ऑन ड्युटी नाईट…फुल टाईट ! मद्यधुंद पोलीस अधिकाऱ्याच्या विरोधात गुन्हा

978 0

एक सहायक पोलीस निरीक्षक चक्क ऑन ड्युटी मद्यधुंद अवस्थेत आढळून आल्यामुळे पोलीस दलामध्ये खळबळ उडाली आहे. हा प्रकार हिंगोली जिल्ह्यातील औंढा पोलीस ठाण्यात घडला आहे. दारूच्या नशेत असलेल्या या पोलीस अधिकाऱ्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गिरी असे या अधिकाऱ्याचे नाव असून, तो हिंगोली शहर पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत आहे. 9 एप्रिल रोजी त्यांची नाईट ड्युटी लागली होती. गस्तीवर असताना गिरी हे रात्री दोनच्या सुमारास रात्रगस्त चेकिंगसाठी औंढा पोलीस ठाण्यात पोहचले. मात्र पोलीस ठाण्यात जाताच त्यांची अवस्था पाहून ठाण्यातील पोलिसांना धक्काच बसला. त्यांनी एवढी दारू ढोसली होती की त्याला नीट उभं राहणं अवघड झाले होते.

गिरीला व्यवस्थितपणे चालता येत नव्हते. बोलताना अस्पष्ट बोलत होता. तोंडाला दारूचा वास येत असल्याने त्यांनी प्रचंड मद्यपान केल्याचे उपस्थित पोलिसांच्या लक्षात आले. औंढा पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी यांनी सदरची बाब वरिष्ठांना कळवली. वरिष्ठांनी याबाबत कायदेशीर कारवाई करण्याची सूचना दिल्याने सुनील गिरी विरोधात औंढा पोलीस ठाण्यात कलम 85 (1) नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलीस कर्मचारी दिलीप किशनराव नाईक यांच्या फिर्यादिनुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पुढील तपास पोलीस निरीक्षक झुंजारे करत आहेत. तर गुन्हा दाखल केल्यावर गिरीला नोटीस देऊन सोडण्यात आले आहे.

Share This News

Related Post

Nashik News

Nashik News : घोटी-सिन्नर महामार्गावर कार आणि बाईकचा भीषण अपघात; 4 जणांचा मृत्यू

Posted by - March 8, 2024 0
नाशिक : नाशिक जिल्ह्यातून अपघाताची (Nashik News) एक मोठी घटना समोर आली आहे. यामध्ये बाईक आणि स्विफ्ट कारमध्ये धडक झाल्याने…
MS Swaminathan

MS Swaminathan : भारताच्या हरित क्रांतीचे जनक एमएस स्वामीनाथन यांचे निधन

Posted by - September 28, 2023 0
चेन्नई : भारताच्या हरित क्रांतीचे जनक एमएस स्वामीनाथन (MS Swaminathan) यांचे चेन्नई येथे आज निधन झाले आहे. त्यांनी वयाच्या 98…
Rajarshi Shahu Maharaj Jayanti

Rajarshi Shahu Maharaj Jayanti : राजर्षी शाहू महाराजांच्या जंयतीनिमित्त मुस्लिम युवकाकडून “मोफत” रिक्षा सेवा; श्रीमंत शाहू छत्रपतींनी केलं कौतुक

Posted by - June 26, 2023 0
कोल्हापूर : आज छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती (Rajarshi Shahu Maharaj Jayanti) आहे. शाहू महाराजांनी समाजाला कायम समतेचा संदेश…

#PUNE : …तर चिंचवड आणि कसबा पोटनिवडणूक रद्द होऊ शकते; कायदे तज्ञ असीम सरोदे यांनी सांगितले ‘हे’ कारण !

Posted by - February 9, 2023 0
पुणे : सध्या पुण्यामध्ये कसबा आणि चिंचवड पोट निवडणुकीचे वारे वाहते आहे. पण अशातच कायदे तज्ञ असीम सरोदे यांनी एक…

तब्बल दोन वर्षानंतर पेशवे पार्क पर्यटकांसाठी खुलं

Posted by - May 1, 2022 0
पुण्यातील पेशवे उद्यान हे तब्बल दोन वर्षांनंतर आज महाराष्ट्र दिनापासून पर्यटकांसाठी खुलं करण्यात आलं. कोरोनाचे निर्बंध शिथिल झाल्यानंतर 90 टक्के…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *