ज्येष्ठ चित्रकार रवी परांजपे यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रध्दांजली

255 0

ज्येष्ठ चित्रकार रवी परांजपे यांच्या निधनाने भारतीय चित्रकलेची आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख अधिक ठळक करणारा मनस्वी कलाकार हरपला आहे. चित्रकलेबरोबरच वास्तुशिल्पशास्त्र, प्रकाशन, जाहिरात अशा अनेक क्षेत्रात त्यांनी केलेले काम कायम स्मरणात राहील, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चित्रकार रवी परांजपे यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शोकसंदेशात म्हणतात, रवी परांजपे यांची भारतीय शैलीतील चित्रकार म्हणून स्वतंत्र ओळख होती. चित्रकलेबरोबरच त्यांनी वास्तुशिल्पशास्त्र, प्रकाशन, जाहिरात क्षेत्रात संस्मरणीय काम केले. जागतिक किर्तीच्या नियतकालिकांमध्ये रवी परांजपे यांनी संशोधनपर लेखन केले. कला क्षेत्रातील त्यांच्या योगदानाची दखल घेऊन अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले होते. त्यांच्या निधनाने भारतीय कलाक्षेत्राची मोठी हानी झाली आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

Share This News

Related Post

मेट्रोसह इतर पायाभूत सुविधांची कामे कालबद्धरितीने युद्ध पातळीवर करा ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे वॉर रुम बैठकीत निर्देश

Posted by - August 29, 2022 0
मुंबई : राज्यातील पायाभूत सुविधांचे प्रकल्प गतीने आणि कालबद्धरित्या पूर्ण करण्यासाठी युद्ध पातळीवर संबंधित विभागांनी काम करावे तसेच प्रलंबित बाबी,…

गोविंदांना आरक्षण दिलं , धन्यवाद…! पण मराठ्यांच काय ?

Posted by - August 19, 2022 0
राज्य शासनाने काल जाहीर केलं की, गोविंदांना सरकारी नोकरीमध्ये खेळाडू कोट्यातून ५% आरक्षण देण्यात येणार. याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे…

पर्वती मतदार संघाच्या रेशनिंग कमिटीची मीटिंग तातडीने घ्या-अश्विनी कदम

Posted by - May 1, 2022 0
दर महिन्याच्या १५ ते १८ तारखे पर्यंत सर्व दुकानामध्ये अन्न-धान्य उपलब्ध होते व ते ३० तारखे पर्यंत वाटप करणे अपेक्षित…

राज्याचा राजकारणात विनायक मेटेंनी आपलं वेगळं अस्तित्व सिद्ध केलं – देवेंद्र फडणवीस

Posted by - August 14, 2022 0
मुंबई: शिवसंग्रामचे नेते, आमचे सहकारी, माजी आमदार श्री विनायकराव मेटे यांच्या अपघाती निधनाचे वृत्त अतिशय दुःखद आणि धक्कादायक असून मी…

मराठा आरक्षणप्रश्नी राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयासमोर क्युरेटिव्ह याचिका दाखल करणार

Posted by - April 21, 2023 0
सर्वोच्च न्यायालयासमोर क्युरेटिव्ह याचिका दाखल करणार मुंबई दि. २१: मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाने राज्य शासनाची पुनर्विचार याचिका फेटाळली असली तरी…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *