#PUNE : ससूनच्या समाजसेवा अधिक्षक विभाग प्रमुखपदी डॉ. शंकर मुगावे यांची नियुक्ती

646 0

पुणे : ससून सर्वो पचार रूग्णालय पुणे येथील समाजसेवा अधिक्षक विभागाचे विभागप्रमुख म्हणून डॉ. शंकर मुगावे यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे.

डॉ. मुगावे यांनी सलग १८ वर्षे ससून रुग्णालयातील रक्तपेढीमध्ये समाजसेवा अधिक्षक या पदांवर सेवा केली आहे. बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय, ससून रुग्णालय व पुणे महानगरपालिका अंतर्गत नागरी आरोग्य शिक्षण आणि प्रशिक्षण केंद्र पुणे येथे समाजसेवा अधिक्षक पदाची जबाबदारी त्यांनी सहा वर्षे पाहिली. कोरोना संकटकाळात डॉ.मुगावे यांनी पश्चिम महाराष्ट्रातील विभागीय स्तरावरील रक्तपेढीत मुख्य समन्वयक म्हणून तीन वर्षे यशस्वीपणे कार्य केले.

डॉ. शंकर मुगावे यांनी रक्तदान क्षेत्रात विशेष कार्य केले आहे. त्यांनी आजपर्यत ९९ वेळा ऐच्छिक रक्तदान केले असून साडे तीन लाख रक्तदात्यांचे ऐच्छिक रक्त संकलन केले आहे. रक्तपेढींच्या समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून संशोधनात्मक अभ्यास करून त्यांनी या विषयावर पीए.डी.पदवी संपादन केली. ते महाराष्ट्र राज्य समाजसेवा अधिक्षक संघटनेचे राज्य उपाध्यक्ष आहेत.

Share This News

Related Post

Dagdushet Ganpati

Dagdushet Ganpati : ‘दगडूशेठ’ गणपती प्राणप्रतिष्ठापना व आगमन मिरवणूक; RSS चे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांच्या हस्ते होणार श्रीं ची प्राणप्रतिष्ठापना

Posted by - September 17, 2023 0
पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट (Dagdushet Ganpati), सुवर्णयुग तरुण मंडळ च्यावतीने ट्रस्टच्या 131 व्या वर्षी गणेशोत्सवात अयोध्येतील…
Pune Crime News

Pune Crime News : भावाच्या ‘त्या’ छळाला कंटाळून बहिणीने उचलले ‘हे’ टोकाचे पाऊल

Posted by - January 1, 2024 0
पुणे : पिंपरी चिंचवडमधील वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एक धक्कादायक (Pune Crime News) घटना समोर आली आहे. यामध्ये भावाच्या छळाला…
Ashish Sakharkar

Ashish Sakharkar Passes Away : मराठमोळा शरीर सौष्ठवपटू आशिष साखरकरचं निधन; त्याची ‘ती’ शेवटची पोस्ट होतेय व्हायरल

Posted by - July 19, 2023 0
मुंबई : मराठमोळा बॅाडीबिल्डर आशिष साखरकर याचे निधन (Ashish Sakharkar Passes Away) झाले आहे. आशिषने देश-विदेशात अनेक स्पर्धा जिंकत महाराष्ट्राचे…

हत्यारे घेऊन दहशत माजविणाऱ्या सहा गुन्हेगारांची पोलिसांनी काढली धिंड (व्हिडिओ)

Posted by - April 7, 2022 0
पुणे- शहरातील धनकवडी भागांमध्ये कोयता आणि हत्यारे घेऊन दहशत माजविणाऱ्या सहा गुन्हेगारांची सहकारनगर पोलिसांनी बालाजीनगर मधून धिंड काढली. या गुंडांमुळे…
Pune News

Pune News : नव्या संसाराला सुरुवात होण्याआधीच नवदाम्पत्यासह तरुणीचा दुर्दैवी मृत्यू

Posted by - September 26, 2023 0
पुणे : पुण्यामधून (Pune News) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये पुण्याच्या धायरी इथून जेजुरीला देवदर्शनासाठी गेलेल्या नवदाम्पत्याचा अपघातात…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *