संजय राऊत यांना धमकी देणाऱ्या संशयिताच्या बाबत देवेंद्र फडणवीस यांनी दिली महत्वाची माहिती

727 0

शिवसेना खासदार संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या एका संशयित तरुणाला पुणे पोलिसांनी ताब्यात घेऊन मुंबई पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. आता या प्रकरणाची महत्वाची अपडेट आली असून त्याची माहिती गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

राहुल तळेकर (अंदाजे वय 23) असे या संशयित तरुणाचे नाव आहे. पुण्यातील गुन्हे शाखेने शुक्रवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास खराडी परिसरातील जयशंकर हॉटेलमधून ताब्यात घेतले. संजय राऊत यांना जीवे मारण्याच्या धमकीचे मेसेज आल्यानंतर या मागे नेमकं कोण आहे, हे शोधून काढण्यासाठी मुंबई पोलिसांनी वेगाने तपास सुरु केला. मुंबईतील गुन्हे शाखेच्या मदतीने पुणे पोलिसांनी सापळा रचून तळेकर याला ताब्यात घेतले. त्यानंतर त्याला मुंबई पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की संजय राऊत यांना धमकी देणाऱ्या व्यक्तीची ओळख पटली आहे. धमकी देणारी व्यक्ती दारूच्या नशेत होती, असा प्राथमिक रिपोर्ट आहे. या प्रकरणाचा संपूर्ण तपास केला जाईल. धमकी कोणीही दिली असली तरी कारवाई होईल. राज्यात कोणी कुणाला धमकी दिली तरी पोलीस आणि सरकार शांत बसणार नाही. कोणत्याही व्यक्तीवर कारवाई होईल, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

जे जे लोक चुकीचं काम करतील, बेकायदेशीर काम करतील त्यांच्यावर कारवाई होईल. मी आधीही सांगितलं आहे. आताही सांगतो. मी कुणाला घाबरत नाही. कुणालाही दबत नाही. मी कायद्यानेच वागतो. कायद्यानेच या ठिकाणी राज्य चालेल, धमकीवरून चेष्टा करण्याचं काय कारण आहे? असा सवालही त्यांनी केला.

ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी आली आहे. लॉरेन्स बिश्नोई या गँगस्टरच्या नावाने ही धमकी देण्यात आली आहे. दिल्लीत आल्यावर एके 47 ने उडवून देणार असल्याचं धमकी देणाऱ्याने म्हटलं आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

झेपत नसेल तर गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्या

संभाजीनगर आणि मुंबईतील मालवणीतही दोन गटात राडा झाला. या सर्व राड्यावरून राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुनावले आहे. ज्या पद्धतीने महाराष्ट्रात दंगल झाली आहे. या गोष्टी गंभीर आहेत. त्यामुळे झेपत नसेल तर गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणीच सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

Share This News

Related Post

पिंपरी-चिंचवडमधील धक्कादायक घटना ! हॉरर सिनेमाने घेतला ८ वर्षाच्या मुलाचा बळी

Posted by - June 1, 2022 0
पिंपरी-चिंचवडमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मोबाइलवर हॉरर फिल्म पाहण्याची सवय असणाऱ्या ८ वर्षांच्या मुलाने स्वतःच्या गळ्याभोवती दोरी बांधून…
Sharad Pawar Shirur

मोठी बातमी! शिरूर लोकसभेसाठी राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला; ‘या’ नावावर झालं शिक्कमोर्तब

Posted by - June 5, 2023 0
पुणे : आगामी लोकसभा विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसले असताना आज पुण्यात (Pune) राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाची पदाधिकारी बैठक…

पोलीस भरती 2022 : पोलीस भरती प्रक्रियेत ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी पंधरा दिवसांची मुदत वाढ

Posted by - November 29, 2022 0
मुंबई : पोलीस भरतीत इच्छुक उमेदवारांना मोठा दिलासा देणारी बातमी आहे. ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरताना सर्व्हर डाऊन असल्याने राज्यातील अनेक…
Pune Accident

Pune Accident : अपघाग्रस्त व्यक्तीला विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिला धीर

Posted by - July 10, 2023 0
पुणे : आज दुपारी एक वाजताच्या दरम्यान पुणे (Pune Accident) इथून मुंबईकडे जात असताना पुणे हद्दीतील काळेवाडी जवळील पुलावर दुचाकीवरून…
autorickshaws

ऑटोरिक्षांच्या दरवाढीचा निर्णय प्राधिकरणाच्या पुढील बैठकीपर्यंत प्रलंबित

Posted by - July 28, 2022 0
पुणे : पुणे, पिंपरी-चिंचवड व बारामतीमधील तीन आसनी ऑटोरिक्षांसाठी येत्या १ ऑगस्टपासून लागू करण्यात येणारी भाडेवाढ प्रलंबित ठेवण्याचा निर्णय घेण्यात…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *