देहूनगरीमध्ये आजपासून मांस, मच्छी विक्री आणि नदीतील मासे पकडण्यास बंदी

591 0

पिंपरी – आज, शुक्रवार १ एप्रिलपासून श्रीक्षेत्र देहू नगरीत मांस, मच्छी विक्री आणि इंद्रायणी नदीतील मासे पकडण्यास बंदी घालण्यात आली आहे. याबाबतचा ठराव फेब्रुवारी महिन्यात झालेल्या नगरपंचायतीच्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आला आहे.

देहू हे तीर्थक्षेत्र असून, लाखो वारकरी देहूत दाखल होऊन संत तुकाराम महाराजांचे दर्शन घेत असतात. वारकरी परंपरा आणि तीर्थक्षेत्र असल्याने देहूत मांस, मच्छी विक्री आणि इंद्रायणी नदीतील मासे पकडण्यास बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.आजपासून या नियमाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. या नियमांचे उल्लंघन केल्यास थेट पोलीस कारवाई होणार आहे. या निर्णयामुळे देहूनगरी शुद्ध शाकाहारी बनली आहे.

याआधी ग्रामपंचायतीनेसुद्धा हा निर्णय घेतला होता. मात्र ग्रामपंचायत बरखास्त झाली आणि कोरोनाचाही काळ सुरू झाला. त्यामुळे प्रशासक असताना मांस, मच्छी विक्री सुरू झाली.

Share This News

Related Post

Pune News

Pune News : पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी; विद्यापीठ चौकात आजपासून होणार वाहतूक मार्गांत बदल

Posted by - November 10, 2023 0
पुणे : आचार्य आनंद ऋषी चौकातील (सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ) मेट्रोसाठीच्या उड्डाणपुलाचे काम चौकात सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे विद्यापीठ…

चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता ; कसबातून कोणाला मिळणार उमेदवारी ?

Posted by - January 20, 2023 0
चिंचवड : पुण्यातील कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे निधन झाल्याने…

धक्कादायक ! शॉर्ट कपडे घातल्याच्या कारणातून पुण्यात काही तरुणींना मारहाण

Posted by - March 5, 2022 0
शॉर्ट कपडे घालून परिसरात फिरतात म्हणून पुण्यात काही तरुणींना चप्पलने मारहाण करण्यात आली आहे. हा धक्कादायक प्रकार खराडी येथील रक्षक…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन

Posted by - July 9, 2022 0
नवी दिल्ली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज महाराष्ट्र सदनाच्या परिसरात स्थित महापुरुषांच्या पुतळयांना पुष्प अर्पण करून अभिवादन केले. मुख्यमंत्री…

मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावा हीच विनायक मेटेंना श्रद्धांजली; विनायक मेटेंच्या पत्नीची सरकारला विनंती

Posted by - August 22, 2022 0
मुंबई: शिवसंग्रामचे अध्यक्ष माजी आमदार विनायक मेटे यांचं 14 ऑगस्ट रोजी पहाटे मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर भीषण आपघात झाला असून…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *