हसन मुश्रीफांच्या घरी तिसऱ्यांदा इडीची छापेमारी; “एकदाच गोळ्या घालून जा…!” मुश्रीफ यांच्या पत्नीला भावना झाल्या अनावर

319 0

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार हसन मुश्रीफ यांच्या घरावर गेल्या दोन महिन्यांमध्ये आज तिसऱ्यांदा ईडीने छापा मारला आहे. आज सकाळी कागल मधील त्यांच्या निवासस्थानी ईडीन छापेमारी सुरू केलीये.

दरम्यान तिसऱ्यांदा ही कारवाई केल्यामुळे हसन मुश्रीफ यांच्या पत्नी यांनी नैराश्यातून आपली भावना व्यक्त केली आहे. त्या म्हणाल्या की, “किती वेळा यायचं या ठिकाणी ? किती त्रास द्यायचा ? काही आहे की नाही… रोज उठून तेच सुरू आहे, एवढं काम करणारा माणूस आहे. रात्रंदिवस जनतेसाठी राबणारा माणूस आहे. आणि असं का करता ? आम्ही करायचं तरी काय यांना ? आम्हाला एकदाच गोळ्या घालून जायला सांगा…!” अशी भावनिक प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान 11 जानेवारी रोजी ईडीन पहिली छापेमारी केली होती. त्यानंतर हसन मुश्रीफ यांच्या विरोधात ईडी कडून 35 कोटींच्या मनी लॉन्ड्री प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर मुरगूड पोलीस ठाण्यातही फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून हा गुन्हा रद्द करण्यासाठी त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेऊन याचिका दाखल केली आहे. याचिकेवर त्यांना दिलासा मिळाला असला तरी आज पुन्हा एकदा त्यांच्यावर ही कारवाई केल्यामुळे मुश्रीफ यांच्या कुटुंबीयांमधून संताप व्यक्त केला जातो आहे.

Share This News

Related Post

केतकी चितळेला बेल की जेल आज निर्णय होणार !

Posted by - May 18, 2022 0
ठाणे – राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर लिहिलेली कविता सोशल मीडियावर शेअर करून त्यांची बदनामी केल्या प्रकरणी अभिनेत्री केतकी चितळेची…
Sanjeev Thakur

Sanjeev Thakur : ड्रग्ज प्रकरणात मोठी कारवाई; ससूनचे डीन संजीव ठाकूर यांची नेमणूक रद्द

Posted by - November 10, 2023 0
पुणे : पुणे ड्रज माफीया ललित पाटील प्रकरणात चर्चेत आलेले ससूनचे डीन संजीव ठाकूर (Sanjeev Thakur) यांची ससून रुग्णालयातील डीन…

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी नरेंद्र पाटलांची नियुक्ती

Posted by - September 25, 2022 0
मुंबई: ज्येष्ठ माथाडी कामगार नेते अण्णासाहेब पाटील यांच्या आज 89 व्या जयंती निमित्त आज मुंबईमध्ये भव्य कामगार मेळाव्याचं आयोजन करण्यात…

येरवडा कारागृहातील बराकीत आढळला मोबाईल फोन

Posted by - April 4, 2023 0
येरवडा कारागृहातील एका बराकीमधील बाथरुममध्ये मोबाईल फोन आढळून आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना सोमवारी सायंकाळी घडली. याप्रकरणी…

काँग्रेस ऍक्शन मोडमध्ये ;’त्या’ आमदारांवर होणार शिस्तभंगाची कारवाई ?

Posted by - July 8, 2022 0
दिल्ली:काही दिवसांपूर्वी झालेल्या विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेसच्या पहिल्या क्रमांकाच्या उमेदवाराला काही आमदारांनी मतदान केले नाही.त्याचबरोबर विश्वास मताच्या वेळी गैरहजर राहिल्या प्रकरणी…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *