दैनिक प्रभातच्या मुद्रणालयावर सहा ते सात जणांचा हल्ला, मुद्रणालयाच्या काचा फोडल्या

416 0

पुणे- दैनिक प्रभातच्या धायरी येथील मुद्रणालयावर सहा ते सात अज्ञात इसमांनी मंगळवारी दुपारच्या सुमारास हल्ला केला. या हल्लेखोरांनी अनधिकृतपणे कार्यालयाच्या आवारात प्रवेश करून मुद्रणालयाच्या खिडकीच्या काचा आणि सीसीटीव्ही फोडून हल्लेखोर पसार झाले. या प्रकरणी अभिरुची पोलीस चौकीमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबतची माहिती अशी की, मंगळवारी (दि. 24) दुपारी कार्यालयाच्या मागील बाजूस पडलेल्या भिंतीकडून काही अज्ञात व्यक्तींनी प्रवेश केला. दैनिक प्रभातचे नुकसान करण्याच्या हेतूने तोडफोड करण्यास सुरूवात केली. त्यानंतर कार्यालयाच्या पाठीमागील बाजूने हे हल्लेखोर पसार झाले. मुद्रणालय कार्यालयाला 19 ते 20 खिडक्‍या आहेत. त्यापैकी निम्म्याहून अधिक खिडक्यांच्या काचा फोडण्यात आल्या आहेत.

दैनिक प्रभातच्या मुद्रणालयाशेजारील एका जागेत शहरातून गोळा केलेला शेकडो ट्रक राडारोडा स्वत:च्या भूखंडावर खाली करून घेणाऱ्या व्यावसायिकांनी बेदरकारपणे सर्व नियम धाब्यावर बसवून केलेल्या कृत्यामुळे दैनिक प्रभातच्या मुद्रणालयाची सीमाभिंत पाडली होती. याबाबत सिंहगडरोड पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली होती. त्याचाच राग मनात धरून हा हल्ला झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

 

 

Share This News

Related Post

Junnar Accident News

Junnar Accident News : कल्याण नगर महामार्गावर तिहेरी अपघात; 8 जणांचा दुर्दैवी मृत्यू

Posted by - December 18, 2023 0
पुणे : कल्याण नगर महामार्गावर जुन्नर (Junnar Accident News) तालुक्यातील डिंगोरे गावच्या हद्दीत रात्रीच्या सुमारास 3 वाहनांचा भीषण अपघात झाला.…
Crime

विदर्भ हादरला ! मदतीच्या बहाण्याने अंध पतीसमोरच अंध पत्नीवर अत्याचार

Posted by - April 6, 2023 0
महाराष्ट्राला हादरवणारी अत्याचाराची घटना अकोल्यातून समोर आली आहे. अंध पतीच्या समोरच अंध पत्नीवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. अमरावतीहून…

महत्त्वाची बातमी : राज्य शासनाच्या नोकर भरतीच्या वयोमर्यादेत वाढ; राज्य सरकारचा महत्वपूर्ण निर्णय

Posted by - March 4, 2023 0
महाराष्ट्र : राज्य शासनाच्या नोकर भरतीच्या वयोमर्यादेत वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे आता लवकर भरतीच्या मर्यादेत…

बारावीचा निकाल जाहीर, राज्याचा निकाल 94.22 टक्के यंदाही मुलींची बाजी, कोकण विभाग अव्वल

Posted by - June 8, 2022 0
पुणे – महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून मार्च-एप्रिल 2022 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल आज…
Donate Eyes

वारकऱ्यांनी केला नेत्रदानाचा संकल्प

Posted by - June 13, 2023 0
पुणे : वारकरी बांधवांसाठी भोई प्रतिष्ठानच्या वतीने नेत्रदान प्रसार या विषयावर सामाजिक कार्यकर्ते डॉ. मिलिंद भोई यांचे नेत्रदान या विषयावर…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *