एकनाथ खडसे यांचे पुनर्वसन ! राष्ट्रवादीकडून विधानपरिषदेसाठी एकनाथ खडसे आणि रामराजे नाईक निंबाळकर

390 0

मुंबई- विधानपरिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आणि रामराजे नाईक निंबाळकर याना संधी दिली आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी याबाबत घोषणा केली आहे. विधान परिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शिवाजी गर्जे तिसरा डमी उमेदवार म्हणून अर्ज दाखल करणार असल्याचे समोर आले आहे.

विधानपरिषदेच्या 10 जागांसाठी 20 जूनला निवडणूक होणार आहे. या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर राज्यात खूप महत्त्वाच्या राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत. एकनाथ खडसेंना विधानपरिषदेवर संधी देण्यात येणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती मात्र, त्याच दरम्यान नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचंही बोललं जाऊ लागलं. त्यामुळे खडसेंना संधी मिळणार की नाही याबाबत विविध चर्चा सुरू होत्या. पण अखेर आज राष्ट्रवादी काँग्रेसकडून आपल्या अधिकृत उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत.

एकनाथ खडसे यांचे नाव विधान परिषदेसाठी घोषित झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी खडसेंच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांची गर्दी केली. जळगाव जिल्ह्यातून कार्यकर्ते खडसेंच्या निवासस्थानी दाखल होत आहेत. आपल्याला उमेदवारी दिल्याबद्दल पक्षाचा आभारी असून शरद पवार यांचा विश्वास मी सार्थ करुन दाखवेन अशी भावना खडसे यांनी व्यक्त केली. भाजपनं अडगळीत टाकल्यानंतर राष्ट्रवादीनं हात दिला, असंही खडसे म्हणाले.

अनिल देशमुख, नवाब मलिक यांना मतदानाची संधी मिळेल का ?

राष्ट्रवादीच्या जेलमध्ये असलेल्या सदस्यांच्या दोन मतांचं काय होणार याचा फैसला आज न्यायालयात होणार आहे. माजी मंत्री अनिल देशमुख आणि मंत्री नवाब मलिक यांनी मतदानासाठी जामीन मिळावा म्हणून अर्ज केलाय. त्याला ईडीनं विरोध केलाय. कैद्यांना मतदानाचा अधिकार नाही असा दावा ईडीनं कोर्टात केलाय. त्याला देशमुख आणि मलिकांचे वकील आज उत्तर देणार असून न्यायालयात त्यावर आज निर्णय अपेक्षित आहे.

निवडणुकीच्या रिंगणात पक्षनिहाय उमेदवार

शिवसेना

सचिन अहिर
आमश्या पाडवी

काँग्रेस

भाई जगताप
चंद्रकांत हंडोरे

भाजप

प्रवीण दरेकर
उमा खापरे
श्रीकांत भारतीय
राम शिंदे
प्रसाद लाड (पाचवे उमेदवार)
सदाभाऊ खोत (सहावे उमेदवार)

राष्ट्रवादी

एकनाथ खडसे
रामराजे नाईक निंबाळकर

Share This News

Related Post

Mumbai-Pune Express

Mumbai-Pune Express : मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात; 3 जणांचा मृत्यू

Posted by - May 10, 2024 0
मुंबई : मुंबई-पुणे महामार्गावर खोपोलीजवळ भीषण अपघात झाला आहे. ब्रेक निकामी झाल्यामुळे एका ट्रकनं समोर असलेल्या टेम्पो आणि कारला धडक…

नागपूर ते पुणे प्रवास आठ तासांत होणार शक्य; केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची मोठी घोषणा

Posted by - October 30, 2022 0
नागपूर: सद्यस्थितीत नागपूर ते पुणे हा प्रवास करताना प्रवाशांना होणारा त्रास लक्षात घेऊन केंद्रीय रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी यांनी एक…

पुणे : …आणि पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता संतापले … VIDEO

Posted by - September 10, 2022 0
पुणे : पुण्याच्या गणपती विसर्जन सोहळ्यास यावर्षी चांगलाच विलंब झाला आहे. मानाच्या पाचव्या गणपतीचे विसर्जन देखील शुक्रवारी रात्री उशिरा झाले…
Pankaja Munde

Pankaja Munde : ‘अनेक वेळा नाकारलं तरी माझा…’; पंकजा मुंडेंची कार्यकर्त्यांना भावनिक साद

Posted by - September 10, 2023 0
बीड : भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी 4 सप्टेंबरपासून शिवशक्ती परिक्रमा यात्रेला सुरुवात केली आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यातून…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *