रेशनिंग तांदुळ छुप्या पद्धतीने विकणाऱ्यांवर कारवाईची मागणी ; लोकजनशक्ती पार्टीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

247 0

पुणे : सार्वजनिक वितरण प्रणालीद्वारे रेशनिंगचा तांदुळ छुप्या पध्दतीने बेकायदेशीररित्या खुल्या बाजारात विक्री करणाऱ्या व त्यांना मदत करणाऱ्यावर व्यक्तींवर मोका कायदयाअंतर्गत गुन्हा दाखल करावा, अशी मागणी लोकजनशक्ती पार्टीचे पुणे शहर – जिल्हा अध्यक्ष संजय आल्हाट आणि पदाधिकाऱ्यांनी केली आहे. आज या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

कोरोनाच्या काळात गरीबांना मोफत धान्य उपलब्ध करून देण्याचे मोलाचे काम केंद्र व महाराष्ट्र शासनाने केले आहे. काही समाज कंटकांनी पैशासाठी हे धान्य छुप्या पध्दतीने विकले. मागील आठवड्यात संगमवाडी येथील एका गोडाऊनवर छापा टाकुन केलेल्या कारवाईत हा काळा बाजार उघडकीस आला आहे. हा काळाबाजार करणारे संतोषकुमार जयहिंद मोरे, प्रेमचंद्र जैन, श्रीमती संतोषी रूपचंद सोळंकी, प्रकाश रूपचंद सोळंकी, प्रमोद रूपचंद सोळंकी, संबंधीत परिमंडळाचे अधिकारी यांच्यावर मोका कायदया अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात यावी, अशी मागणी लोकजनशक्ती पक्षाने केली आहे.

अन्यथा पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.यावेळी शरद टेमगीरे पुणे शहर-जिल्हा कार्याध्यक्ष ,सचिन अहिरे पुणे शहर- जिल्हा महासचिव ,अशोक काशिद,के.सी. पवार पुणे शहर सरचिटणीस , तुषार ननावरे उपस्थित होते.लोकजनशक्ती पार्टीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

Share This News

Related Post

Jalna News

Jalna News : जालना हादरलं ! SRPF जवानाने स्वत:वरच गोळी झाडून आयुष्याचा केला शेवट

Posted by - September 30, 2023 0
जालना : जालनामध्ये (Jalna News) एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका SRPF जवानाने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली आहे.…

धक्कादायक : चारित्र्याच्या संशयावरून पत्नीच्या मित्राचा खून; चाकूनं भोसकून दहाव्या मजल्यावरून खाली ढकललं, पतीला अटक VIDEO

Posted by - October 28, 2022 0
भोसरी : पत्नीच्या मित्राला धारदार शस्त्रानं भोसकून दहाव्या मजल्यावरील राहत्या घराच्या गॅलरीतून ढकलून दिल्याची धक्कादायक घटना भोसरी एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या…

#MPSC च्या विद्यार्थ्यांना आणखी एक दिलासा; EWS प्रमाणपत्राची अट शिथिल, वाचा सविस्तर बातमी

Posted by - March 24, 2023 0
MPSC च्या विद्यार्थ्यांना राज्य शासनाने मोठा दिलासा दिला आहे. विद्यार्थ्यांना आणखी एक मोठा दिलासा मिळाला आहे. EWS प्रमाणपत्राची अट आता…
Stones Pelted

Stones Pelted : धक्कदायक! समृद्धी महामार्गावर धावत्या बसवर दगडफेक, अनेक प्रवासी जखमी

Posted by - June 18, 2023 0
वाशिम : वाशिममधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. यामध्ये कारंजा ते शेलू बाजारदरम्यान ढाकली किनखेड परिसरात समृद्धी महामार्गावर सात…
Ramesh Wanjale's Family

Ramesh Wanjale’s Family : दिवंगत माजी आमदार रमेश वांजळे यांच्या कुटुंबीयांचा अजित पवारांना पाठिंबा

Posted by - July 7, 2023 0
पुणे : दिवंगत माजी आमदार रमेश वांजळे (Ramesh Wanjale’s Family) यांच्या पत्नी हर्षदा वांजळे, कन्या मा. नगरसेविका पुणे महापालिका सायली…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *