तुम्हाला माहित आहे का ? मकर संक्रांतीला काळे कपडे घालण्यामागे ‘हे’ आहे कारण

1539 0

हिंदू सणासुदीला सामान्यपणे काळ्या रंगाचे कपडे वापरले जात नाहीत. कारण काळा रंग अशुभं असल्याचं मानलं जातं. मात्र हाच काळा रंग संक्रांतीच्या दिवशी आवर्जून परिधान केला जातो. यामागे काय खास कारण आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो. त्यामुळेच या संक्रमणाला मकर संक्रांत असं म्हटलं जातं.

हा दिवस हिवाळ्यामधील सर्वात थंड दिवस असतो. तसेच या संक्रमण कालावधीतील २४ तासांमध्ये रात्रीची वेळ ही दिवसापेक्षा अधिक असल्यान रात्र मोठी असते. म्हणूनच यादिवशी काळे कपडे घालण्यामागे हे एक महत्त्वाचं कारण असल्याचं सांगितलं जातं.

हा हिवाळ्यातील सर्वात थंड दिवस असतो. त्यामुळेच अधिक उष्णता शोषून घेणारे काळे कपडे या दिवशी आवर्जून परिधान केले जातात. इतर कोणत्याही रंगाच्या कपड्यांच्या तुलनेत उष्णता शोषून घेण्याची काळ्या रंगाची क्षमता अधिक असते. त्यामुळे शरीराला ऊब मिळते. काळ्या रंगाच्या कपड्यांचा फायदा शरीर उबदार ठेवण्यासाठी होतो. म्हणून अगदी लहान मुलांपासून वयस्कर लोकांपर्यंत सारेच जण या दिवशी काळ्या कपड्यांना प्राधान्य देतात.

संक्रांतीच्या काही दिवस आधीपासूनच सगळीकडे काळ्या रंगाची पैठणी, विविध साड्या, कुर्ते, लहान मुलांचे कपडे लक्ष वेधून घेतात. हल्ली पुरुषही काळ्या रंगाचा ट्रेंड फॉलो करताना दिसतात. इतर सणांना वर्ज्य असलेल्या काळया रंगाची जादू संक्रांतीला मात्र उठून दिसते.

Share This News

Related Post

#प्रेमकथा : धकाधकीच्या जीवनातील शीण घालवण्यासाठी ‘शिणवार’ सज्ज

Posted by - January 23, 2023 0
मराठी चित्रपट सृष्टीत सध्या नवनवीन प्रयोग होण्यास सुरुवात झाली आहे. अनेक विविध विषय घेऊन नवनवीन कलाकार सिनेसृष्टीत पदार्पण करत आहेत.…

कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक : भाजप उमेदवाराचे नाव थोड्या दिवसात दिल्ली मधून जाहीर होणार – चंद्रकांत पाटील

Posted by - January 23, 2023 0
पुणे : दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर कसबा मतदारसंघासाठी पोटनिवडणूक जाहीर झाल्यानंतर उमेदवारीसाठी अनेक साठणिक नेते इच्छुक आहेत. दरम्यान…

मशिदीवरील भोंगे खाली उतरवले जात नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार !

Posted by - May 4, 2022 0
मुंबई- आमचे हे एक दिवसाचे आंदोलन नसून मशिदीवरील भोंगे खाली उतरवले जात नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असा इशारा मनसे…
Karuna Sharma

Karuna Sharma : करुणा शर्मा यांनी बावनकुळेंची भेट घेत केली ‘ही’ मोठी मागणी

Posted by - June 30, 2023 0
बीड : करुणा शर्मा (Karuna Sharma) यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची भेट घेतली आहे.…
Sunil Tatkare

NCP President: सुनील तटकरे पक्षाचे नवे प्रदेशाध्यक्ष

Posted by - July 3, 2023 0
मुंबई : अजित पवार यांनी राष्ट्रवादी आपल्याबरोबर असल्याचा दावा केल्यानंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष (NCP President) म्हणून त्यांनी सुनील तटकरे यांची राष्ट्रवादीचे…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *