‘मी तोंड उघडलं तर पळता भुई थोडी होईल..’. देवेंद्र फडणवीस यांचा उद्धव ठाकरे यांना इशारा

565 0

घरी बसून राजकारण करणाऱ्यांनी मला शिकवू नये. आम्ही तोंड उघडलं तर त्यांना पळता भुई थोडी होईल, असा इशारा देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना दिला आहे. रोशनी शिंदे यांना झालेल्या मारहाण प्रकरणानंतर उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांचा उल्लेख फडतूस गृहमंत्री असा केला होता त्यावर फडणवीस यांनी या टीकेचा खरपूस समाचार घेतला.

फडणवीस म्हणाले, ” नेमके फडतुस कोण आहे हे जनतेला माहित आहे. फडतूस कोण हे महाराष्ट्राला माहित आहे, आम्ही तोंड उघडलं तर त्यांना पळता भुई थोडी होईल. उद्धव ठाकरेंच्या फ्रस्ट्रेशनला खरंतर उत्तर देण्याची गरज नाही. त्यांच्यापेक्षा खालच्या भाषेत मला उत्तर देता येते. मी नागपूरचा आहे हे त्यांनी लक्षात घ्यावे ”

“मोदींचे नाव घेऊन निवडून आले आणि खुर्चीसाठी लाचारपणा कुणी केला हे महाराष्ट्राला माहित आहे. कोरोनाकाळात घरी बसून राजकारण करणाऱ्यांनी मला शिकवू नये. दोन मंत्री जेलमध्ये गेले आहे. जेलमध्ये गेल्यानंतरही त्यांचा राजीनामा घेण्याची हिंमत जे मुख्यमंत्री दाखवत नाहीत, जे गृहमंत्री वाझेच्या मागे लाळ घोटतात. त्यांना बोलण्याचा अधिकार नाही. अडीच वर्षे घरात बसून काम करणाऱ्या व्यक्तीने आम्हाला राजकारण शिकवू नये.

दोन मंत्री जेलमध्ये गेले आहे. जेलमध्ये गेल्यानंतरही त्यांचा राजीनामा घेण्याची हिंमत जे मुख्यमंत्री दाखवत नाही, जे गृहमंत्री वाझेच्या मागे लाळ घोटतात. त्यांना बोलण्याचा अधिकार नाही. अडीच वर्षे घरात बसून काम करणाऱ्या व्यक्तीने आम्हला राजकारण शिकवू नये. आम्ही तोंड उघडले तर त्यांना पळता भुई होईल. आम्ही संयमाने वागणारे लोक आहोत. आम्हाला तोंड उघडायाला लावू नका.हा त्यांचा थैयथैयाट आहे याला उत्तर देण्याचे कारण नाही ”

“पाच वर्षे राज्याचा गृहमंत्री आहे. अनेकांना अडचण होत आहे. मी गृहमंत्री पद सोडण्याची वाट बघत आहेत. मी गृहमंत्रीपद सोडणार नाही. चुकीचे काम करणाऱ्या व्यक्तीला तुरुंगात पाठवणार आहे. विरोधक राजाविरोधात बोलतात तेव्हा समजावं राजा योग्य आहे” असे फडणवीस म्हणाले.

काय म्हणाले होते उद्धव ठाकरे ?

सोमवारी रात्री, शिवसेना शिंदे गटाच्या महिला कार्यकर्त्यांनी ठाकरे गटाच्या रोशनी शिंदे यांना बेदम मारहाण केली. रोशनी शिंदे यांची आज रुग्णालयात ठाकरे कुटुंबीयांनी भेट घेतली. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. एक फडतूस गृहमंत्री राज्याला मिळाला आहे. उपमुख्यमंत्रीपद मिळाले म्हणून लाचारी, लाळघोटेपणा करणारी व्यक्ती ‘फडणवीसी’ करत आहे, अशा कठोर शब्दांत उद्धव ठाकरे यांनी शिंदे सरकारवर घणाघाती टीका केली. स्वतःच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना मिंधे गटाच्या लोकांनी बेदम मारहाण केली. तरी, त्यावर कारवाई होत नाही. स्वत:च्या कुटुंबीयांची काही गोष्ट असली की आरोपीला परराज्यातूनही अटक होते असे ठाकरे म्हणाले. फडणवीस यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी देखील उद्धव ठाकरे यांनी केली.

Share This News

Related Post

Jyoti Mete

Jyoti Mete : ज्योती मेटे पुण्यात शरद पवारांच्या भेटीला; बीडमधून उमेदवारी मिळणार?

Posted by - March 19, 2024 0
पुणे : बीड लोकसभा मतदारसंघात भाजपकडून पंकजा मुंडे यांना उमेदवारी देण्यात आली असून, महाविकास आघाडीचा उमेदवार मात्र अजूनही ठरलेला नाही.…

कोंढव्यात बॉम्ब बनवण्याचे प्रशिक्षण; दहशतवादी वास्तव्यास असलेली इमारत एनआयएने केली जप्त

Posted by - March 17, 2024 0
कोंढव्यात बॉम्ब बनवण्याचे प्रशिक्षण; दहशतवादी वास्तव्यास असलेली इमारत एनआयएने केली जप्त गेल्या काही दिवसात राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) पुणे शहर…

Lok Sabha Election Result 2024 Live Updates : कल्याण मतदारसंघातून श्रीकांत शिंदे विजयी

Posted by - June 4, 2024 0
लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रातील निकालांकडे केवळ राज्यातील जनतेचेच नाही तर…

फोन टॅपिंग प्रकरण : रश्मी शुक्लांना क्लीन चिट देण्यास कोर्टाचा नकार

Posted by - December 28, 2022 0
पुणे : पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त आणि सध्याच्या सीआरपीएफच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या अडचणीत वाढ होताना दिसतेय. या प्रकरणाच्या…

राहुल शेवाळे प्रकरणातील पीडितेचे फेसबुक लाईव्ह केल्याप्रकरणी महिला आयोग राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील यांच्यावर करणार कारवाई

Posted by - December 26, 2022 0
पुणे : राहुल शेवाळे प्रकरणातील पीडितेचे फेसबुक लाईव्ह केल्याप्रकरणी महिला आयोग राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील यांच्यावर कारवाई करन्यात येणार आहे.…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *