ऐकावे आमचे गाऱ्हाणे | एकनाथ म्हणे || (संपादकीय)

355 0

एका बाजूला आपल्या पुत्र-प्रवक्त्यानं वंदनीय बाळासाहेबांच्या शिवसैनिकांना डुकरं, नाल्याची घाण, रेडा, कुत्रे, जाहील व मृतदेह म्हणायचं, त्यांचा बाप काढायचा तर दुसऱ्या बाजूला मात्र हिंदूविरोधी मविआ सरकार वाचवण्यासाठी याच आमदारांना समेटाची हाक द्यायची; याचा अर्थ काय ?
……………………………

काय शब्द ? काय भाषा ? काय बोलणं ?

एकीकडं आमचे पक्षप्रमुख आम्हाला परत या, समोर येऊन बसा, बोलून मार्ग काढू, अशी साद घालतात तर दुसरीकडं त्यांचे पुत्र-प्रवक्ते आमच्याविषयी वाट्टेल ते अपशब्द वापरून आमचा पाणउतारा करतात, हे कितपत योग्य आहे ? आम्ही कालही शिवसैनिक होतो, आजही शिवसैनिक आहोत आणि उद्याही शिवसैनिकच राहू, असं घसा फोडून फोडून सांगतोय पण काल-परवा काय आम्ही राज्याबाहेर गेलो तर यांच्यासाठी इतके वाईट ठरलो ? आम्ही लगेच गद्दार झालो ? आता आमचे मृतदेहच परत येतील, बरं झालं शिवसेनेतली घाण गेली… ही काय भाषा आहे ? शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी पत्रातून आणि एकनाथ शिंदेंनी ट्विट करून अखेर आपली खंत बोलून दाखवली.
……………………
हा असला कसला प्रवक्ता ? संजय राऊतांना आवरा..!

सुबह का भुला शाम को घर आया तो उसे भुला नहीं कहते, असं नुसतं म्हणायचंच असतं का ? आपल्या घरातली भांडणं अशी रस्त्यावर जाऊन सोडवायची नसतात तर ती घरात राहूनच सोडवायची असतात. राऊतांच्या तोंडून एकामागून एक निघणारी बेछूट विधानं शिंदे गटाच्या इतकी जिव्हारी लागलीत की, ‘आमच्या मतावर राज्यसभेवर निवडून गेला आहात; हिंमत असेल तर राजीनामा द्या,’ असं म्हणत संजय राऊतांवर हल्ला चढवलाय.
शरद पवारांच्या गळ्यातील ताईत बनलेल्या या संजय राऊतांनी शिवसेना संपवण्याचा विडाच उचललाय जणू ! आपले पुत्र देखील आता त्यांच्या नादी लागून त्यांच्याच तोंडची भाषा बोलत आहेत हे आपण कधी लक्षात घेणार ?
………………………
ऐकावे आमचे गाऱ्हाणे | एकनाथ म्हणे ||

राष्ट्रवादी-काँग्रेसशी नातं तोडा, मविआतून बाहेर पडा आणि शिवसेनेला भाजपशी जोडा तर आणि तरच हिंदुत्व टिकेल इतुकेच काय ते सांगणे… आपण म्हणता समेट करावी | पुत्र-प्रवक्ते बरळ ओकावी | कशी उरावी सहनशक्ती | एकनाथ म्हणे ||

आपला नम्र,
– एकनाथ म्हणे

– संदीप चव्हाण
वृत्तसंपादक
TOP NEWS मराठी

Share This News

Related Post

Siddaramaiah

सिद्धरामय्या कर्नाटकाचे नवे मुख्यमंत्री; दुसऱ्यांदा घेतली शपथ

Posted by - May 20, 2023 0
कर्नाटक : कर्नाटकमध्ये विधानसभा निवडणुकीत (Karnataka Assembly Elections) काँग्रेसने (Congress) एकतर्फी विजय मिळवत भाजपला (BJP) धूळ चारली होती. यानंतर काँग्रेसमध्ये…

ठरलं ! आदित्य ठाकरे ‘या’ दिवशी जाणार अयोध्या दौऱ्यावर

Posted by - May 8, 2022 0
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे येत्या 10 जून रोजी अयोध्या दौऱ्यावर जाणार आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी याबाबतची माहिती केली…
Buldhana Bus Accident

Buldhana Bus Accident : बुलढाणा बस अपघातात पुण्यातील 7 जणांचा समावेश

Posted by - July 2, 2023 0
पुणे : बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजाजवळ समृद्धी महामार्गावर (Buldhana Bus Accident) शनिवारी पहाटेच्या सुमारास खासगी बसचा भीषण अपघात झाला. या…

रिलायन्सची दमदार कामगिरी, तिमाहिमध्ये 16 हजार 203 कोटींचा नफा

Posted by - May 7, 2022 0
मुंबई -रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने शुक्रवारी मार्चअखेर तिमाहीत २२.५ टक्क्यांच्या भरीव वाढीसह, १६,२०३ कोटी रुपयांच्या तिमाही नफ्याची नोंद करणारी आर्थिक कामगिरी…
Gold Scheme

Gold Scheme : स्वस्त सोने खरेदी करण्याची सुवर्णसंधी; ‘या’ स्कीममध्ये करू शकता गुंतवणूक

Posted by - June 19, 2023 0
आजपासून स्वस्त सोने खरेदी (Gold Scheme) करण्याची सुवर्ण संधी मिळणार आहे. सार्वभौम सुवर्ण रोखे (SGB) अंतर्गत आजपासून 23 जून पर्यंत…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *