ई-बाईक चार्ज करताना झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे शोरूम जळून भस्मसात ; 8 जणांचा होरपळून मृत्यू

602 0

तेलंगणा : हैदराबाद मधील सिकंदराबाद येथे एका इलेक्ट्रिक बाइक शोरूम मध्ये मोठी आगीची घटना घडली आहे. फायर ब्रिगेडच्या दोन गाड्यांनी या आगीवर नियंत्रण मिळवले आहे. सोमवारी रात्री ही घटना घडल्याचे समजते. दरम्यान या घटनेमध्ये आठ जणांचा दुर्दैवी होरपळून मृत्यू झाला आहे.

शोरूम मधील इतर लोकांना वाचवण्यात फायर ब्रिगेडच्या जवानांना यश मिळाले आहे. स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या इलेक्ट्रिक बाइक शोरूम मध्ये एक बाईक चार्जिंगसाठी लावली होती. हे चार्जिंग सुरू असताना शॉर्टसर्किट झाले. त्यामुळे ही आग लागल्याचे त्यांनी सांगितले.

इलेक्ट्रिक वाहनाला आग लागण्याची ही पहिली घटना नाहीये. यापूर्वी एप्रिलमध्ये तमिळनाडू येथे अशीच एक घटना घडली होती. तामिळनाडूतील एका शोरूम मध्ये एका दुचाकी वाहन मालकाने आपली ई-बाईक बॅटरी चार्जिंगसाठी लावली होती. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याने हे शोरूम देखील आगीमुळे भस्मसात झाले होते. या घटनेमध्ये पाच नवीन ई-बाईक आणि सर्विसिंगसाठी आलेल्या बारा इ-बाईक जळून खाक झाल्या होत्या.

Share This News

Related Post

BEAUTY TIPS : नख वाढत नाहीत.. वाढल्यावर सहज तुटतात.. नखांच्या आरोग्यासाठी करा हे सोपे उपाय !

Posted by - December 21, 2022 0
BEAUTY TIPS : प्रत्येक तरुणीच तिच्या सौंदर्याकडे विशेष लक्ष असतं हात आणि पायाची नको ही मोठी सुंदर दिसावी यासाठी आज…
Mohammed Shami

Mohammed Shami : टीम इंडियाला मोठा धक्का ! मोहम्मद शमी आगामी टी-20 वर्ल्ड कपमधून बाहेर

Posted by - March 11, 2024 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – टीम इंडियाला मोठा धक्का देणारी बातमी समोर आली आहे. भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी (Mohammed…

‘थर्टी फर्स्ट’च्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई; 1 कोटी 70 लाख रुपयांची विदेशी दारू जप्त

Posted by - December 29, 2022 0
पुणे : राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाकडून मोठी कारवाई करण्यात आलेली आहे. या कारवाईमध्ये तब्बल दोन हजारांहून अधिक बॉक्स साठा…
shinde and thakre

Maharashtra Political Crisis : ‘हे’ 5 न्यायमूर्ती देणार महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा ऐतिहासिक निकाल! जाणून घ्या त्यांच्याबद्दल

Posted by - May 10, 2023 0
मुंबई : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या निकालाची उत्कंठा आता शिगेला पोहोचली आहे. सत्तासंघर्षाच्या कायदेशीर लढाईत 14 फेब्रुवारी ते 16 मार्च या काळात…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *