ही तर छोटी लढाई… येत्या काळात या सरकारला आणखी दणके देऊ, देवेंद्र फडणवीस यांचा इशारा

339 0

मुंबई- राज्यसभा निवडणुकीच्या निकालानंतर मुंबईतील भाजप कार्यालयात जोरदार सेलिब्रेशन करण्यात आले. यावेळी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर जोरदार निशाणा साधला. ही तर छोटी लढाई होती, अजून मोठी लढाई बाकी आहे, येत्या काळात सरकारला सगळीकडून दणके देऊ असा इशारा फडणवीस यांनी दिला.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, ” राज्यसभा निवडणुकीतील भाजपच्या विजयानंतर अनेकांच्या तोंडाचं पाणी पळाले,काही पिसाळले आहेत. या पराभवानंतर मुख्यमंत्र्यानी आता अंतर्मुख होऊन विचार करायला हवा. मात्र निवडणुकीतील विजयानंतर आनंद साजरा करायचा असतो, त्यांनी उन्माद करायचा नसतो असेही आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले. आपला विजय हा लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांना समर्पित केला पाहिजे. काहीही झाले तरी मतदान करणार या भावनेने ते आले. त्यांच्या मतदानामुळे आमची तिसरी जागा निवडून आली.

“राज्यातील विकास थांबला आहे. आमच्या काळातले सर्व प्रकल्प थांबवून राज्याचं अतोनात नुकसान होत आहे. शेतकऱ्यांची अवस्था वाईट आहे. विमा कंपन्यांना मोठा फायदा होत असून शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले जात आहे. किमान दोन कामे राज्य सरकारने दाखवावी असे आव्हानही फडणवीस यांनी दिले.

मी नशीबवान कारण माझं घर मुंबईत नाही

मुंबई मनपात सत्तेत असलेल्या शिवसेनेकडून कंगना राणौत, नारायण राणे, मोहित कंबोज, नवनीत राणा यांच्या घरांना नोटीस बजावण्यात आली होती. देवेंद्र फडणवीस म्हणाले, केवळ बदल्याची भूमिका घेऊन याचं घर पाड.. त्याचं घर पाड… मी तर नशिबवान आहे माझं मुंबईत घरंच नाहीये. मला नोटीस दिली तर सरकारी बंगल्यालाच मिळेल. नाहीतर मलाही नोटीस आलीच असती. मुंबईत घर नसल्यामुळे आणि नागपुरातील घर तंतोतंत नियमात असल्यामुळे मला नोटीस आलेली नाही. ही पद्धत योग्य नाही. केवळ सरकार चालवण्यासाठी, पदांसाठी सरकार चालवायचं. समाजातील एकाही घटकाचा विचार करायता नाही ही अवस्था आज पहायला मिळते ती अत्यंत खराब आहे.

आता विधान परिषदेवर लक्ष

फडणवीस यांनी आगामी विधान परिषदेसाठी भाजप सज्ज असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. विधान परिषदेची जागा आपण लढवत आहोत निवडणूक सोपी नसल्याचेही त्यांनी सांगितले. विधान परिषद निवडणुकीत राज्यसभेपेक्षाही अधिक लोकांची सदसद्‌बुद्धि जागृत असेल असा दावा त्यांनी केला.

Share This News

Related Post

नाना पटोले आणि बच्चू कडू यांचे फोन कोणाच्या नावाने टॅप झाले ? गृहमंत्र्यांनी दिली माहिती

Posted by - February 26, 2022 0
मुंबई- फोन टॅपिंग प्रकरणी पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे गृहमंत्री दिलीप…
Rohit Pawar

Rohit Pawar : रोहित पवारांच्या युवा संघर्ष यात्रेवर पोलिसांकडून लाठीचार्ज

Posted by - December 12, 2023 0
नागपूर : नागपुरात पोहोचलेल्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्या युवा संघर्ष यात्रेवर पोलिसांनी लाठीचार्ज केला आहे. आपल्या मागण्यांसाठी…

समाजातील सर्व घटकांनी मेट्रोने प्रवास करावा पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आवाहन

Posted by - March 6, 2022 0
पुणे मेट्रोसह पुण्यातील विविध उपक्रमांच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावर होते. या दौऱ्यादरम्यान मोदींच्या हस्ते महत्त्वाकांक्षी अशा पुणे…

पुण्यातील बंद आणि मोर्चा बेकायदेशीर; गुणरत्न सदावर्ते यांनी केली उदयनराजे भोसले यांच्या अटकेची मागणी

Posted by - December 13, 2022 0
पुणे : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी केलेल्या अपमानजनक वक्तव्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकच वादंग निर्माण झाला…

भाजप राज्यसभेची तिसरी जागा लढवू शकतो आणि जिंकू शकतो, चंद्रकांत पाटील यांचा आत्मविश्वास

Posted by - May 26, 2022 0
मुंबई – भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय नेतृत्वाने आदेश दिला तर भाजपा राज्यसभेची तिसरी जागा लढवेलही आणि जिंकलही, असा आत्मविश्वास भाजप…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *