दसरा मेळावा : सप्तशृंगी मातेची प्रतिमा उध्दव ठाकरेंना भेट देऊन डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिल्या घवघवीत यशासाठी शुभेच्छा

138 0

मुंबई : नवरात्रीच्या निमित्ताने शिवसेना उपनेत्या डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या संकल्पनेतून ”साडेतीन शक्तीपीठाच्या दर्शनानिमित्त बये दार उघड” मोहिम आयोजित केली होती. यात दिनांक २७ आणि २८ सप्टेंबर रोजी नाशिक जिल्ह्यातील चांदवड, सप्तशृंगी माता येथे दर्शन घेऊन ज्योती प्रज्वलित करण्यात आली.

यानंतर २९ सप्टेंबर रोजी कोल्हापूरची अंबाबाई, ३० सप्टेंबर रोजी तुळजापूरची तुळजाभवानी आणि २ ऑक्टोबरला माहूरची रेणुका या साडेतीन शक्तीपीठाच्या ठिकाणी दर्शन आणि आरती शिवसेना महिला आघाडीच्या वतीने करण्यात आली.

या सर्व ठिकाणाहून आलेल्या ज्योतीचे दर्शन श्री. ठाकरे यांनी दसरा मेळाव्यास संबोधन करण्यापूर्वी घेतले. या शक्तीपीठाचा प्रसाद यावेळी शिवसेना उपनेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी श्री. ठाकरे यांना दिला. तसेच मेळावा सुरू होण्यापूर्वी श्री. सप्तश्रृंगी देवीची प्रतिमा भेट देण्यात आली.

यावेळी शिवसेना नेते आदित्य ठाकरे, शिवसेना नेते सुभाष देसाई उपस्थित होते.

Share This News

Related Post

गणेशोत्सव, दहीहंडी उत्साहात आणि शांततेत साजरा करा ; गणेशोत्सव मंडळाना नोंदणी शुल्क, हमी पत्राची अट शिथिल

Posted by - July 21, 2022 0
मुंबई : गणेशोत्सव, दहीहंडी आणि मोहरम तसेच अन्य आगामी सण उत्सव शांततेत उत्साहात आणि जल्लोषात पार पडावा यासाठी सर्वं यंत्रणांनी…

उपयोगाची माहिती : सिबिल स्कोअरवर ठेवा लक्ष; क्रेडिट स्कोअर किती असावा ?

Posted by - December 18, 2022 0
अर्थकारण : कोणतेही कर्ज घेण्यासाठी क्रेडिट स्कोअर अर्थात सिबील स्कोअर चांगला असणे गरजेचे आहे. क्रेडिट स्कोअर चांगला राहावा यासाठी त्यावर…

पिंपरी-चिंचवड महापालिकेत परीक्षा न देता नोकरीची संधी, अधिक माहिती वाचा

Posted by - April 13, 2022 0
पिंपरी- पिंपरी-चिंचवड महानगपालिकेच्या पशुवैद्यकीय विभागात एकूण 06 पदांची भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. सहा महिन्याच्या कालावधीसाठी ही भरती प्रक्रिया राबविली…
Jalgaon Robbery

खाकी पेशाला काळिमा ! निलंबीत पोलिस उपनिरीक्षकानेच टाकला जळगाव स्टेट बँकेवर दरोडा

Posted by - June 4, 2023 0
जळगाव : जळगावमध्ये (Jalgaon) पोलिसी पेशाला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. यामध्ये 1 जून रोजी भर दिवसा जळगाव शहरातील…

#PUNE : महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचा मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप; म्हणाले, ” माझ्याच घरात वाटले पैसे…!”

Posted by - February 27, 2023 0
पुणे : काल पुण्यात कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणूक पार पडली. ही पोट निवडणूक होण्याआधी आणि पार पडल्यानंतर देखील आरोप प्रत्यारोप…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *