दत्तात्रेय जयंती 2022 : श्री दत्तजयंतीचे महत्व, दत्तात्रेय बीज मंत्र, गुरुचरित्र वाचन सप्ताह समाप्ती, पौर्णिमा तिथी वाचा सविस्तर माहिती

358 0

दत्तात्रेय जयंती 2022 : दत्तजयंती ही हिंदू पंचांगात असलेल्या मार्गशीर्ष पौर्णिमा या तिथीला साजरी केली जाते. हा दिवस म्हणजे भगवान दतात्रेय यांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. देशभरातील आणि विशेषतः महाराष्ट्रात हिंदू दिनदर्शिकेनुसार (डिसेंबर/जानेवारी) मार्गशीर्ष (अग्रहायण) महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी हा उत्सव साजरा केला जातो.

दत्त संंप्रदाय
दत्तजयंती उत्सव रायपाटण (तालुका राजापूर)
दत्तात्रेयांनी दीनदलितांची सेवा करण्याचे व समाजातील दुःख व अज्ञान दूर करण्याचे कार्य चालू ठेवले. त्यांच्या पश्चात श्रीपाद श्रीवल्लभ, श्रीनृसिंह सरस्वती व वासुदेवानंद सरस्वती हे त्यांचे अवतार मानण्यात येतात. दत्ताची स्थाने प्रयाग येथे, आणि महाराष्ट्रात औदुंबर, गाणगापूर, माहूर, नृसिंहवाडी, कुरवपूर, कर्दळीवन या ठिकाणी आहेत. श्री दत्तांच्या कार्यावर लिहिलेला गुरुचरित्र हा ग्रंथ या महिन्यात भक्तिभावाने वाचला जातो.

दत्तात्रेय किंवा दत्त हे अत्री ऋषी व माता अनसूया यांचे पुत्र होत. तीन तोंडे, सहा हात, दोन पाय, चतुर्वेददर्शक चार श्वान व जवळ कामधेनू (गोमाता) असलेले दत्तात्रेय हे ब्रह्मा, विष्णू, महेश यांचे एकस्वरूप आहे. दत्तात्रेय हे हिंदू धर्मातील पहिले गुरू समजले जातात. हिंदू धर्माचा प्रसार करण्याच्या उद्देशाने दत्तात्रेयांनी भारतभम्रण केले. ठिकठिकाणी त्यांची स्थाने (गादी) निर्माण करून आपली परंपरा चालू ठेवली. महाभारताच्या अनुशासन पर्वात देखील दत्त जन्माचा उल्लेख सापडतो.

गुरुचरित्र वाचन सप्ताह
भगवान दत्तात्रेय यांच्याशी संबंधित दत्त संप्रदायाचा महत्त्वाचा ग्रंथ म्हणजे श्री गुरुचरित्र हा होय. दत्त जयंतीपूर्वी सात दिवस दत्त भक्त पुरुष या गुरुचरित्र ग्रंथाचे काटेकोर नियम पाळून वाचन करतात. दत्त जयंतीला या वाचनाचे पारणे करतात.गुरुचरित्र या ग्रंथात एकूण ५२ अध्याय असून त्यात ७४९१ ओव्या आहेत. मंगलाचरण, गुरुभक्ती आणि गुरुप्रसाद हे या ग्रंथाचे प्रमुख विषय आहेत. गुरुचरित्राचे विशेष म्हणजे वेदान्त आणि क्रियाशून्य भक्तीला येथे स्थान नाही. नृसिंह सरस्वती या व्यक्तीपेक्षा गुरू या पदाला आणि गुरु-शिष्य या नात्याला गुरुचरित्रात महत्त्व दिलेले आढळते. अवतरणिका असे विषय या ग्रंथामध्ये आहेत.गुरुची कृपा प्राप्त करणे, ऐहिक आणि पारमार्थिक जीवनातील यश मिळविणे याचे मार्गदर्शन करणारा हा ग्रंथ आहे. श्रीपाद श्रीवल्लभ आणि नृसिंह सरस्वती ही दोघेही दत्तात्रेय यांचा अवतार मानले गेले आहेत. त्यामुळे त्यांच्या विषयी या ग्रंथात विशेष वर्णन आलेले दिसून येते. पारायण संपले की आपल्या संकल्प किंवा इचे प्रमाणे ब्राह्मण आणि सुवासिनी यांना भोजन आणि दक्षिणा देऊन पारायण पूर्ण झाले असे मानले जाते.

दत्तात्रय जयंती 2022 : दिनांक व वेळ
दत्तात्रेय जयंती : ७ डिसेंबर २०२२
पौर्णिमा तिथी सुरू : ७ डिसेंबर २०२२, सकाळी ८ वाजून ०१ मिनिटांनी.
पौर्णिमा तिथीची सांगता ८ डिसेंबर २०२२ रोजी सकाळी ०९ वाजून ३७ मिनिटांनी होत आहे.

दत्तात्रेय जयंती 2022: दत्तात्रेय बीज मंत्र
दक्षिणामूर्ती बीजम च रामा बीकेन संयुक्तम् .
द्राम इत्तेकाक्षराम ग्नेयम् बिंदुनाथकलाटमकम
दत्तस्यादी मंत्रस्य दत्रेय स्यादिमेश्वरहा
तत्रस्थरेफा संयुक्तम् बिंदुनाडा कलाात्मिका
यतत बीजम मायापा रोख्तम् ब्रह्म-विष्णु- शिव नमकम

माहिती : गुगल

Share This News

Related Post

भारत-इराण मैत्रीसंबंध आणखी दृढ व्हावेत यासाठी कायदेमंडळांनी पुढाकार घ्यावा…!

Posted by - September 15, 2022 0
इराणच्या महिला संसद सदस्यांचा विधिमंडळात उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे हस्ते सन्मान मुंबई : भारत आणि इराण या दोन देशांमध्ये…

भारती विद्यापीठात इंडस्ट्री इन्स्टिट्यूट पार्टनरशिप समिट उत्साहात… पाहा

Posted by - September 19, 2022 0
पुणे : भारती विद्यापीठ डीम्ड युनिव्हर्सिटीच्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड आंत्रप्रेनरशिप डेव्हलपमेंट (IMED) द्वारे आयोजित इंडस्ट्री इन्स्टिट्यूट पार्टनरशिप समिट 2022…

शिवाजी नगर ते हिंजवडी मेट्रो प्रकल्प प्राधान्याने पूर्ण करणार – दीपक केसरकर

Posted by - August 25, 2022 0
पुणे : पुणे शहरातील वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्यासाठी सर्व संबंधितांची व्यापक बैठक बोलावली जाईल, असे मंत्री दीपक केसरकर यांनी आज…
TUSHAR HAMBIRARO

PUNE POLICE : तुषार हंबीरराव हल्ला प्रकरणातील ‘ते’ तीन पोलीस शिपाई निलंबित

Posted by - September 20, 2022 0
पुणे : खून या सारख्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी तुषार हंबीर हा येरवडा कारागृहामध्ये होता. त्याच्यावर वैद्यकीय उपचारासाठी त्याला 28 ऑगस्ट…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *