राज ठाकरे भाजपचे अर्धवटराव, धनंजय मुंडे यांची टीका

411 0

सांगली- राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे यांनी माणसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. आता भाजपच्या बोलक्या बाहुल्याचा खेळ सुरु आहे. अर्धवटराव आधी भाजपविरोधात खूप बोलायचे, सीडी लावायचे. एकदा ईडी घुसली आणि अर्धवटराव गप्प बसले अशी टीका मुंडे यांनी केली आहे. सांगलीच्या इस्लामपूरमध्ये राष्ट्रवादी परिसंवाद यात्रेच्या जाहीर सभेत मुंडे बोलत होते.

मुंडे म्हणाले की, पूर्वी रामदास पाध्ये यांचा बोलक्या बाहुल्यांचा खेळ प्रसिद्ध होता. अर्धवटराव आधी भाजपविरोधात खुप बोलायचे. त्यांनी भाजपच्या इतक्या सीडी लावल्या की त्यांच्यामागे ईडी लागली असेही धनंजय मुंडे म्हणाले. राज ठाकरे हे भाजपचे भोंगे म्हणून काम करत असल्याचे धनंजय मुंडे म्हणाले.

महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादीचे 100 च्या वर आमदार येतील आणि राज्यात राष्ट्रवादी पक्षाचा एक दिवस मुख्यमंत्री होणार असा विश्वास मुंडे यांनी व्यक्त केला. दरम्यान, धनंजय मुंडे यांच्या टीकेवर महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ‘अहो धनंजय मुंडेराव, तुम्ही ज्यांची ‘ अर्धवटराव म्हणून खिल्ली उडवताय , ते राजसाहेब तुमच्यासारख्या ‘ तात्या विंचूचा ओम फट स्वाहा करणार आहेत . राजसाहेबांनी दे दणादण करायला आत्ता कुठे सुरुवात केली आहे . लवकरच तुमचा थरथराट होणार.

Share This News

Related Post

Viral Video

Viral Video : “ए भ**, दहशतवादी..बाहेर फेका याला”, भाजपा खासदाराची घसरली जीभ

Posted by - September 22, 2023 0
संतापाच्या भरात अनेक राजकीय नेतेमंडळींची जीभ घसरल्याच्या घटना (Viral Video) आपण अनेकदा पहिल्या असतील. यामुळे अनेक नेत्यांच्या अडचणींमध्ये वाढ झाल्याचे…
Loksabha 2024

Lok Sabha Election : विदर्भातील ‘या’ 5 जागांवर होणार रंगतदार लढती

Posted by - March 26, 2024 0
नागपूर : लोकसभा निवडणुकीचा (Lok Sabha Election) पहिला टप्प्यासाठी मतदान हे 19 एप्रिलला होणार आहे. महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातील…
Uddhav Thackeray Nashik Visit

Uddhav Thackeray Nashik Visit : उद्धव ठाकरेंचे नाशिकमध्ये आगमन; काळाराम मंदिराचे घेणार दर्शन

Posted by - January 22, 2024 0
नाशिक : आगमी लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाने आज नाशिकमध्ये (Uddhav Thackeray Nashik Visit) राज्यस्तरीय अधिवेशन आयोजित…

युक्रेन येथून जिल्ह्यातील १०२ विद्यार्थी सुखरूप परतले ; जिल्हाधिकाऱ्यांसह अन्य अधिकाऱ्यांनी घेतली विद्यार्थ्यांची भेट

Posted by - March 7, 2022 0
युक्रेन देशामध्ये युद्धजन्य परिस्थिती असल्याने भारतातून युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षणासाठी गेलेल्या १०२ विद्यार्थ्यांना सुखरूप परत आणण्यात शासन व प्रशासनाला यश आले…

रामदेवबाबांच्या विरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेसची गुडलक चौकात निदर्शने

Posted by - November 26, 2022 0
पुणे : कथीत योगगुरु रामदेव बाबा यांनी महिलांबाबत केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने गुडलक चौक येथे…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *