कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी केली टिश्यूकल्चर लॅबची पाहणी

353 0

पुणे- कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी आज मांजरी येथील केएफ बायोप्लॅन्टस समूहाच्या टिश्यूकल्चर लॅबची पाहणी केली. राज्यातील शेतकऱ्यांना प्रगत तंत्रज्ञानावर आधारीत शेतीबाबत मार्गदर्शन करण्यासाठी केएफ बायोप्लॅन्टसमूहाच्या मदतीने काय करता येईल, यासंदर्भातही त्यांनी चर्चा केली.

मांजरी केएफ बायोप्लॅन्ट समूहाच्या पाहणी दौऱ्यावेळी समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषकुमार जैन, संचालक किशोर राजहंस, विभागीय कृषी सहसंचालक रफिक नाईकवाडी उपस्थित होते.

दादाजी भुसे यांनी टिश्यूकल्चर लॅब, उत्पादन केंद्र, ग्रीन हाऊस तसेच डमो हाऊसची पाहणी केली. फुले किती दिवस टिकू शकतात, उत्पादन, फुलांचे विविध प्रकार, निर्यातीबाबत नियोजन, हवामान बदलाचा परिणाम तसेच त्यावर मात करण्यासाठीचे नियोजन आदींसह विविध विषयाववर चर्चा झाली. केएफ बायोप्लॅन्टसमूहाच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांना पॉलीहाऊसमधील नवीन तंत्रज्ञानाच्या वापराबाबत मार्गदर्शन व्हावे अशी अपेक्षा कृषि मंत्री भुसे यांनी व्यक्त केली.

मुख्य कार्यकारी अधिकारी जैन यांनी या टिश्यूकल्चर लॅब तसेच बायोप्लॅन्टच्या कार्याची माहिती दिली. 30 देशात रोपांची निर्यात होत असून समूहाच्या ४ प्रयोगशाळा आहेत, दोन प्रयोगशाळांचे कामही प्रगतीपथावर असल्याचे त्यांनी सांगितले.

Share This News

Related Post

गुढीपाडवा, डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शिधापत्रिकाधारकांना 100 रुपयांत आनंदाचा शिधा

Posted by - February 22, 2023 0
गुढीपाडवा तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शिधापत्रिकाधारकांना १०० रुपयांत आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या…
Kartik Gaikwad

Chhatrapati Sambhajinagar : वर्गात बाकावर बसण्यावरून झालेल्या वादातून कार्तिकची हत्या; छत्रपती संभाजीनगर हादरलं

Posted by - July 20, 2023 0
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhajinagar) एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये शाळेच्या मधल्या सुटीत मैदानावर चार वर्ग मित्रांनी…

गुणरत्न सदावर्ते यांना ४ दिवसांची पोलीस कोठडी, छत्रपती घराण्यावरील टीका भोवली

Posted by - April 15, 2022 0
सातारा- साताऱ्यातील छत्रपती घराण्यावर टीका केल्याप्रकरणी एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांना सातारा कोर्टाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी देशवासियांना दिल्या होळी, धुलीवंदनाच्या शुभेच्छा

Posted by - March 18, 2022 0
देशभरात रंगांचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. आज धुलिवंदनानिमित्त लोक रंगात रंगलेले दिसत आहेत. लोक वेगवेगळ्या शैली आणि…

स्मृती ईराणी यांनी सोनिया गांधी अपमान केल्याच्या निषेधार्थ महिला काँग्रेसचे जोडो मारो आंदोलन’

Posted by - July 29, 2022 0
  पुणे:अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या विरोधात काल संसदेमध्ये केंद्रिय मंत्री स्मृती ईराणी यांनी घोषणा देऊन अपमान…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *