पुणे : लोकशाही समाजवादासाठी आग्रही संघटनेत एकाधिकारशाहीचे संकट – वसंत एकबोटे

476 0

पुणे : “राष्ट्र सेवा दल या लोकशाही समाजवादासाठी आग्रही संघटनेत एकाधिकारशाहीचे संकट आलेले आहे. मनमानी कारभाराला प्रश्नांकित करणार्या कार्यकर्त्यांना दडपशाही सोसावी लागत आहे.हा हुकुमशाहीचा कारभार सहन केला जाणार नाही.” असा इशारा ज्येष्ठ कार्यकर्ते वसंत एकबोटे यांनी दिला आहे.

राष्ट्र सेवा दलाचे माजी सहमंत्री विलास किरोते आंदोलकांची भूमिका मांडताना म्हणाले ,” संघटनेच्या घटना दुरुस्तीच्या नावाखाली पूर्ण घटनाच बदलून निर्णय प्रक्रियेचा ताबा घेतला जात आहे. कपिल पाटील यांनी राष्ट्र सेवा दलाचा रिमोट कंट्रोल बनू नये.”

संघटनेच्या संविधानातील बदल आधीच्या घटना धर्मादायला मंजूर होत नाहीत ,तोवर अजिबात करु नका. यामुळे गुंते वाढतच जातील. संघटनेशी संबंधित नसलेले केवळ प्रतिष्ठेसाठी, केवळ मानाचे पद भूषवणारे, कळसुत्री विश्वस्तांची थेट नेमणूक करु नका. पूर्णवेळ कार्यकर्ता धोरणही किमान 10 वर्षे काम केलेल्या अनुभवी पूर्णवेळ कार्यकर्त्यांना विचारुन राबवा. एकाचवेळी अनेक संस्था-संघटनांचे मानधन घेणारे पूर्णवेळ कार्यकर्ते निवृत्त करा.

कोणामुळेही संघटना कोणत्याही राजकिय पक्षाच्या दावणीला बांधले जाणार नाही याची खात्री संघटनेला द्या. याचा एक अर्थ असा आहे कि संघटनेत जिल्हा ते राष्ट्रीय स्तरावर कोणीही राजकीय पक्षातील पदाधिकारी सेवादलाच्या कोणत्याही पदावर नकोत. व्यावसायिक प्रकल्पांच्या नावाखाली सुरु असलेली आर्थिक उधळपट्टी बंद करा.अशा मागण्यांसाठी सुरु असलेल्या ठिय्या आंदोलनास तिसर्या दिवशी महाराष्ट्रभरातून प्रतिसाद मिळत आहे.

यावेळी अरुण थोपटे, विद्याधर ठाकूर, मिहिर थत्ते, वसंत एकबोटे, प्रशांत दांडेकर,विनय र.र., उमाकांत भावसार , वसंत न्हावले, संजय लोणकर, चंद्रकांत शेडगे, नितीन इंदलकर, वसंत जुनवणे,साधना शिंदे,दत्ता पाकिरे, अशोक वरुटे, अलका एकबोटे आणि संजय रेंदाळकर आदिंसह कार्यकर्ते उपस्थित होते.

Share This News

Related Post

राहुल गांधी यांच्या वायनाडमध्ये पोटनिवडणूक होणार का ? काय म्हणाले मुख्य निवडणूक आयुक्त ?

Posted by - March 29, 2023 0
सुरत न्यायालयाने राहुल गांधी यांना मानहानीच्या प्रकरणात दोषी ठरवलं आणि त्यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली. त्यानंतर लोकसभा सचिवालयाने कारवाई करत…

माणिकचंद ऑक्सिरिच आता नव्या रुपात

Posted by - September 5, 2023 0
  पिण्याच्या पाण्याच्या उच्च गुणवत्तेसाठी प्रसिद्ध असलेला नामांकीत माणिकचंद ऑक्सिरीच पॅकेज वॉटर आता वेगळ्या रुपात समोर आला आहे. निळ्या रंगाची…

महत्वाची बातमी : अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी 31.74% मतदान; मतमोजणी 6 नोव्हेंबरला

Posted by - November 3, 2022 0
मुंबई : बहुचर्चित महाराष्ट्र विधानसभेच्या 166 अंधेरी पूर्व पोट निवडणूक आज पार पडली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे उमेदवार श्रीमती ऋतुजा…
Maratha Reservation

Maratha Reservation : मराठा आरक्षण ओबीसी कोट्यतूनच द्यावे लागणार – ॲड. श्री.पुरुषोत्तम खेडेकर

Posted by - October 21, 2023 0
पुणे : मराठा (Maratha Reservation) सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष ॲड. श्री. पुरुषोत्तम खेडेकर, संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते श्री. गंगाधर बनबरे, सचिव…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *