श्री देवी चतुःशृंगीचे दर्शन एका क्लिकवर ; या नवरात्र उत्सवापासून देवस्थान ट्रस्टची भाविकांसाठी ऑनलाईन दर्शन पासची व्यवस्था

235 0

श्री देवी चतुःशृंगी मंदिर ट्रस्टच्या वतीने भाविकांना या नवरात्र उत्सवामध्ये देवीचे मनभरून आणि सहज दर्शन व्हावे यासाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे . यामध्ये भाविकांच्या सुरक्षेसह, आरोग्य, आनंद, भक्तिमय वातावरणात भजन , कीर्तन प्रवचन सामूहिक श्रीसुक्त पठण, वेदपठण यासारख्या कार्यक्रमाचे देखील आयोजन करण्यात आले आहे . कशी असेल या वर्षीचा नवरात्रौत्सव 2022 साठीचे श्री देवी चतुःशृंगी दर्शन व्यवस्था पाहुयात …

See the source image

1. नवरात्र उत्सव दि. 26 सप्टेंबर ते 5 ऑक्टोंबर 2022
2. नवरात्र उत्सवामध्ये मंदिर भाविकांसाठी 24 तास खुले राहिल.
3. घटस्थापना सोमवार दि. 26/09/2022 रोजी सकाळी 9.00 वाजता होईल व त्यानंतर अभिषेक, रुद्राभिषेक, महापूजा, महावस्त्र अर्पण करणे.
4. दररोज सकाळी 10 व रात्री 9 वा. महाआरती होईल.
5. गणपती मंदिरात दररोज भजन, किर्तन, प्रवचन, सामूहिक श्रीसुक्त पठण, वेदपठण होईल.
6. मंगळवार दि. 4/10/2022 रोजी दुपारी 2.30 ते 5.30 नवचंडी होम होणार आहे.
7. बुधवार दि. 5/10/2022 रोजी दुपारी 5 पासून सिमोल्लंघनाची पालखी मंदिरापासून बँड, ढोल, लेझीम, नगारा, चौघडा, भुत्ये, वाघ्या मुरळीसह देवीच्या
सेवेकर्‍यांचा सहभाग. हेलिकॉप्टरमधून देवीवर पुष्पवृष्टी केली जाईल.
8. श्री. नंदकुमार यशवंत अनगळ हे मंदिर व्यवस्थापक विश्वस्त आहेत.
9. पौरोहित्य श्री. नारायण कानडे गुरुजी
10. पुजा साहित्य, लहान मुलांची खेळणी, कपडे, महिलांसाठी दागिने कपडे, गृहपयोगी वस्तु, फोटो, मसाले, खाण्यापिण्याचे पदार्थ यांच्या स्टॉलची रेलचेल.
11. भाविकांच्या सुरक्षेसाठी सुरक्षारक्षक, स्वयंसेवक, पोलिसदल, निमलष्करी दल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच संपूर्ण मंदिर परिसरात
जागोजागी सीसी टीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत.
12. व्यवस्थापन सहाय्यासाठी अनिरूद्ध सेवा केंद्राचे 150 स्वयंसेवक.
13. भाविकांच्या आरोग्यासाठी संपूर्ण परिसरात जंतुनाशके तसेच किटकनाशकांची फवारणी करण्यात आली आहे.
14. ‘ग्रीन हिल्स ग्रुप’च्या सहकार्याने देवस्थान ट्रस्टने 12000 रोपे लावली असून त्यांची उत्कृष्टरीत्या जोपासना केली आहे. त्यास लागणार्‍या खताची निर्मिती
देवीला वाहिलेल्या फुलांच्या निर्माल्यापासून करण्यात येते.
15. अग्निशामक दलाची गाडी (घटस्थापना ते दसर्‍यापर्यंत)
16. ‘24 तास सेवा’ तर्फे भाविकांसाठी रुग्णवाहिका ठेवण्यात आली आहे. युवराज तेली मेमोरिअल ट्रस्ट तर्फे ‘कार्डिक अ‍ॅम्ब्युलन्स’ची सोय करण्यात आली
आहे. तसेच 8 तासाच्या सेवेमध्ये 6 डॉक्टर असे 24 तासात 18 डॉक्टर भाविकांच्या सेवेला उपस्थित असणार आहेत. औषधोपचार मोफत दिले जाणार
आहेत.
17. पॉलिटेक्निक महाविद्यालयाच्या मैदानावर विनामूल्य पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे.
18. भाविकांना देवीचे सुलभ दर्शन व्हावे यासाठी संपूर्ण बॅरिकेडिंगसह रांगांची व्यवस्था करण्यात आली आहे.
19. मंदिर व परिसरात सुशोभिकरण करण्यात आले आहे.
20. मंदिर परिसरात विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. तसेच 24 तास जनरेटरची व्यवस्था करण्यात आलेली आहे.
21. सर्व भाविकांचा यात्रेसह संपूर्ण वर्षाचा रुपये दोन कोटींचा विमा करण्यात आला आहे. कोणतीही दुर्घटना घडल्यास भाविकांना विम्याचे कवच देण्यात आले
आहे.
22. यावर्षी पासून देवस्थान ट्रस्टची भाविकांनी ऑनलाईन दर्शन पासची व्यवस्था केलेली आहे. तसेच मंदिर परिसरात देखील ऑफलाईन दर्शन पासेस
वितरणासाठी तीन काऊंटरची व्यवस्था करण्यात आलेली आहे. ऑनलाईन दर्शन पाससाठी www.chatushrungidevi.com या वेबसाइटवर भाविकांना
ऑनलाइन पास उपलब्ध असणार आहेत.

Share This News

Related Post

Maharashtra politics : ‘मित्र’ च्या उपाध्यक्षपदी अजय अशर यांच्या नियुक्तीने नवीन वाद; विरोधकांनी उठवली टिकेची झोड, वाचा सविस्तर प्रकरण

Posted by - December 3, 2022 0
Maharashtra politics : सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक विषयावरून वादंग निर्माण होत आहेत. या ना त्या कारण सातत्याने राजकीय वर्तुळात टीकाटिप्पणी…
Sunetra Pawar

Sunetra Pawar : सुनेत्रा पवार यांच्या नावावर किती आहे संपत्ती?

Posted by - June 13, 2024 0
पुणे : बारामती लोकसभा मतदारसंघात पराभव झाल्यानंतर सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांची राज्यसभेवर निवड झाली आहे. यावेळी राज्यसभेचा उमेदवारी अर्ज…

कलाजगतातील झगमगता तारा निखळला; असा होता दिवंगत ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचा जीवनप्रवास

Posted by - November 26, 2022 0
‘विक्रम गोखले (३० ऑक्टोबर, १९४७ – २६ नोव्हेंबर, २०२२) हे एक मराठी नाट्य-चित्रपट सृष्टीतील सुप्रसिद्ध नाव. चित्रपट, मालिका आणि नाटक…
Raj Thackeray

Mumbai News : 2 महिन्यात दुकानांवर मराठी पाट्या लावा; सुप्रीम कोर्टाचे व्यापाऱ्यांना आदेश

Posted by - September 26, 2023 0
मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने व्यापाऱ्यांना 2 महिन्यात दुकानांवर मराठी पाट्या लावण्याचे आदेश ( Marathi Shop Signboards) दिले आहेत. प्रकरण उच्च…

महिलाच नाहीत तर मुकी जनावरं देखील असुरक्षित; कुत्र्यासोबत विकृताचे असे कृत्य; सीसीटीव्ही व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कारवाई

Posted by - March 22, 2023 0
पाटणा : बिहारची राजधानी असलेल्या पाटणामधून एक अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील एका भटक्या कुत्र्यावर एका तरुणाने बलात्कार…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *