पुण्यात दहीहंडी उत्सव रात्री 10 च्या आत ! पोलिसांनी केली नियमावली जाहीर

307 0

पुणे : कोरोना संकटामुळे दोन वर्षानंतर दहीहंडीचा उत्सव जल्लोषात साजरा होणार आहे. मात्र, पुण्यात हा जल्लोष रात्री दहा वाजेपर्यंतच करता येणार असून, गोविंदांना रात्री दहाच्या आतच हंडी फोडावी लागणार आहे. पोलिस प्रशासनाने तशी नियमावली जाहीर केली आहे.

अधिक वाचा : मोठी बातमी! विनायक मेटेंच्या गाडीचा पाठलाग करणारी कार पुणे पोलिसांच्या ताब्यात 

उद्या दहीहंडी उत्सव होणार आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी तगडा बंदोबस्त ठेवला असून, मोठा फौजफाटा शहरात तैनात केला आहे. स्थानिक पोलीस ठाण्यांचे अधिकारी कर्मचारी, त्याचबरोबर एसआरपीएफची तुकडी, शीघ्र कृती दल, होमगार्ड, दामिनी पथके, गुन्हे शाखा विशेष शाखेचा साध्या वेशातील बंदोबस्त असणार आहे.

अधिक वाचा : Vinayak Mete Death Case | शिक्रापूरदरम्यान विनायक मेटेंच्या कारचा पाठलाग करणारी कार पुणे पोलिसांच्या ताब्यात

विशेष म्हणजे पोलिसांनी यंदा तळीरामांवर नजर ठेवण्यासाठी खास पथकांची नेमणूक केली आहे. त्यांच्यावर मद्यप्राशन करून धिंगाणा घालणार्यांवर लक्ष ठेवण्याचे काम देण्यात आले आहे. तसेच महिला छेडछाडीच्या घटना रोखण्यासाठी पथके तैनात ठेवली आहेत.मंडळांना आवाजाची मर्यादा देखील पाळावी लागणार आहे. जी मंडळे आवाजाच्या नियमांचे उल्लंघन करतील, त्यांच्यावर पोलिस कारवाई करणार आहेत. आवाजाची मर्यादा मोजण्यासाठी यंत्रणा घेऊन पोलिस हजर असणार आहेत. तसेच वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मंडळाना आपले कार्यकर्ते वाहतूक पोलिसांच्या मदतीला द्यावे लागणार आहेत.

रुग्णावाहीका तसेच अग्निशमन दलाची वाहने गर्दीत अडकणार नाहीत याची काळजी मंडळांना घ्यावी लागणार आहे. शहरातील मध्यवस्तीत मोठ्या प्रमाणात दहीहंडी उत्सव साजरा केला जातो. त्यामुळे विश्रामबाग व फरासखाना पोलिसांवर बंदोबस्ताची मोठी मदार असते.
पोलिसांकडून मध्यभागातील मंडई परिसरात मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. आवाजाच्या बाबातीत उच्च न्यायालयाने दिलेल्या नियमांचे पालन मंडळांनी करावे, अशा सूचना पोलीस प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.

Share This News

Related Post

पुण्यातील प्रसिद्ध हॉटेल व्यवसायिक आणि हॉटेल तिरंगाचे मालक संजय आदमाने यांचं निधन

Posted by - November 21, 2022 0
पुणे:  प्रसिद्ध हॉटेल व्यवसायिक आणि हॉटेल तिरंगाचे मालक संजय आदमाने यांचे दीर्घ आजाराने निधन झालं आज पहाटे पाच वाजता जहांगीर…

ग्रामपंचायत निवडणूक निकाल : भोर तालुक्यामध्ये राष्ट्रवादीचा दणदणीत विजय ; सरपंचपदासह दोन्ही ग्रामपंचायतींवर रोवला झेंडा ; थोपटेंना धक्का

Posted by - September 19, 2022 0
पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यामध्ये दोन्हीही ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी काँग्रेसने दणदणीत विजय मिळवला आहे. दोन्ही ठिकाणी राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी झाले आहेत. भोलावडे…
Pune-PMC

Property Tax : पुणेकरांना दिलासा! महापालिकेकडून मिळकत कर भरण्यासाठी देण्यात आली मुदतवाढ

Posted by - July 31, 2023 0
पुणे : पुणे महापालिकेच्या मिळकत कर (Property Tax) विभागाचा सर्व्हर डाऊन झाल्याने नागरिकांची मोठ्या प्रमाणत गोची झाली. सर्वसाधरण करामधील 5…

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले आज जम्मू काश्मीर दौऱ्यावर ; RPI च्या जम्मू काश्मीरमधील कार्यकर्त्यांना करणार संबोधित

Posted by - October 6, 2022 0
जम्मू काश्मीर : रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आज रामदास आठवले श्रीनगरचा दौरा करणार आहे. काश्मीर राज्यामधील…
Heavy Rain

Rain Update : मुंबईतल्या पावसानं मोडला जुलै महिन्याचा रेकॉर्ड; 5 दिवसात पडला ‘एवढा’ मिमी पाऊस

Posted by - July 27, 2023 0
मुंबई : मागच्या काही दिवसांपासून राज्यात पावसाने धुमाकूळ (Rain Update) घातला आहे. या पावसामुळे अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक विस्कळीत…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *