मुंबईत सकाळपासूनच ईडीची धडक कारवाई, या छापासत्राबाबत काय म्हणाले संजय राऊत ?

446 0

मुंबई- अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या संपत्तीसंदर्भात काही नेत्यांनी केलेल्या कराराची माहिती घेण्यासाठी मुंबईत सकाळपासूनच ईडीची धडक कारवाई सुरु आहे. हे छापे मुंबईच्या सी-वॉर्डमध्ये टाकण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे. या छापेमारीनंतर काही नेते अडचणीत येण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

केंद्रीय गृहमंत्रालयाच्या आदेशाने एनआयए आणि ईडीने छापे टाकले असल्याचे म्हटले जात आहे. ईडीकडून दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर आणि बहीण हसिना पारकर यांच्या घरीही छापे टाकण्यात आले असल्याची माहिती आहे. काही राजकीय नेत्यांनी दाऊद इब्राहिमशी संबंधित मालमत्ता खरेदी केली. त्या व्यवहारावरून हे छापासत्र सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे छापे मुंबईच्या सी-वॉर्डमध्ये टाकण्यात आले आहेत. दाऊदचा भाऊ इक्बाल कासरकरचा ताबा घेऊन ईडी आणखी चौकशी करणार असल्याचीही माहिती समोर आली आहे.

दरम्यान, ईडीच्या छाप्यावर शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी राष्ट्राच्या सुरक्षेचा मुद्दा असल्यास सहकार्य करणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले. मात्र
या प्रकरणात नेत्यांची नावे येतील की घुसवली जातील हे मात्र सांगता येणार नसल्याचे राऊत म्हणाले.

Share This News

Related Post

shailaja darade

Shailaja Darade : नोकरीच्या आमिषाने लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या शैलजा दराडे यांना पुणे पोलिसांकडून अटक

Posted by - August 7, 2023 0
पुणे : नोकरीच्या आमिषाने लाखो रुपयांची फसवणूक केल्याच्या प्रकरणात महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त शैलजा दराडे (Shailaja Darade) यांना पुणे…
Jalna News

Jalna News : धक्कादायक ! ज्या शाळेत दिले ज्ञानाचे धडे त्याच ठिकाणी शिक्षकाने संपवले आयुष्य

Posted by - November 8, 2023 0
जालना : जालना जिल्ह्यातून (Jalna News) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये एका शिक्षकाने चक्क शाळेतच गळफास घेऊन आपले…

चिंताजनक : ट्विटर आणि ॲमेझॉननंतर आता गुगलची मूळ कंपनी अल्फाबेट देणार १०,००० कर्मचाऱ्यांना नारळ

Posted by - November 22, 2022 0
गुगलची मूळ कंपनी अल्फाबेटा ही लवकरच दहा हजार कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करणार असल्याची माहिती समोर येते आहे. तथापि कंपनीने अद्याप…
Samruddhi Mahamarga

समृद्धी महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी सरकारने उचलले ‘हे’ मोठे पाऊल

Posted by - June 9, 2023 0
शिर्डी : समृद्धी महामार्गाचे (Samruddhi Mahamarg) उद्घाटन झाल्यापासून या महामार्गावर अपघाताचे प्रमाण खूप वाढले आहे. हे अपघात रोखण्यासाठी आता सरकारने…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *