Farmers

शेतकऱ्यांची दिवाळी होणार गोड ! राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या बाबतीत घेतला ‘हा’ मोठा निर्णय

725 0

मुंबई : कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी ऐन दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्यांसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे. राज्यातील पीक विमा कंपन्यांनी पहिल्या टप्प्यात सुमारे 1700 कोटी रुपये पीकविमा अग्रिम वितरण करण्यास मंजुरी दिली आहे. याचा लाभ राज्यातील विविध जिल्ह्यातील सुमारे 35 लाख 08 हजार शेतकऱ्यांना मिळणार आहे. या विमा रक्कमा संबंधित लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर थेट वितरण करण्यास संबंधित विमा कंपन्यांनी सुरुवात केली असल्याने बहुतांश ठिकाणी दिवाळी पूर्वीच पिकविम्याची अग्रीम रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.

खरीप हंगामात वेगवेगळ्या जिल्ह्यात हवामानाच्या असमतोलामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. एक रुपयात पीकविमा योजनेमध्ये राज्यातील तब्बल 1 कोटी 71 लाख शेतकऱ्यांनी सहभाग घेतलेला आहे. अंतरिम नुकसान भरपाई (MSA) अंतर्गत विविध जिल्हा प्रशासनाने संबंधित पीकविमा कंपन्यांना अधिसूचना निर्गमित करून 25% अग्रीम पीकविमा देण्याबाबत आदेश देण्यात आले होते. त्यावरून बहुतांश कंपन्यानी विभागीय व राज्य स्तरावर अपील केलेले होते. अपिलांच्या सुनावण्या जसजशा होत गेल्या त्याप्रमाणे आतापर्यंत संबंधित विमा कंपन्यानी एकूण 1700 कोटी रुपये रक्कम देण्याचे मान्य केले आहे. तसेच जसजसे अपिलांचे निकाल येतील, त्यानुसार शेतकरी लाभार्थी संख्या व विम्याची अग्रीम रक्कम यामध्ये मोठी वाढ होणार आहे.

कोणत्या जिल्ह्यात किती पीकविमा मंजूर?
नाशिक – शेतकरी लाभार्थी – 3 लाख 50 हजार (रक्कम – 155.74 कोटी)
जळगाव – 16,921 (रक्कम – 4 कोटी 88 लाख)
अहमदनगर – 2,31,831 (रक्कम – 160 कोटी 28 लाख)
सोलापूर – 1,82,534 (रक्कम – 111 कोटी 41 लाख)
सातारा – 40,406 (रक्कम – 6 कोटी 74 लाख)
सांगली – 98,372 (रक्कम – 22 कोटी 4 लाख)
बीड – 7,70,574 (रक्कम – 241 कोटी 21 लाख)
बुलडाणा – 36,358 (रक्कम – 18 कोटी 39 लाख)
धाराशिव – 4,98,720 (रक्कम – 218 कोटी 85 लाख)
अकोला – 1,77,253 (रक्कम – 97 कोटी 29 लाख)
कोल्हापूर – 228 (रक्कम – 13 लाख)
जालना – 3,70,625 (रक्कम – 160 कोटी 48 लाख)
परभणी – 4,41,970 (रक्कम – 206 कोटी 11 लाख)
नागपूर – 63,422 (रक्कम – 52 कोटी 21 लाख)
लातूर – 2,19,535 (रक्कम – 244 कोटी 87 लाख)
अमरावती – 10,265 (रक्कम – 8 लाख)
एकूण – लाभार्थी शेतकरी संख्या – 35,08,303 (मंजूर रक्कम – 1700 कोटी 73 लाख)

Share This News

Related Post

जयस्तंभ अभिवादन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीत बदल; वाहनतळांची जागाही निश्चित; वाचा मार्ग आणि वाहनतळ सविस्तर माहिती

Posted by - December 30, 2022 0
पुणे : हवेली तालुक्यातील मौजे पेरणे फाटा येथे १ जानेवारी २०२३ रोजी आयोजित जयस्तंभ अभिवादन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पुणे-अहमदनगर महामार्ग क्रमांक…
Satara News

Satara News : जेवणानंतर आयुर्वेदिक काढा घेतल्याने 15 मिनिटांच्या अंतराने बापलेकांचा दुर्दैवी मृत्यू

Posted by - July 10, 2023 0
सातारा : साताऱ्यामध्ये (Satara News) एक मन हेलावून टाकणारी घडली आहे. यामध्ये जेवणानंतर आयुर्वेदिक काढा घेतल्याने 15 मिनिटांच्या अंतराने बापलेकांचा…
narendra modi

PM Modi : ‘अहमदाबाद आणि सोलापूरचं जुनं नातं’ पंतप्रधान मोदींनी सांगितला इतिहास

Posted by - January 19, 2024 0
सोलापूर : आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) सोलापूरच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या हस्ते 15 हजार घरकुलांचं लोकार्पण झालं. यावेळी बोलताना…
Manoj Jarange

Manoj Jarange Patil : निवडणूक संपण्यापूर्वीच मनोज जरांगे पाटलांनी केली ‘ही’ मोठी घोषणा

Posted by - May 14, 2024 0
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. यामध्ये मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange…
Maharashtra Weather Update

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात ‘या’ जिल्ह्यांत कोसळणार अवकाळी पाऊस; आयएमडीने दिला इशारा

Posted by - February 10, 2024 0
मुंबई : महाराष्ट्रात काही भागात अजूनही थंडीचा जोर कायम (Maharashtra Weather Update) असला तरी देखील राज्यातील अनेक भागांमध्ये हवामान विभागाकडून…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *