सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या शौर्यगाथेवर आधारित ‘दर्यासारंग’ चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित

1275 0

फर्जंदच्या यशानंतर डॉ. अनिरबान सरकार निर्मित आणि डेक्कन एव्ही मीडिया प्रस्तुत ‘दर्यासारंग’ या चित्रपटाचा मोशन पोस्टर आणि पोस्टर अनावरण सोहळा पार पडला. या चित्रपटाचे निर्माते डॉ. अनिरबान सरकार यांच्या हस्ते पोस्टरचे अनावरण करण्यात आले. 

याप्रसंगी डॉ अनिरबान सरकार म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराजांसोबत असे अनेक अपरिचित मावळे आहेत ज्यांची वीरगाथा, त्यांचं शौर्य आजच्या तरुणाई समोर येणं महत्त्वाचं आहे. फर्जंदमधून कोंडाजी फर्जंद यांची शौर्यगाथा समोर आल्यानंतर अनेकांनी त्यावर संशोधन केलं. आणि आता मराठा आरमार प्रमुख सरखेल कान्होजी आंग्रे यांची शौर्यगाथा चित्रपटाच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न आहे”

“शिवाजी महाराजांचा योग्य इतिहास तरुणाई समोर येणं गरजेचं आहे. पुढच्या काही दिवसातच लेखक, दिग्दर्शक, प्रमुख कलाकार यांची नावं जाहीर करू. आणि या चित्रपटानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या अशाच अपरिचित मावळ्यांची वीरगाथा चित्रपटाच्या माध्यमातून मांडण्याचा मानस आहे. फर्जंद प्रमाणे दर्यासारंगलाही प्रेक्षक उत्तम प्रतिसाद देतील अशी आशा आहे” असे डॉ. अनिरबान सरकार म्हणाले.

कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने करण्यात आली. कार्यक्रमाचे निवेदन बागेश्री पारनेरकर हिने केले. आभार प्रदर्शन डेक्कन एव्ही मीडियाच्या साची गाढवे यांनी केले. कार्यक्रमाला डेक्कन एव्ही मीडियाचे संचालक अजय कांबळे, तंत्रज्ञ टीम आणि इतर कर्मचारी उपस्थित होते.

 

Share This News

Related Post

बारसूतील रिफायनरीला ग्रामस्थांचा तीव्र विरोध, रस्त्यावर झोपून महिलांनी अडवली पोलिसांची वाट

Posted by - April 25, 2023 0
राजापूर- रत्नागिरी जवळील बारसूमध्ये नियोजित रिफायनरी प्रकल्पाला (refinery protest)ग्रामस्थांचा तीव्र विरोध होत असल्यामुळे पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.…

ॲड. गुणरत्न सदावर्ते यांना जेल की बेल ; थोड्याच वेळात निर्णय

Posted by - April 9, 2022 0
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्वर ओक निवासस्थानी झालेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांना काल…
Indurikar Maharaj

Indurikar Maharaj : इंदुरीकर महाराजांना सुप्रीम कोर्टाचा दणका; ‘ती’ याचिका फेटाळली

Posted by - August 8, 2023 0
प्रसिद्ध कीर्तनकार हभप निवृत्ती महाराज इंदुरीकर (Indurikar Maharaj) यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिलेला निकाल कायम ठेवत सर्वोच्च…

राज ठाकरे यांच्या भोंग्याबाबतच्या विधानानंतर नगरसेवक वसंत मोरे संभ्रमात

Posted by - April 5, 2022 0
पुणे – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या दिवशी शिवतीर्थावरून आव्हान देत मशिदीवरील भोंगे हटवण्याबाबत इशारा दिला होता. आता राज…

निलेश माझीरे यांना महाराष्ट्र नवनिर्माण माथाडी कामगार सेना जिल्हाध्यक्ष पदावरून हटवले; पुण्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा

Posted by - December 3, 2022 0
पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अधिकृत ट्विटर अकाउंट वरून निलेश माझेरे यांना महाराष्ट्र नवनिर्माण माथाडी कामगार सेना पुणे जिल्हाध्यक्ष पदावरून…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *