आयटीआयमध्ये नवीन कौशल्यांचे अभ्यासक्रम सुरू करण्याचे प्रयत्न- कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा

316 0

पुणे : जिल्ह्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील पायाभूत सुविधांचा विकास करण्यासह आजच्या काळातील मागणीच्या कौशल्याचे अभ्यासक्रम विकसित करण्यासाठी शासन आणि खासगी क्षेत्राचा सहभाग घेण्यात येईल, असे प्रतिपादन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण विभागीय सहसंचालक चंद्रकांत निनाळे, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागीय आयुक्तालयाच्या उपायुक्त अनुपमा पवार यांच्यासह आयटीआयचे प्राचार्य, उद्योग, लघुउद्योगांचे तसेच लघुउद्योग संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

कोणतेही काम कमीपणाचे नाही हे आताच्या विद्यार्थ्यांच्या मनात बिंबवणे आवश्यक असून त्यादृष्टीने या कामांसाठी आवश्यक कौशल्ये विकसित करण्यावर भर देण्यात यावा, असे सांगून श्री. लोढा म्हणाले, कौशल्य विकासासासाठी शहरातील प्रत्येक प्रभागातील महानगरपालिका तसेच खासगी शाळांचे सहकार्य घेऊन शालेय स्तरावर किमान एक ‘कौशल्य केंद्र’ सुरू करण्याचे नियोजन करावे. त्यासाठी विभागाने संबंधित शाळा, संस्थेबाबत सामंजस्य करण्यासाठी प्रयत्न करावेत.

औद्योगिक प्रशिक्षण केंद्रात शिकवण्यात येणारे काही अभ्यासक्रम कालबाह्य झाले असून उद्योगांच्या मागणीनुसार नवीन अभ्यासक्रमांची रचना करणे आवश्यक आहे. आयटीआयमधून गुणवंत विद्यार्थ्यांना निवडून त्यांच्या नावीन्यपूर्ण कल्पनांना आकार देण्यासाठी इनक्युबेशन सेंटर्समध्ये प्रशिक्षण व सहाय्य देण्यासाठी प्रयत्न करावयाचे आहेत.

पुणे जिल्ह्यातील सर्व आयटीआय अद्ययावत करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीचा निधी तसेच खासगी क्षेत्राचेही योगदान घेण्यासाठी प्रयत्न करण्यात यावेत. कौशल्य विकास, आयटीआयचे अद्ययावतीकरण आदींमध्ये शासनाबरोबर खासगी क्षेत्र कशा पद्धतीने सहभाग देऊ शकेल याबाबत विचार, कल्पनांचे आदान प्रदान करण्यासाठी जिल्हास्तरावर एक समिती स्थापन करावी अशीही सूचना श्री. लोढा यांनी केली. त्यानुसार लघुउद्योग संघटनांनीही पुढाकार घेण्याबाबत सहमती दर्शविली.

Share This News

Related Post

Pune News

Pune News : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले राष्ट्रीय स्मारक आढावा बैठक संपन्न

Posted by - December 10, 2023 0
पुणे : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे भिडेवाडा येथील राष्ट्रीय स्मारक आधुनिक पद्धतीचे (Pune News) करतानाच त्याच्या दृश्य स्वरूपाची सावित्रीबाईंच्या काळात…

‘नवं काहीतरी’: मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं आज पुण्यात व्याख्यान

Posted by - December 28, 2022 0
पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे दोन दिवसीय पुणे दौऱ्यावर असून या पुणे दौऱ्यादरम्यान आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुण्यामध्ये…
Thackeray Brother

Thackeray Brother : ठाकरे बंधू एकत्र येणार का? अमित ठाकरेंच्या उत्तराने वेधले सगळ्यांचे लक्ष

Posted by - July 8, 2023 0
मुंबई : सध्या राज्याच्या राजकारणात मोठी उपलथापालथं पाहायला मिळत आहे. अजित पवार यांनी राष्ट्रवादीतून बंडखोरी केल्यामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली.…

मी ब्राम्हण नसून 96 कुळी मराठा – तृप्ती देसाई यांचा ट्रोलर्सवर पलटवार…

Posted by - May 15, 2022 0
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत अभिनेत्री केतकी चितळे हिने वादग्रस्त पोस्ट केली होती. त्यांनतर या पोस्ट बाबत आणि केतकी चितळेच्या…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन मोदी यांची प्रकृती खालावली; अहमदाबादमधील यूएन मेहता रुग्णालयात दाखल

Posted by - December 28, 2022 0
अहमदाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन मोदी यांची प्रकृती खालावली असल्याची माहिती मिळते आहे.  हिराबेन मोदी यांना अहमदाबाद…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *