडे कठोर अशा ‘लव्ह जिहाद’ आणि ‘धर्मांतर’ विरोधी कायद्यांची मागणी करण्यात आली. या मोर्च्यामध्ये महिला अन् युवतींचा मोठा सहभाग होता. या मोर्च्यासाठी विदर्भासह महाराष्ट्रातून हजारोंच्या संख्येने आलेल्या हिंदूंनी हातात भगवे झेंडे घेऊन ‘हर हर महादेव’, ‘जय श्रीराम’चा उद्घोष करत संपूर्ण नागपूर आज भगवेमय केले होते.

या मोर्च्यात संत, महंत, धर्माचार्य, वारकरी संप्रदाय, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदु परिषद, बजरंग दल, आंतरराष्ट्रीय हिंदु परिषद, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ, पूज्य शदानी दरबार, राष्ट्रीय युवा गठबंधन, राजपूत करणी सेना, विश्व सनातन संघ, नाथुराम हिंदु महासभा, अखिल विश्व सरयूपारिण ब्राह्मण महासंघ, वैश्य एकता परिषद, राष्ट्रीय वारकरी परिषद, राष्ट्रसेविका समिती, वनवासी कल्याण आश्रम, पुरोहित महासंघ, धर्मवीर आध्यात्मिक आघाडी, जैन संघटना, स्वामी समर्थ संप्रदाय, श्री संप्रदाय, इस्कॉन, गायत्री परिवार, हिंदु विधीज्ञ परिषद, रणरागिणी, सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती या संघटनांसह भाजप, बाळासाहेबांची शिवसेना, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे अन् अन्य पक्षांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मोर्च्यात महिला पथक, भगवा ध्वजपथक, अधिवक्ते, कीर्तनकार, उद्योजक आदी शिस्तबंध पद्धतीने सहभागी झाले होते. यशवंत स्टेडियम येथून निघालेला मोर्चा महाराष्ट्र बँक, झाशी राणी चौक, व्हरायटी चौक, फ्रीडम पार्क मार्गे नागपूर विधान भवनाजवळ विसर्जित झाला.

हातात घेतलेल्या फलकांद्वारे ‘हिंदु युवतींनो लव्ह जिहादच्या षड्यंत्राला बळी पडू नका’, ‘आफताबला फाशी द्या’, ‘धर्मांतर हे राष्ट्रांतर’, ‘धर्मांतर हिंदूंना पुन्हा स्वधर्मात आणा’, ‘आंतरधर्मीय विवाह नोंदणी न्यायालयात करून ते लव्ह जिहाद आहे का? ते तपासा’, ‘लव्ह जिहादची विषवल्ली ठेचा’, ‘लव्ह जिहादसाठी होणारा अर्थपुरवठा व त्याद्वारे होणार्‍या आतंकवादी कारवायांची चौकशी करा’, ‘लव्ह जिहाद व धर्मांतर रोखण्यासाठी पोलिसांची विशेष शाखा स्थापन करा’ आदी विविध मागण्या करण्यात आल्या. या विषयी घोषणाही देण्यात आल्या.

Share This News

Related Post

Coal Scam

Coal Scam: दर्डा पिता- पुत्रांना 4 वर्षांचा कारावास; दिल्ली विशेष न्यायालयाचा निकाल

Posted by - July 26, 2023 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोळसा घोटाळ्याप्रकरणी (Coal Scam) दिल्ली विशेष न्यायालयाने आज विजय दर्डा आणि देवेंद्र दर्डा या पिता-…

महत्वाची बातमी !मालवणच्या तारकर्लीमध्ये पर्यटकांनी भरलेली बोट समुद्रात बुडाली. दोघांचा मृत्यू

Posted by - May 24, 2022 0
सिंधुदुर्ग- मालवणच्या तारकर्लीमध्ये पर्यटकांनी भरलेली बोट समुद्रात बुडाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या बोटीत एकूण 20 पर्यटत होते. त्यापैकी दोघांचा…
Amravati Accident News

Amravati Accident News : एक डुलकी 14 जणांच्या जीवावर बेतली! दीक्षाभूमीवर जाणाऱ्या अनुयायांचा समृद्धी महामार्गावर भीषण अपघात

Posted by - October 24, 2023 0
अमरावती : राज्यात अपघाताचे (Amravati Accident News) प्रमाण वाढतच चालले आहे. त्यातच समृद्धी महामार्ग हा अपघाताचा हॉटस्पॉट बनला आहे. समृद्धी…
Maratha Reservation

Maratha Reservation : माझं बलिदान व्यर्थ जाऊ नये; म्हणत मराठा आरक्षणासाठी 9 वीच्या विद्यार्थिनीने उचलले ‘हे’ पाऊल

Posted by - November 18, 2023 0
नांदेड: सध्या राज्यात मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा चांगलाच गाजताना दिसत आहे. एकीकडे आरक्षणासाठी आंदोलन सुरु असताना दुसरीकडे मात्र काही…

होळी, धुळवड साजरी करण्याबाबतची नियमावली मागे, ठाकरे सरकारचा निर्णय

Posted by - March 17, 2022 0
मुंबई- होळी आणि धुळवड साजरी करण्यावर राज्य सरकारकडून काही निर्बंध लागू करण्यात आले होते. मात्र या निर्बंधाला विरोधकांकडून होत असलेला…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *