पुणे : मध्यराञी हॉटेल तिरुमला भवन येथे सिलेंडरचा स्फोट; सुदैवाने जीवितहानी टळली

231 0

पुणे : काल मध्यराञी १२•४६ वाजता (दिनांक ११•१०•२०२२ रोजी) हडपसर, साडेसतरा नळी, हॉटेल तिरुमला भवन फुड कॉर्नर येथे आग लागल्याची वर्दि अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षात आली असता हडपसर अग्निशमन केंद्रातील अग्निशमन वाहन तातडीने रवाना करण्यात आले.

घटनास्थळी पोहोचताच जवानांनी हॉटेलमधे आग लागल्याचे पाहताच किचनमधील एक स्फोट झालेला सिलेंडर बाहेर काढत इतर सहा सिलेंडर ही सुरक्षित ठिकाणी हलविले व होज पाईपचा वापर करीत पाणी मारुन आगीवर पाचच मिनिटात नियंत्रण मिळवले. या घटनेत कोणी जखमी वा जिवितहानी झाली नाही.

किचनमधे गॅस सिलेंडर लिकेज होऊन एका सिलेंडरचा स्फोट झाला व आग लागली असे अग्निशमन दलाने सांगितले. अग्निशमन दलाचे जवान वेळेवर पोहोचत सहा सिलेंडर तत्परतेने सुरक्षित ठिकाणी हलविल्याने मोठा अनर्थ टळला. हॉटेलमधील टेबल, खुर्ची, इलेक्ट्रीक वायरिंग व अन्य वस्तू जळाल्या आहेत.

या कामगिरीत हडपसर अग्निशमन केंद्र अग्निशमन अधिकारी प्रमोद सोनावणे, वाहन चालक सुखराज दाभाडे, फायरमन गणेश पवळ, बापुसाहेब अढाळगे व मदतनीस अनिकेत तारू, नितेश डगळे यांनी सहभाग घेतला.

Share This News

Related Post

बैलगाडा शर्यतीहून परतताना पिकअप गाडीचा अपघात, एकाचा मृत्यू , चार जण जखमी

Posted by - February 12, 2022 0
आंबेगाव- पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील बेल्हा जेजुरी महामार्गावर लोणी येथे पिकअप गाडीचा टायर फुटून भीषण अपघात झाला. या अपघातात एका…

गाणगापूर एस टी बस अपघात: गंभीर जखमींना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी ५० हजार रुपये

Posted by - July 24, 2022 0
सोलापूर – गाणगापूर एसटी बसला अक्कलकोट जवळ आज सकाळी झालेल्या अपघाताची दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे. अपघातात जखमी…

चित्रकला शिक्षकाने विद्यार्थिनीला मारला डायलॉग,”आपके पाव देखे, बहुत हसीन है, इन्हे जमीन पर मत उतारीयेगा…”! विनयभंगाचा गुन्हा दाखल; आता शिक्षकाचे पाय तुरुंगात

Posted by - November 23, 2022 0
पुणे : पुण्यातील पाषाण भागातून एक धक्कादायक घटना समोर येते आहे. चित्रकला शिकवण्यासाठी घरी येणाऱ्या शिक्षकाने आपल्या सोळा वर्षीय विद्यार्थिनीचा…
UPI Lite X Feature

UPI Lite X Feature : आता इंटरनेट शिवाय पाठवता येणार ऑनलाइन पैसे; UPI Lite X Feature लाँच

Posted by - September 10, 2023 0
युनिफाइड पेमेंट इंटरफेस म्हणजेच UPI भारतात खूपच लोकप्रिय आहे. डिजीटल पेमेंटमुळं व्यवहार करणे (UPI Lite X Feature) सध्या सोप्पे झाले…

जम्मू काश्मीरमध्ये राहुल भट्ट या काश्मिरी पंडिताची हत्या करणाऱ्या दहशतवाद्यांना २४ तासात कंठस्नान

Posted by - May 13, 2022 0
जम्मू- जम्मू काश्मीरमध्ये आज भारतीय सुरक्षादलाने वचनपूर्ती केली आहे. जम्मू काश्मीरमध्ये गुरुवारी (दि. १२) राहुल भट्ट या काश्मिरी पंडित युवकाची…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *