अर्थकारण : बॉण्डमध्ये गुंतवणूक कशी करावी ? वाचा सविस्तर माहिती

188 0

भारतात बॉण्डमध्ये गुंतवणूक करण्याचे दोन मार्ग आहेत. यात एक कॉर्पोरेट बाँडसमध्ये गुंतवणूक करणे अणि दुसरे म्हणजे सरकारी बाँडसमध्ये…. 

कॉर्पोरेट बॉण्ड : कॉर्पोरेट बाँडस हे मोठ्या कंपन्यांकडून भांडवल गोळा करण्यासाठी काढले जातात. या बाँडसची खरेदी आपण व्यावसायिक बँका, स्टॉक एक्स्चेंज, थेट कंपनीचे संकेतस्थळ किंवा त्यांच्या शाखेतून खरेदी करु शकतो.

सरकारी बॉण्ड : सरकारी बॉण्डला कार्पोरेट बॉण्ड प्रमाणे थेट खरेदी करता येत नाहीत. हे बॉण्ड सरकारकडून किंवा स्टॉक मार्केटमधून खरेदी करता येत नाहीत. आरबीआयमार्फत एखादी आर्थिक संस्था, खासगी बँक किंवा प्रायमरी डिलरकडून बाँडसची खरेदी केली जाते आणि त्यांच्याकडून रिटेल गुंतवणूक करता येते.
बाँड खरेदीचे दोन मार्ग

प्रायमरी मार्केट : एखादी संस्था भांडवल उभारणीसाठी पहिल्यांदा बाजारात बाँड आणते तेव्हा ती पब्लिक ऑफर करते. यात सामान्य जनतेला वेळ दिला जातो. अर्ज भरुन बाँड खरेदीसाठी निवेदन करता येऊ शकते.

सेंकडरी मार्केट : एखादी कंपनी जेव्हा बाजारात बाँड आणते तेव्हा स्टॉक एक्स्चेंजवर त्यांच्या मार्फत आपापसात खरेदी विक्री केली जाते. सेंकडरी मार्केटमध्ये बाँड खरेदीचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे म्युच्यूअल फंड. डेब्ट म्युच्यूअल फंड योजना या बाँडसमध्ये गुंतवणूक करतात. जर आपण डेब्ट म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करत असाल तर आपला पैसा वेगवेगळ्या बाँडसमध्ये जातो.

बाँड लाभदायी आहेत काय ?

बाँडसमध्ये गुंतवणूक करणे फायद्याचे आहे. मात्र बाँडसमध्ये गुंतवणूक ही फायद्याची आहे की नाही, हे संबंधित बाँडच्या व्याजदरावर अवलंबून आहे. ज्या बाँडची रेटिंग चांगली आहे, त्याचा व्याजदर तेवढाच कमी आणि जोखीमही. मात्र ज्या बाँडचा व्याजदर अधिक असतो, त्यात जोखीम देखील तितकीच अधिक असते. त्यामुळे त्यांची रेटिंग कमी असते. सरकारी बाँडमध्ये गुंतवणूक करुन वार्षिक 6 ते 7 टक्के व्याज मिळवता येऊ शकते. त्याचवेळी कॉर्पोरेट बाँडसमधील व्याजदर देखील कंपनीनिहाय वेगवेगळी असतात. कंपनीची आर्थिक स्थिती चांगली असेल तर व्याजदर कमी राहिल आणि जर कंपनी आर्थिकदृष्ट्या कमकुवत असेल तर व्याज अधिक असेल. बाँडमध्ये गुंतवणूक करुन चांगला फायदा मिळवता येतो अणि करात सवलत देखील मिळते.

बाँडसची ऑनलाइन खरेदी आणि विक्री करता येऊ शकते. बाँड खरेदी करण्यासाठी आणि राखण्यासाठी डिमॅट खाते असणे गरजेचे आहे. बहुतांश बाँडला मॅच्यूअर होण्यापूर्वी देखील विक्री करता येऊ शकते. आपण ब्रोकर किंवा ट्रेडिंग अकाउंटच्या सहायकाच्या मदतीने स्टॉक एक्स्चेंजवर बाँड विकू शकता.

बाँडमध्ये आणखी एक प्रकार असतो. करमुक्त बाँड. ज्यांना कर वाचवायचा असेल त्यांनी अशा बाँडमध्ये गुंतवणूक करण्यास हरकत नाही. बाँडला सर्वात सुरक्षित पर्याय मानला गेला आहे. कारण यात निश्चित व्याजदराची हमी दिलेली असते. बाँड परिपक्व झाल्यानंतर मूळ रक्कमेत व्याज जमा केले जाते. बाँडसच्या सुरक्षेची हमी असते. कॉर्पोरेट बाँड हे कंपनीच्या स्थितीवरून सुरक्षित मानले जातात. सरकारी बाँडला सरकारची हमी असते.

Share This News

Related Post

अजित पवार यांच्या उपस्थितीत पुण्यात पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर ध्वजारोहण

Posted by - January 26, 2022 0
पुणे- भारताच्या त्र्याहत्तराव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पुण्यातील शिवाजीनगर येथील पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर…
Heavy Rain

Weather Update : पुढील 5 दिवस राज्यात अवकाळी पावसाचा इशारा; ‘या’ भागात पडणार वादळी पाऊस

Posted by - November 24, 2023 0
राज्यातील वातावरणात मोठा बदल पाहायला मिळत आहे. कुठे थंडीचा कडाका तर कुठं ढगाळ वातावरण (Weather Update) दिसत आहे. दरम्यान, भारतीय…

मोठी बातमी! बहुचर्चित लवासा प्रकरणी पवार कुटुंबियांना सर्वोच्च न्यायालयाची नोटीस

Posted by - August 8, 2022 0
पुणे: पुण्यातील बहुचर्चित लवासा प्रकरणासंदर्भात दाखल करण्यात आलेली जनहित याचिका उच्च न्यायालयाने निकाली काढली होती. या निर्णयाविरोधात याचिका करते नानासाहेब…

शॉपिंग करताना मोबाईल नंबर देण्याची सक्ती नाही, केंद्रीय ग्राहक मंत्रालयाचा मोठा खुलासा

Posted by - May 24, 2023 0
मॉलमध्ये जेव्हा तुम्ही वस्तू खरेदी करता तेव्हा तुम्हाला बिलिंग काऊंटरवर बिल Shopping देण्यापूर्वी तुमचा मोबाईल नंबर नक्कीच विचारला जातो. गरज…

मुळशीत भूकंपाचे सौम्य धक्के ; 500 मीटर जमीन दुभंगली (पहा फोटो)

Posted by - July 19, 2022 0
पुणे : आज मुळशी धरण भागातील मौजे निंबाळवाडी आणि मौजे वडगाव वाघवाडी येथे सौम्य भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. या भूकंपाच्या…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *