महत्वाची बातमी ! सिंहगड घाटामध्ये इ बसला पुन्हा अपघात, थोडक्यात वाचला प्रवाशांचा जीव

460 0

पुणे- सिंहगड घाट रस्त्यावर पुन्हा एकदा इ बसचा अपघात झाला आहे. चालकाचे नियंत्रण सुटून बस कठड्याला धडकली. सुदैवाने कठडा मजबूत असल्यामुळे पुढील मोठी दुर्घटना टळली. अन्यथा बस आतकरवाडीच्या दरीत कोसळली असती. हा अपघात आज शुक्रवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास सिंहगडावरून बस खाली येताना घडला. आठवडाभरात तिसरी घटना आहे. 

वाहतूक कोंडीतून मुक्त करण्याच्या आणि हवा प्रदूषणही कमी करण्याच्या दृष्टीने मोठा गाजावाजा करून सिंहगडावर ई बसची सेवा सुरु करण्यात आली. सिंहगडावर सुट्ट्यांच्या दिवशी घाटरस्त्यात लागणाऱ्या वाहनांच्या रांगा, तासन्‌‌तास रेंगाळणाऱ्या वाहतूक कोंडीवर मार्ग काढण्यासाठी सहा महिन्यांपूर्वी वन विभागाने गडावर जाणारी खासगी वाहने बंद करण्याचा निर्णय जाहीर केला होता. घाट रस्त्यावर ‘पीएमपी’ने केलेल्या ई-बसच्या चाचण्याही यशस्वी झाल्या होत्या.

परंतु या बस सेवेचा पुरता बोजवारा उडाल्याचे चित्र आहे. सिंहगडावर ज्या ठिकाणी अपघाताची शक्यता वर्तवण्यात येत होती तिथेच आज, शुक्रवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास गडावरुन आलेली बस थेट कठडयाला धडकली. मात्र, सुदैवानं तो कठडा मजबूत होता म्हणून ही बस आतकरवाडीच्या दरीत कोसळली नाही. अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती. दिनांक 8 मे रोजी बसला चार्जिंग नसल्याने घाटात बस बंद पडून पर्यटकांचे हाल झाले होते. ही घटना ताजी असतानाच आज पुन्हा अपघात झाल्याने या बससेवेच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Share This News

Related Post

Cyclone Update

Weather Update : महाराष्ट्रासाठी धोक्याची घंटा; हवामान खात्याने वर्तवला धडकी भरवणारा अंदाज

Posted by - May 26, 2024 0
मुंबई : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसानं (Weather Update) धुमाकूळ घातला आहे. अवकाळी पावसामुळे फळबागा आणि पिकांचं मोठं नुकसान…

BIG NEWS : पुण्यातील पत्रकार भवनमध्ये अर्हम फाउंडेशनच्या ‘वास्तव कट्ट्यामध्ये’ MPSC च्या विद्यार्थ्यांची हुल्लडबाजी; वाचा सविस्तर प्रकरण

Posted by - December 1, 2022 0
पुणे : गुरुवारी पुण्यातील पत्रकार भवन येथे एमपीएससीच्या MPSC विद्यार्थ्यांच्या समस्या आणि प्रश्न समजून घेणे आणि त्यांची भूमिका मंत्रालयात मांडण्याच्या…
Pune News

Pune News : केस कापायला पैसे दिले नाहीत म्हणून पतीकडून पत्नीला मारहाण

Posted by - September 11, 2023 0
पुणे : पुण्यामध्ये (Pune News) एक संतापजनक घटना समोर आली आहे. यामध्ये पत्नीने केस कापण्यासाठी पैसे न दिल्याने चिडलेल्या पतीने…

शरद पवारांच्या बाबतचा मेसेज केतकीला कुणीतरी पाठवला ? पोलिसांनी व्यक्त केला संशय

Posted by - May 18, 2022 0
ठाणे- अभिनेत्री केतकी चितळे प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे. केतकी हिने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत अत्यंत वादग्रस्त अशी…

ज्येष्ठ साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्ते डॉ. अनिल अवचट यांचं निधन (व्हिडिओ)

Posted by - January 27, 2022 0
पुणे- ज्येष्ठ साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्ते डॉ. अनिल अवचट (वय 78) यांचं पुण्यात राहत्या घरी निधन झालं. आज दुपारी त्यांच्या…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *