महत्वाची बातमी ! एकनाथ शिंदे गट आज दुपारी गोव्याकडे रवाना होणार ! काय आहे पुढील प्लॅन ?

343 0

गुवाहाटी- शिवसेनेच्या बंडखोर आमदारांचा गट आज गुवाहाटी येथून आज दुपारी साडेतीन वाजता गोव्याच्या दिशेने रवाना होत असल्याची माहिती समोर आली आहे. यासाठी गोव्यातील ताज कन्व्हेन्शन हॉटेलमध्ये 71 खोल्याही बुक करण्यात आल्या आहेत. त्यानंतर उद्या सकाळी गोव्याहून मुंबईला येणार असून उद्या होणाऱ्या बहुमत चाचणीसाठी विधान भवनात उपस्थित राहणार आहेत. दरम्यान आज एकनाथ शिंदे गटाने गुवाहाटी येथील कामाख्या देवीचे दर्शन घेतले. दरम्यान शिंदे गटाकडून आसाम पूरग्रस्तांसाठी ५१ लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे.

महाराष्ट्रातील राजकारणात मोठा भूकंप करत एकनाथ शिंदे यांनी सूरतमार्गे गुवाहाटी गाठलं. यानंतर शिंदे यांच्या समर्थनार्थ शिवसेनेतील अनेक दिग्गज नेते आणि आमदारांनी गुवाहाटी गाठलं. आसाममधील भीषण पूरस्थिती आणि तिथं हॉटेलमध्ये थांबलेल्या या शिवसेना आमदारांवर टीका देखील झाली. तिथल्या काही स्थानिकांनी याविरोधात निदर्शनं देखील केली होती.

आज हे सर्व बंडखोर आमदार गुवाहाटीमधून निघणार आहेत.  सगळे आमदार बाराच्या सुमारास कामाख्या देवीच्या दर्शनासाठी जाणार आहेत. तिथून दर्शन केल्यानंतर तीनच्या सुमारास गुवाहाटी विमानतळावर पोहोचणार आहेत. तिथून ते गोव्याला पोहोचणार असल्याची माहिती आहे. याआधी शिंदे यांनी आसाममधील पूरग्रस्तांना 51 लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा केली आहे.

Share This News

Related Post

Pandharpur Temple

Pandharpur News : कार्तिकी एकादशीला कोणत्याच उपमुख्यमंत्र्यांना पुजेचा मान नाही, विठ्ठल मंदिर समितीचा निर्णय

Posted by - November 8, 2023 0
पंढरपूर : कार्तिकी एकादशीला पंढरपूरमध्ये विठ्ठलाच्या शासकीय महापुजेचा मान कोणाला द्यायचा यावर पेच निर्माण झाला होता. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सकल…
State Government

Mumbai High Court : ’12 आमदारांच्या नियुक्तीबाबत 10 दिवसांत प्रतिज्ञापत्र सादर करा’; हायकोर्टाचे सरकारला निर्देश

Posted by - July 31, 2023 0
मुंबई : राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या नियुक्तीबाबत 10 दिवसांत प्रतिज्ञापत्र सादर करा असे आदेश मुंबई हायकोर्टाने (Mumbai High Court) राज्य…
Yavatmal News

Yavatmal News : गणपती विसर्जनादरम्यान मोठी दुर्घटना; 20 वर्षीय गणेशभक्ताचा दुर्दैवी मृत्यू

Posted by - September 29, 2023 0
यवतमाळ : यवतमाळमध्ये (Yavatmal News) गणपती विसर्जनादरम्यान एक मोठी दुर्घटना घडली आहे. काल सगळीकडे अंनत चतुर्दर्शी निमित्त गणेशभक्त जड अंतःकरणाने…
Amol Kolhe

Lok Sabha Election Result 2024 Live Updates : शिरूरमधून अमोल कोल्हे ६,११६ मतांनी आघाडीवर

Posted by - June 4, 2024 0
शिरूर : शिरूर मतदारसंघाकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. या मतदार संघाचे कल यायला सुरुवात झाली आहे. शिरूर मधून अमोल कोल्हे…
Summer

Weather Update : हाय गर्मी ! हवामान खात्याकडून ‘या’ जिल्ह्यांना देण्यात आला यलो अलर्ट

Posted by - May 2, 2024 0
पुणे : देश पातळीवर सध्या हवामानात (Weather Update) असंख्य बदल होत असून, उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत राज्याराज्यानुसार तापमानाच मोठे चढ उतार होताना…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *