ED

महत्वाची बातमी ! देशभरात विविध १८ ठिकाणी ईडीची छापेमारी

394 0

नवी दिल्ली- ईडीनं आज देशभरात विविध ठिकाणी छापेमारी केली आहे. झारखंड, हरियाना, राजस्थान, पश्चिम बंगाल, बिहारमध्ये १८ ठिकाणी शुक्रवारी सकाळी ईडीनं मोठी कारवाई केली.

रांची येथील पल्स हाँस्पिटल, पंचवटी रेसिडेंट, कांके रोड, चांदनी चौक, हरिओम टॅावर येथे ईडीने छापेमारी केली आहे. झारखंडच्या खनिज आणि भूवैज्ञानिक विभागाच्या सचिव पूजा सिंघल यांचीही चौकशी ईडी करत असल्याची माहिती समोर आली आहे. गौण खनिजमध्ये आर्थिक गैरव्यवहार झाल्याची तक्रार ईडीला प्राप्त झाली होती, त्यानंतर मनी लाँड्रिंग प्रकरणात ही कारवाई सुरु असल्याची माहिती आहे.

रांचीच्या पल्‍स हॉस्पिटलमध्ये ईडीचे पथक पोहोचले. या ठिकाणी रुग्ण आणि हॉस्पिटल कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त अन्य कुणालाही प्रवेश देण्यात आला नाही. संपूर्ण परिसरात बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. झारखंडसह देशात १८ ठिकाणी हे छापेमारी सत्र सुरु असल्याचे ईडीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

झा्रखंडचे कनिष्ठ अभियंता राम विनोद प्रसाद सिन्हा यांच्याविरोधात ईडीने गुन्हा दाखल केला होता. आपल्या पदाचा गैरउपयोग करुन १८ कोटी रुपयांच्या सरकारी संपत्तीत गैरव्यवहार झाल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. त्यांच्या विरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणाशी संबंधित असलेल्यांवर ईडीची नजर पडली असून त्यांना आपल्या कचाट्यात घेण्यास सुरवात केली आहे. पूजा सिंघल आणि उद्योगपती अमित अग्रवाल यांच्या कार्यालयावर ईडीनं छापा टाकला आहे.

Share This News

Related Post

#NILAM GORHE : प्रत्येक जिल्ह्यात महिलांसाठी ‘महिला विकास व्यासपीठ’ असावे

Posted by - March 14, 2023 0
मुंबई : राज्याचे चौथे महिला धोरण २०२३ ची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात महिला ‘महिला विकास व्यासपीठ’ असावे, महिला व…

MAHARSHTRA POLITICS : “ही बंडखोरी नाही, ही हरामखोरी आहे, तुम्ही मर्द नव्हे तर दरोडेखोर ” उद्धव ठाकरेंनी केले शिंदे गटाला लक्ष्य

Posted by - July 25, 2022 0
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस वाढत चालला आहे. शिंदे गटाने आता थेट निवणूक आयोगाकडे…

राज ठाकरे यांच्या भोंग्याबाबतच्या विधानानंतर नगरसेवक वसंत मोरे संभ्रमात

Posted by - April 5, 2022 0
पुणे – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या दिवशी शिवतीर्थावरून आव्हान देत मशिदीवरील भोंगे हटवण्याबाबत इशारा दिला होता. आता राज…

#NCP : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा ‘राष्ट्रीय दर्जा’ धोक्यात ? वाचा सविस्तर

Posted by - March 22, 2023 0
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ‘राष्ट्रीय दर्जा’चा निवडणूक आयोगाकडून फेरविचार करत असल्याची मोठी माहिती समोर आली आहे. मंगळवारी आयोगासमोर पक्षाच्या…

SPORTS : फुटबॉल लेजंड..,’सिक्रेट’ रेकॉर्डिंग आर्टिस्ट, ब्राझीलचे 82 वर्षीय फुटबॉलचे दिग्गज खेळाडू पेले यांचे निधन; कॅन्सरशी झुंझ संपली

Posted by - December 30, 2022 0
ब्राझील : ब्राझीलचे ८२ वर्षीय फुटबॉलचे दिग्गज खेळाडू पेले यांचे गुरुवारी (२९ डिसेंबर) सो पाउलो येथील रुग्णालयात निधन झाले. सप्टेंबर…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *