नाशिकमध्ये माजी कुलसचिव आणि त्यांच्या डॉक्टर मुलाचा निर्घृण खून, आरोपीला अटक

463 0

नाशिक- काही दिवसांपूर्वीच महापालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सुवर्णा वाजे यांचा खून केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर आता दुहेरी खुनाने नाशिक शहर पुन्हा हादरून गेले आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे सेवानिवृत्त कुलसचिव नानासाहेब कापडणीस (वय 70) आणि त्यांचा डॉक्टर मुलगा अमित कापडणीस (वय 35) या दोघांचा अतिशय निर्घृणपणे खून केल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.

मुख्य आरोपी राहुल गौतम जगताप (वय 36) असे या प्रकरणी अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. जगताप याने दोघांचा खून करून त्यांचे मृतदेह घाटात टाकल्याचे निष्पन्न झाले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाशिक येथील शरणापूर रोडवरील आनंदी गोपाळ पार्कमध्ये माजी कुलसचिव नानासाहेब कापडणीस आणि त्यांचे पुत्र अमित कापडणीस रहायचे. अमित यांनी एम.बी.बी.एस.चे शिक्षण पूर्ण केलेय. मात्र, ते प्रॅक्टीस करायचे नाहीत. नाशिकमध्ये कापडणीस यांची प्रचंड संपत्ती आहे. पंडित कॉलनीमध्ये चार प्लॅट, सावरकरनगरमध्ये दोन मोठे बंगले, 97 लाखांचे शेअर्स ट्रेडिंग, 20 लाखांची मुदतपूर्ण ठेव, 30 लाखांची मुदतपूर्ण ठेव, देवळाली कॅम्पमध्ये टोलेजंग रो-हाऊस, नानावलीत 14 लाखांचा गाळा आहे. इतरही त्यांची अमाप संपत्ती आहे. शिवाय कापडणीस पिता-पुत्र दोघेच रहायचे. हे पाहून त्याने नियोजनपद्ध पद्धतीने त्यांचा खून करून संपत्ती हडपण्याचा डाव आनंदी गोपाळ पार्कमधील हॉटेल व्यावसायिक राहुल जगताप याने रचला.

राहुल जगतापने अमित कापडणीस याच्याशी मैत्री केली. त्यानंतर अमितला व्यसनाधीन केले. तर डिसेंबरमध्ये नानासाहेब कापडणीस यांना गुंगीचे औषध देऊन शहराबाहेर नेले. पालघर जिल्ह्यातील मोखाडा घाटात त्यांचा गळा आवळून खून केला. मृतदेह दरीत फेकून दिला. तर अमितला भंडारदरा येथे फिरण्यासाठी जाण्याच्या बहाण्याने शहराबाहेर नेत त्याचाही खून केला. त्याचा मृतदेह वाकी घाटात जाळून फेकून दिला.हे दोन्ही मृतदेह संबंधित भागातील पोलिसांना सापडले. मात्र, त्या दरम्यान जवळच्या पोलीस ठाण्यात कुठेही बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली नव्हती. त्यामुळे तपास रखडला.

कापडणीस यांच्या पत्नी आणि मुलगी या मुंबईत राहतात. त्यांची मुलगी शीतलने कापडणीस यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचा मोबाइल राहुल जगतापकडे आढळला. त्या वडील आणि भावाला भेटायला नाशिकमध्ये आल्या. मात्र, तुमच्या घराचे काम सुरू आहे. त्यामुळे कापडणीस दुसऱ्या फ्लॅटमध्ये रहायला गेल्याची थाप राहुलने मारली. त्यामुळे मुलगी शीतल पुन्हा मुंबईला गेली. त्यानंतरही वडिलांशी संपर्क झाला नाही. त्यामुळे त्या नाशिकला आल्या. त्यांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांना राहुलवरच संशय आला. त्यांनी तपास केला असता खुनाला वाचा फुटली.

खून केल्यानंतर कोकणात जंगी पार्टी

हत्याकांडानंतर राहुल जगतपाने त्यांच्या खात्यावरील मोठी रक्कम आरटीजीएसद्वारे आपल्या खात्यावर वर्ग केली. कापडणीस यांच्या खात्यातून शेअर्स विकस पैसा काढला. हे सारे रेकॉर्डवर होते. त्यानंतर आपले मित्र आणि हॉटेलमधील 22 सहकाऱ्यांना रत्नागिरीला नेत तिथे थर्टीफर्स्टची जोरदार पार्टी केली. कापडणीस यांच्या कुटुंबापैकी दुसरे कोणीही नाशिकमध्ये नाही. त्यामुळे कापडणीस पिता-पुत्र कुठे गेले आहेत, हे कोणीही विचारले नाही. त्यामुळे आता सारे काही आलबेल झाले आहे असा समाज करून राहुल निर्धास्त झाला होता. पण पैसे काढल्याचा पुरावा असल्यामुळे त्या आधारे पोलिसांनी राहुल जगतापला पोलिसांनी बेड्या ठोकल्या.

Share This News

Related Post

Pune Accident

Pune Accident : पुणे हादरलं ! सिग्नल सुटला अन् आई- वडिलांच्या डोळ्यादेखत जुळ्या मुलींनी सोडला जीव

Posted by - October 17, 2023 0
पुणे : पुण्यात अपघाताचे (Pune Accident) प्रमाण खूप वाढले आहे. अशीच एक अपघाताची घटना समोर आली आहे. यामध्ये दोन जुळ्या…

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते त्रैमासिक ‘शिक्षकमित्र’ या विशेषांकाचं प्रकाशन

Posted by - February 27, 2022 0
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते त्रैमासिक ‘शिक्षकमित्र’ या विशेषांकाचं राजभवन येथे प्रकाशन करण्यात आले. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते त्रैमासिक…

उध्दव ठाकरेंची तोफ आज बुलढाण्यात धडाडणार; शेतकरी मेळाव्याला करणार संबोधित

Posted by - November 26, 2022 0
बुलढाणा: शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची तोफ आज शनिवारी (ता.26 नोव्हेंबर) बुलढाण्यात धडाडणार आहे बुलढाण्यातील चिखली…

ठाण्यात डॉक्टर आणि कुटुंबीयांवर घरात घुसून जीवघेणा हल्ला; हल्ल्याचा धक्कादायक कारण आलं समोर

Posted by - July 7, 2024 0
ठाण्यात एक अतिशय गंभीर घटना घडली आहे. ठाण्यातील उल्हासनगर परिसरात राहणाऱ्या डॉक्टरच्या घरात घुसून डॉक्टर आणि त्यांच्या कुटुंबीयांवर जीवघेणा हल्ला…
IAS Tukaram Mundhe

तुकाराम मुंढेची महिन्याभरातच बदली; ‘या’ विभागाची देण्यात आली जबाबदारी

Posted by - June 2, 2023 0
मुंबई : मागच्या महिन्यात आयएएस तुकाराम मुंढे (IAS Tukaram Mundhe) यांची कृषी आणि पशुसंवर्धन विभागात अतिरिक्त सचिव म्हणून बदली करण्यात…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *