#PUNE : अंत्यविधी पार पडताना दाहिनीच्या मशीनचे फ्युज उडाले; वसंत मोरे यांच्या कार्यतत्परतेने तासाभरात अंत्यसंस्कार पार पडले !

430 0

पुणे : मंगळवारी रात्री कात्रज येथील स्मशानभूमी मधील विद्युत दाहिनीचा फ्युज उडाल्याने एक मृतदेह अर्धवट जळाला. या मृतदेहावर अंत्यविधी पूर्ण होऊ शकला नाही. अशात मशीन खराब झाल्यानंतर दोन तास होऊन गेले तरी दुरुस्त करणारी व्यक्ती आली नाही. त्यामुळे घाबरलेल्या कर्मचाऱ्याने थेट वसंत मोरे यांना फोन केला आणि आणि वसंत मोरे यांनी अवघ्या तासाभरात ही मशीन दुरुस्त करून घेऊन मृतदेहावर अंत्यसंस्कार पूर्ण करून घेतले.

ही घटना आहे मंगळवारी रात्रीची कात्रज स्मशानभूमी मध्ये विद्युत दाहिनीमध्ये अंत्यविधीसाठी एक मृतदेह सोडण्यात आला होता. यावेळी अचानक दाहिनीच्या मशीनचं फ्युज उडालं आणि या मृतदेहावर अर्धवटच अंत्यसंस्कार झाले. हा मृतदेह अर्धवट जळाला गेला. अशावेळी त्या ठिकाणी असणारा कामगार देखील घाबरला मशीन खराब होऊन दोन तास होऊन गेले होते. या कामगारांना मशीनच्या दुरुस्तीसाठी बोलावलेल्या व्यक्तीने देखील रात्री येऊ शकत नाही असं सांगून हात वर केले होते. त्यामुळे या कामगारांना रात्री साडेअकरा वाजता फोन लावला तो थेट वसंत मोरेना…

त्यानंतर वसंत मोरे यांनी ठेकेदार आणि मेंटेनन्सच्या लोकांना फोन लावून खरडपट्टी काढली. पुढच्या दोन तासांमध्ये मशीन पूर्ववत दुरुस्त होऊन मृतदेहावर अंत्यसंस्कार झाले नाही तर मी सोशल मीडियावर लाईव्ह येऊन पुढे जे होईल त्यास तुम्ही जबाबदार असाल असे खडसावले. त्यानंतर अवघ्या तासाभरात या गॅस दाहिनीच काम पूर्ण झालं आणि मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

मशीन खराब झाल्यामुळे मृतदेह अर्धवट जळाला होता. दुसऱ्या दिवशी नातेवाईक सावडण्यासाठी येणार होते. त्यामुळे संबंधित कर्मचारी घाबरला होता. वसंत मोरे यांच्या कार्यतत्परतेने मृतदेहावर वेळेत अंत्यसंस्कारही पार पडले आणि या कर्मचाऱ्यांची नोकरी देखील वाचली आहे.

Share This News

Related Post

ऑलम्पिक क्रीडा प्रशिक्षणासाठी ‘पुनीत बालन ग्रुप’चा पुढाकार

Posted by - May 1, 2023 0
पुणे : ऑलम्पिक क्रीडा स्पर्धेत भारताला अधिकाधिक पदके मिळावीत यासाठी आता ‘पुनीत बालन ग्रुप’ने आणखी एक पाऊल टाकले आहे. ऑलम्पिक…

‘तू कुणाची सुपारी घेऊन आलास का ?’ अजितदादा कडाडले ! कुठे आणि कधी ?

Posted by - February 19, 2022 0
जुन्नर- महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती आहे. या निमित्त केल्ले शिवनेरीवर शिवजन्म सोहळा आयोजित करण्यात आला…

हाय प्रोफाइल चोर; विमानाने यायचे आणि आयफोन चोरायचे; 30 लाख 39 हजार रुपयांचे 39 मोबाईल जप्त

Posted by - February 28, 2023 0
पुणे : विमानाने येऊन आयफोन चोरणाऱ्या टोळीला विमानतळ पोलिसांनी ताब्यात घेतल आहे. या हाय प्रोफाईल चोरट्यांकडून 30 लाख 27 हजार…

पुणे : राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेचे धान्य मोफत; लाभ घेण्याचे आवाहन

Posted by - January 2, 2023 0
पुणे : राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत अनुज्ञेय असणारे अन्नधान्य १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२३ या कालावधीत पात्र लाभार्थ्यांना मोफत…

PUNE POLICE : दहीहंडी उत्सवामध्ये गोळीबार करणारा आरोपी आणि टोळीतील 16 जणांवर मोक्का अंतर्गत कारवाई

Posted by - September 27, 2022 0
पुणे : टोळीचे वर्चस्व निर्माण व्हावे या उद्देशाने आणि अवैध मार्गाने फायदा करून घेण्याच्या उद्देशाने स्वतः किंवा टोळीतील सदस्यांना चिथावून…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *