शिवसेनेचे 8 मंत्री… शिंदे गटात मारली एन्ट्री ! (संपादकीय)

429 0

12 पैकी 8 गेले; उरले किती ? 12 – 8 = 4 अहो, ही गळती शिवसेनेतील मंत्र्यांची आहे बरं का ! मविआ सरकारमधील मुख्य घटक पक्ष असलेल्या शिवसेनेत एकूण 12 मंत्री होते पण 20 जून रोजी शिवसेनेत बंड झालं आणि एकेक करत मंत्री, आमदार तसेच शिवसेना समर्थक अपक्ष आमदार शिंदे गटात सामील झाले. आता या शिंदे गटात एकूण 8 मंत्री दाखल झाल्यानं शिवसेनेत आजघडीला अवघे 4 मंत्री उरले आहेत.
……………………………..

शिवसेनेच्या 12 मंत्र्यांपैकी 8 जण बंडाच्या छावणीत

20 जून रोजी शिवसेना नेते, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारलं आणि स्वपक्षाला म्हणजे शिवसेनेलाच खिंडार पाडलं. एकनाथ शिंदे सुरुवातीला काही आमदार सोबत घेऊन बाहेर पडले खरे पण त्यानंतर शिंदे गटाचा फुगवटा वाढतच गेला. आज या शिंदे गटात 8 मंत्र्यांसह 47 आमदार आहेत. या मंत्र्यांमध्ये शिवसेनेच्या तब्बल 6 मंत्र्यांचा समावेश असून उरलेले 2 मंत्री शिवसेना समर्थक अपक्ष आमदार आहेत.

शिंदे गटात सामील झालेले मंत्री (08) : एकनाथ शिंदे, शंभूराज देसाई, संदीपान भुमरे, गुलाबराव पाटील, दादा भुसे, उदय सामंत, बच्चू कडू, राजेंद्र पाटील यड्रावकर

शिवसेनेकडे उरलेले मंत्री (04) : आदित्य ठाकरे, शंकरराव गडाख, सुभाष देसाई, अनिल परब
………………………..

4 मंत्र्यांसह उरले 17 आमदार; शिवसेनेला पडलं खिंडार

सन 2019 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे 56 आमदार निवडून आले. त्यापैकी एका आमदाराचं निधन झाल्यानं शिवसेनेचं आताचं संख्याबळ 55 इतकं आहे. त्यापैकी तब्बल 38 आमदार आता शिंदे गटात सामील झाले आहेत. याचा अर्थ शिवसेनेकडे आता अवघे 17 आमदार उरले आहेत शिवाय 9 अपक्ष आमदार देखील या गटात डेरेदाखल झाल्यानं शिंदे गटाचा आकडा सध्या 47 वर जाऊन पोचलाय.
…………………………
बंडाची छावणी आणि शिवसेनेची फाळणी

एकेक आमदार आणि मंत्री शिंदेंनी केलेल्या बंडाच्या छावणीत डेरेदाखल झाल्यानं शिवसेनेला फाळणीला सामोरं जावं लागलंय. तिकडं बंडखोर आमदारांना निलंबनाच्या नोटिसा मिळाल्या असल्या तरी शिंदे गटात शिवसेनेचे दोन तृतीयांश आमदार दाखल झाल्यानं शिंदे गटाचं पारडं जड असल्याचं दिसून येतंय. बंडखोर आमदारांवरील निलंबनाच्या करवाईविरोधात शिंदे गटानं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतलीये. शिवसेनेत माजलेली ही दुफळी आता काय इतिहास घडवणार हे येणारा काळच ठरवेल.

 

 

 

 

– संदीप चव्हाण
वृत्तसंपादक
TOP NEWS मराठी

Share This News

Related Post

बारावीचा निकाल जाहीर, राज्याचा निकाल 94.22 टक्के यंदाही मुलींची बाजी, कोकण विभाग अव्वल

Posted by - June 8, 2022 0
पुणे – महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून मार्च-एप्रिल 2022 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल आज…

रावणाचा जीव बेंबीत तर काहींचा मुंबईत, मुख्यमंत्र्यांचा देवेंद्र फडणवीसांना टोला

Posted by - March 25, 2022 0
मुंबई – रावणाचा जीव जसा बेंबीत होता. मात्र काही जणांना केंद्रात सरकार मिळाले तरी त्यांचा जीव मुंबईत आहे, अशी खोचक…

आधी प्रकल्पाची जागा दाखवा, मगच आंदोलन करा ! आदित्य ठाकरेंना भाजपचे आव्हान

Posted by - September 23, 2022 0
मुंबई : घराण्याच्या वारशातून शिवसेनेचे नेतेपदाची माळ गळ्यात पडलेले आदित्य ठाकरे यांच्या वेदान्ता फॉक्सकॉन प्रकल्पाविषयीच्या आक्रोशाचे पितळ येत्या शनिवारी ते…

हवामान विभाग : 122 वर्षांचा विक्रम मोडला ! फेब्रुवारीतच सरासरी तापमान 29.5 डिग्री , सांभाळा !

Posted by - March 1, 2023 0
महाराष्ट्र : महाराष्ट्र 2023 मध्ये फेब्रुवारी उलटत नाही तो पर्यंतच उष्णतेच्या झळा जाणवू लागल्या आहेत. मागच्या वर्षी थंडी देखील कडाक्याची…

मुख्यमंत्र्यांनी ‘धर्मवीर’ पाहिला , पण सिनेमाचा शेवट न पाहताच निघून गेले असे का ?

Posted by - May 16, 2022 0
मुंबई- शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित ‘धर्मवीर-मुक्काम पोस्ट ठाणे’ हा सिनेमा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाहिला. पण…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *