अर्थकारण : मुलांच्या शिक्षणासाठी आर्थिक नियोजन करताना दमछाक होतेय ? हा लेख वाचा, मदत मिळेल

719 0

अर्थकारण : मुलांच्या शिक्षणासाठी आर्थिक नियोजन करताना मुलांच्या आवडीनिवडी जाणून घेऊन त्या शाखेतील शिक्षणाचा सध्याचा खर्च किती आहे, हे पाहावे लागते. त्यानंतर आपला मुलगा किंवा मुलगी त्या शाखेत प्रवेश घेईल, तेव्हाचा खर्च किती असेल याचा हिशेब, महागाईच्या दराप्रमाणे केला पाहिजे. आपल्याकडे उपलब्ध असलेला कालावधी पाहून त्यानुसार बचतीचे पैसे गुंतवण्यासाठी योग्य पर्याय निवडावा.

उच्चशिक्षणासाठी आर्थिक नियोजन करताना भावी खर्चाचा अंदाज बांधणे हे मोठे आव्हान आहे. पुरेशी रक्कम उपलब्ध झाल्यास आपल्या मुलाचे भवितव्य चांगले करू शकते. त्याचे स्वप्न पूर्ण करू शकते. परंतु किती रकमेची गरज आपल्याला भासेल ? याचा अचूक हिशेब लावणे अवघड असते. त्यामुळे हा अंदाज बांधताना काही गोष्टी लक्षात घेणे गरजेचे असते. जेणेकरून मुलाला अथवा मुलीला शिक्षण घेत असताना कोणतेही अडथळे जाणवू नयेत आणि सर्व सुविधा सुलभपणे प्राप्त व्हाव्यात. मुलांच्या उच्चशिक्षणाचा विचार करून आर्थिक नियोजन करण्यास आपण प्राधान्य दिले पाहिजे. मुलांना चांगले शिक्षण देण्याच्या इच्छेबरोबरच शिक्षणावरील वाढत्या खर्चाचा विचार करून त्याची तरतूद लवकरात लवकर करून ठेवणे गरजेचे आहे.

मुलांच्या शिक्षणासाठी बचत करण्याची पहिली पायरी म्हणजे पुढील शिक्षणाच्या खर्चाचा अंदाज बांधणे. कारण उद्दिष्ट समोर असेल तर ते पूर्ण करण्याच्या दिशेने आपण हातपाय हलवू शकतो. प्रत्येक माता-पित्याचा आपल्या मुलांवरील शिक्षणाचा खर्च वेगवेगळा असू शकतो; कारण मुलांच्या आवडीनिवडीवर त्याचे पुढील शिक्षण आणि त्यावरील खर्च अवलंबून असतो. खासगी महाविद्यालयांत किंवा मेडिकल, इंजिनिअरिंग यांसारख्या व्यावसायिक अभ्यासक्रमांत इतर शाखांच्या तुलनेत अधिक रक्कम खर्ची पडते. परदेशात शिक्षण घेण्याची इच्छा असेल, तर याहूनही कितीतरी अधिक खर्च येतो. त्यामुळे या खर्चाचा अंदाज लावणे अत्यंत आवश्यक आहे. आजमितीस एखाद्या चांगल्या शिक्षणसंस्थेत एमबीएची पदवी घेण्यासाठीचा खर्च अंदाजे 25 लाख रुपये इतका आहे. परदेशी शिक्षण घ्यायचे असेल तर किमान 50 लाख रुपये खर्च होतात. काळाबरोबर हा खर्च वाढतच जातो.

शिक्षणाच्या खर्चाचा अंदाज बांधताना महागाईचा दर विचारात घेणे अत्यंत आवश्यक असते. सध्याच्या खर्चाचा अंदाज बांधण्यासाठी मुलाला किंवा मुलीला ज्या शाखेत शिक्षण घ्यायचे असेल, त्या शाखेचा सध्याचा खर्च आणि आगामी काळातील महागाईत होणारी वाढ याचा हिशेब करावा लागतो. कारण उच्च शिक्षण सुरू होताना तेवढी रक्कम हातात असायला हवी. उदाहरणार्थ, कोलकता येथे दोन वर्षांत एमबीए करण्याचा खर्च 2004 मध्ये 2.5 लाख रुपये इतका होता. आता 2020 मध्ये हा खर्च वाढून 27 लाख रुपयांपर्यंत पोहोचला आहे. म्हणजेच, या शाखेत शिक्षण घ्यायचे असल्यास खर्च दरवर्षी 15 टक्क्यांनी वाढल्याचे दिसते. या दराने विचार केल्यास आणखी 15 वर्षांनी याच अभ्यासक्रमाचा खर्च 2.2 कोटी रुपये असेल. त्यामुळे या हिशेबानेच आपल्याला बचत करावी लागेल. दीर्घकालीन आर्थिक उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी योग्य गुंतवणूक पर्याय निवडणे आवश्यक आहे.

चुकीचा गुंतवणूक पर्याय स्वीकारल्यास आपले उद्दिष्ट पूर्ण होऊ शकणार नाही. त्याचबरोबर आपल्यावर आर्थिक बोजाही पडू शकेल. जर आपल्याला 15 वर्षांत 2.20 कोटी रुपये जमा करायचे असतील, तर आपला गुंतवणूक पर्याय काय असू शकेल? सध्याच्या दरांचा विचार करता पीपीएफमध्ये दीड लाख रुपये 15 वर्षे गुंतविल्यास 40.68 लाख रुपये मिळू शकतात तर सुकन्या समृद्धी योजनेत 21 वर्षांपर्यंत दीड लाख रुपये गुंतविल्यास 63.65 लाख रुपये मिळतील. 2.2 कोटी रुपये मिळविण्यासाठी 5.5 टक्के परतावा देणार्‍या मुदत ठेव किंवा रिकरिंग डिपॉझिटसारख्या योजनांमध्ये 15 वर्षांपर्यंत दरमहा 80 हजार रुपये गुंतवावे लागतील. 12 टक्क्यांच्या सरासरीने परतावा देणार्‍या इक्विटी म्युच्युअल फंडात 45 हजार रुपयांची दरमहा एसआयपी करावी लागेल किंवा 25 हजार रुपयांची मासिक एसआयपी सुरू करून ती दरवर्षी दहा टक्क्यांनी वाढवावी लागेल.

पीपीएफ किंवा सुकन्या समृद्धी योजनेसारख्या निश्चित परतावा असलेल्या योजनांच्या तुलनेत इक्विटी म्युच्युअल फंडाच्या एसआयपीमध्ये चांगला परतावा मिळतो. त्यात दुसरा पर्याय इतर सर्व पर्यायांच्या तुलनेत अधिक व्यावहारिक वाटतो. परंतु आपल्याला आपली इच्छा, जोखीम पत्करण्याची क्षमता, आपल्याजवळ किती वेळ आहे आणि बचत करण्याची आपली क्षमता किती आहे, या आधारावर एकापेक्षा अधिक गुंतवणूक पर्याय स्वीकारावे लागतील. असे केल्यास आपले लक्ष्य पूर्ण होण्यास मदत होईल. कोणतेही आर्थिक लक्ष्य पूर्ण करण्याबरोबर आपल्याला आपल्या आर्थिक नियोजनाकडे लक्ष द्यायला हवे. आपल्या आर्थिक नियोजनात सातत्याने प्रगती होत आहे की नाही, याची मीमांसा सातत्याने करायला हवी.

जर आपली गुंतवणूक योग्य मार्गाने चाललेली असेल, तर त्यात फेरबदल करणे अपेक्षित नाही. परंतु जर आपल्या अपेक्षेनुसार आर्थिक प्रगती होत नसेल, तर आपल्याला गुंतवणूक पर्यायांत फेरबदल करावा लागेल. जर आपल्याला मिळणारा परतावा अत्यल्प असेल, तर तर आपल्याला लाँगटर्म रिवार्डस वाढविण्यासाठी गुंतवणुकीत जोखीम पत्करणे गरजेचे आहे. जर आपले नियोजन आपल्या अपेक्षेपेक्षा चांगले काम करीत असेल तर योग्य वेळी आपण आपले प्रॉफिट बुक करू शकतो आणि आपल्या भांडवलाला बाजारात खुले सोडण्याऐवजी ते सुरक्षित करून ठेवू शकतो.

Share This News

Related Post

काँग्रेस गड राखणार की कमळ फुलणार ?; कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीचा आज निकाल

Posted by - April 16, 2022 0
गृहराज्यमंत्री आणि कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या उत्तर कोल्हापूर पोटनिवडणुकीची…

‘NAAC’ कडून परीक्षक मंडळाचा विस्तार ; मूल्यांकन प्रक्रिया वेगाने राबवणे शक्य

Posted by - July 22, 2022 0
पुणे : उच्च शिक्षण संस्थांचे मूल्यांकन आणि अधिस्वीकृतीसाठीच्या परीक्षकांची संख्या राष्ट्रीय मूल्यांकन आणि अधिस्वीकृती परिषदेकडून (NAAC) वाढवण्यात येत आहे. बऱ्याच…
Exam

खळबळजनक ! अमरावतीमध्ये चक्क भाजपच्या माजी नगरसेवकाने फोडला पेपर

Posted by - May 20, 2023 0
अमरावती : अमरावतीमधून (Amrawati) शिक्षण क्षेत्रात खळबळ उडवून देणारी बातमी समोर आली आहे. राज्यात पेपर फुटीच्या (Paper Leak) घटना काही…

Big Breaking ! औरंगाबादचे नाव संभाजीनगर तर उस्मानाबादचे नाव धाराशिव ! कॅबिनेटच्या बैठकीत मंजुरी

Posted by - June 29, 2022 0
मुंबई- ठाकरे सरकारच्या आज झालेल्या कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीत औरंगाबादचे नाव संभाजीनगर तर उस्मानाबादचे नाव धाराशिव करण्याला मंजुरी मिळाली आहे. शिवसेनेचे…

Bilkis Bano Case : ” बिल्कीस बानोला न्याय मिळावा यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने मुक निदर्शने “

Posted by - August 27, 2022 0
पुणे : २००२ च्या गोध्रा दंगलीतील पीडिता बिल्कीस बानो यांच्या समर्थनार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने SSPMS कॉलेजच्या मैदानावरील छत्रपती शिवाजी…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *