RUPALI THOMBARE : “आम्हाला उगाच चिडायला लावू नका; नारायण राणे आणि त्यांच्या पोरांनी आता आवरत घ्यावं…!”

359 0

पुणे : काल भास्कर जाधव यांच्या घरावर मध्यरात्री हल्ला करण्यात आला. या घटनेवर राजकीय वर्तुळातून पडसाद उमटत असतानाच पुण्याच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रूपाली ठोंबरे यांनी नारायण राणे यांना थेट धमकी वजा इशारा दिला आहे. यावेळी रूपाली पाटील ठोंबरे म्हणाल्या की, हा हल्ला राणे आणि राणे समर्थकांनी केला आहे..पण असे भ्याड हल्ले करायला त्यांना लाजा वाटत नाही. हा भ्याड हल्ला आहे. आम्हाला उगाच चिडायला लावू नका,”असा इशारा रूपाली ठोंबरे यांनी दिला.

त्याचबरोबर “नारायण राणे आणि त्यांच्या दोन पोरांनी आता आवरत घ्यावं. खरंच यांना बाळासाहेब ठाकरे यांचा शाप लागलाय. इथले कर्म इथेच फेडावे लागतील याची दक्षता त्यांनी घ्यावी. असे देखील वक्तव्य त्यांनी केले आहे.

दरम्यान भास्कर जाधव यांच्या चिपळूण येथील घरावर हल्ला करण्यात आला. हल्लेखोरांनी त्यांच्या घरावर दगडफेक केली आहे. त्याचबरोबर काही स्टंप आणि पेट्रोलने भरलेल्या बाटल्या देखील आढळून आल्या आहेत. नारायण राणे यांच्या कार्यकर्त्यांनी हा हल्ला केला असल्याचे बोलले जात असून, भास्कर जाधव यांनी आपल्या महाराष्ट्र दौऱ्या दरम्यान राणे पिता-पुत्रांवर केलेल्या जोरदार टीकेमुळे हा हल्ला झाला असल्याचे बोलले जात आहे. भास्कर जाधव करीत असलेली टीका अत्यंत खालच्या पातळीवर करत असल्याचा आरोप राणे समर्थक करत आहेत.

Share This News

Related Post

अर्रर्र .! गंध गुलाल लावून तिरडी माझी सजवा, त्यावर टाकायची फुलं दारूत आधी भिजवा ! वडिलांची अशी होती शेवटची इच्छा, मुलांनीही केली पूर्ण, वाचा ही अजब बातमी

Posted by - March 11, 2023 0
उत्तर प्रदेश : आज-काल खरंच काय होईल हे सांगणं कठीण झालंय. आता एक घटना समोर येते आहे. उत्तर प्रदेश मधून……

दोन दिवसांत नवा व्हिडिओ बॉम्ब – चंद्रकांत पाटील 

Posted by - March 13, 2022 0
देवेंद्र फडणवीस यांच्या घरी मुंबई सायबर पोलिसांची टीम ही आयपीएस पोलीस बदली अहवाल लीक प्रकरणात चौकशीसाठी हजर झाली आहे. केंद्रीय…

‘हर हर महादेव’ चित्रपटावरून पुण्यातील वातावरण तापले; संभाजी ब्रिगेडची आक्रमक भूमिका

Posted by - November 7, 2022 0
पुणे : ‘हर हर महादेव’ या चित्रपटावरून पुण्यातील वातावरण तापले आहे. ऐतिहासिक चित्रपटांमध्ये इतिहासाची मोडतोड केली जात असल्याचा आरोप संभाजी…

सीईटीच्या ऑनलाईन परीक्षेची तारीख पुढे ढकलली, या तारखेपर्यंत करता येणार नावनोंदणी

Posted by - May 6, 2022 0
मुंबई- सीईटीच्या ऑनलाईन परीक्षेची तारीख पुढे ढकलण्यात आली असून आता विद्यार्थ्यांना ११ मे च्या मध्यरात्रीपर्यंत रजिस्ट्रेशन करता येणार आहे. एमएचटी…
Pune Crime News

Pune Crime News : पुणे हादरलं ! नगर रस्त्यावर ट्रकच्या धडकेत 2 विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू

Posted by - May 28, 2024 0
पुणे : पुण्यातून एक भीषण अपघाताची (Pune Crime News) घटना समोर आली आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. नगर रस्त्यावरून…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *