ED

पर्ल ग्रुपची मुंबई आणि पुण्यातील ७५ एकर जमीन ईडीकडून जप्त

308 0

मुंबई- ६० हजार कोटींच्या चिटफंड घोटाळ्यातील चौकशीनंतर ईडीने कारवाई करत पर्ल ग्रुपची मुंबई आणि पुण्यातील ७५ एकर जमीन जप्त केली आहे. तसेच बँकेतील साडे सात कोटीही ईडीने जप्त केले आहेत.

पर्ल ग्रुपच्या माध्यमातून देशातील विविध राज्यांमधील साडेपाच कोटी गुंतवणूकदारांची फसवणूक करण्यात आली असल्याचा आरोप आहे. तब्बल ६० हजार कोटी रुपयांचा हा गुंतवणूक घोटाळा आहे. पर्ल घोटाळ्याचा तपास सीबीआय आणि ईडी करत आहे. दिल्ली, चंदीगड, कोलकाता, भुवनेश्वर यासह अनेक ठिकाणी सीबीआयने छापे टाकून चौकशी केली आहे. याप्रकरणात गेल्यावर्षी २३ डिसेंबर रोजी ११ जणांना अटक करण्यात आली होती. त्यात कमलजीत सिंग याच्यासह चंद्रभूषण ढिल्लो, प्रेम सेठ, मनमोहन कमल महाजन, मोहनलाल सहजपाल आणि कंवलजीत सिंग यांचा समावेश होता. मुख्य आरोपींना साथ दिल्याचा सर्वांवर आरोप आहे.

या तपासात जी माहिती आणि कागदपत्रे पुढे येत आहे त्याच्या आधारे या ग्रुपच्या मालमत्तांवर जप्तीची कारवाई केली जात आहे. यानुसार वसई पट्ट्यातील ७५ एकरची जमीन जप्त करण्यात आली आहे. याची किंमत जवळपास १८७ कोटी असल्याची माहिती आहे. तसेच, याचसंदर्भातील बँक खात्यातून साडेसात कोटींची रक्कमही जप्त करण्यात आली आहे.

Share This News

Related Post

हर घर तिरंगा अभियानातून घराघरात देशभक्तीची चेतना निर्माण होईल – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा

Posted by - July 18, 2022 0
हर घर तिरंगा अभियानातून राष्ट्रीयता आणि एकात्मता वाढविण्याचा प्रयत्न करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबई : केंद्र शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या…

शालेय विद्यार्थ्यांसाठी रस्ते होणार सुरक्षित ! पुणे महापालिका शहरातील रस्त्यांवर साकारणार ‘सेफ स्कूल झोन’

Posted by - January 17, 2023 0
पुणे : शालेय विद्यार्थ्यांना शाळांमध्ये सुरक्षितरित्या चालत अथवा सायकलवर जाता यावं यासाठी पुणे महापालिकेन ‘स्कूल सेफ झोन’ या प्रकल्पाच नियोजन…
Yavatmal News

Yavatmal News : गणपती विसर्जनादरम्यान मोठी दुर्घटना; 20 वर्षीय गणेशभक्ताचा दुर्दैवी मृत्यू

Posted by - September 29, 2023 0
यवतमाळ : यवतमाळमध्ये (Yavatmal News) गणपती विसर्जनादरम्यान एक मोठी दुर्घटना घडली आहे. काल सगळीकडे अंनत चतुर्दर्शी निमित्त गणेशभक्त जड अंतःकरणाने…

Nashik News : नाशिकमध्ये आसाम रायफल्स माजी सैनिक संघ केंद्राचे 21 एप्रिलला उद्घाटन

Posted by - April 15, 2024 0
नाशिक : आसाम रायफल्स वेटरन्स दिन 23 मार्च 2024 रोजी साजरा (Nashik News) झाला. त्यानंतर आता आसाम रायफल्स महानिदेशालय,आसाम रायफल्स…

दुसऱ्यांदा सत्तेत येताच धामी सरकारचा मोठा निर्णय ; उत्तराखंड मध्ये लवकरच समान नागरी कायदा

Posted by - March 25, 2022 0
डेहराडून- उत्तराखंडमध्ये पुन्हा सत्तेत आलेल्या भाजपचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी राज्यात लवकरच समान नागरी कायदा लागू करणार असल्याची घोषणा…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *